पुणे महानगरपालिकेतील PMC NEWS सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांसाठी र.रु.२५ लाखाचा वैयक्तिक अपघात विमा उतरविण्यात आला आहे.
याच धर्तीवर पुणे मनपातील कंत्राटी कामगारांसाठी वैयक्तिक अपघात विमा उतरविणेबाबत मुख्य कामगार अधिकारी .नितीन केंजळे यांनी विमा कंपनीस विनंती केली होती.
त्यास अनुसरून न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या शासकीय विमा कंपनीने र.रु.२७०/- एवढ्या अत्यल्प रकमेमध्ये कंत्राटी कामगारांसाठी १० लाखाचा वैयक्तिक अपघाती विमा देण्याचा प्रस्ताव सादर केला होता.
PMC NEWS पुणे महानगरपालिका व ठेकेदार संस्था यांच्या प्रयत्नाने पात्र वारसासाठी विमा क्लेम मान्य
सदर प्रस्तावानुसार पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी मनुष्यबळ पुरविणाऱ्या सर्व ठेकेदारांची बैठक बोलावून त्यांच्याकडील कंत्राटी कामगारांचा वैयक्तिक अपघात विमा काढण्याबाबतचे आवाहन करण्यात आले होते.
त्यानुसार अनेक ठेकेदारांनी आपल्याकडील कंत्राटी कामगारांचा वैयक्तिक अपघात विमा उतरविला आहे.
नुकतेच मे.सिद्धीविनायक एन्टरप्रायजेस या पुणे महानगरपालिकेस कंत्राटी कामगार सेवा पुरविणाऱ्या संस्थेकडील कंत्राटी कामगार कै.निवांत दशरथ अवसरे यांचे त्यांचे गावी जात असताना अपघात होवून निधन झाले.
सदर कामगारास वैयक्तिक अपघात विम्याचे सुरक्षा कवच असल्याने पुणे महानगरपालिका व ठेकेदार संस्था यांच्या प्रयत्नाने त्यांचे पात्र वारसासाठी विमा क्लेम मान्य करून घेण्यात
आला. सदर दिवंगत कामगाराच्या वारसास र.रु.१० लक्ष विम्याचा धनादेश मा. पवनीत कौर (भा.प्र.से.), अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज.) यांचे हस्ते दिवंगत कामगाराची पत्नी श्रीमती साक्षी निवांत अवसरे यांना दि.२१/०१/२०२६ रोजी देण्यात आला.
यावेळी मुख्य कामगार अधिकारी श्री.नितीन केंजळे, उप कामगार अधिकारी श्री.बुगप्पा कोळी, ठेकेदार संस्थेचे प्रोप्रायटर श्री.दादासाहेब झेंडे तसेच दिवंगत कामगाराची पत्नी श्रीमती साक्षी निवांत अवसरे व वडील उपस्थित होते. PMC NEWS


















Leave a Reply