श्रीरामपूरः पुण्यातील German Bakery Blast प्रकरणातील आरोपी बंटी जहागिरदार याच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात बुधवारी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या.
या हल्ल्यात बंटी जहागिरदार जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गोळीबाराच्या घटनेनंतर श्रीरामपूर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
German Bakery Blast: बंटी जहागिरदार २०२३ पासून जामिनावर बाहेर
१३ फेब्रुवारी २०१० रोजी पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील जर्मन बेकरीमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला होता. या German Bakery Blast मध्ये १८ जणांचा मृत्यू झाला होता, तर ६० हून अधिक लोक जखमी झाले होते. हा हल्ला इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने लष्कर-ए-तैयबा यांच्या मदतीने केल्याचे तपासात स्पष्ट झाले होते.
या स्फोट प्रकरणातील आरोपी असलेला अस्लम शेख उर्फ बंटी जहागिरदार २०२३ पासून जामिनावर बाहेर होता. त्याच्यावर झालेल्या या गोळीबारामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या घटनेकडे वेधले गेले आहे.
पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू केला असून घटनेचा तपास वेगाने सुरू आहे.
हेही वाचाः Stray Dog Shelters: श्वान निवाऱ्यांसाठी महापालिकेची धावपळ



















2 Comments