Tejaswini Satpute IPS

Ashok Kharat Case नाशिक भोंदू अशोक खरात प्रकरण: लैंगिक अत्याचार, फसवणूक आणि अंधश्रद्धेचा थरारक खेळ उघड; एसआयटीच्या तपासात धक्कादायक खुलासे; ११ गुन्ह्यांची चौकशी, ४६५० आक्षेपार्ह व्हिडिओ लिंक हटवल्या

नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे Ashok Kharat Case संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. महिलांचे लैंगिक शोषण, अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक आणि धमक्यांच्या माध्यमातून पैसे उकळण्याचा गंभीर आरोप असलेल्या या प्रकरणात तपास यंत्रणा अधिक सक्रिय झाली आहे. विशेष तपास पथक (SIT) प्रमुख तेजस्विनी सातपुते Tejaswini Satpute IPS यांनी पत्रकार परिषदेत तपासातील महत्त्वाची माहिती उघड केली.

Ashok Kharat Case एसआयटीकडे सध्या एकूण ११ गुन्ह्यांचा तपास सोपवण्यात आला आहे. यामध्ये अशोक खरातविरोधातील ९ गुन्हे आणि या प्रकरणाशी संबंधित पण त्याच्याविरोधात नसलेले २ गुन्हे समाविष्ट आहेत. एकूण १२ गुन्ह्यांपैकी काहींचा तपास स्थानिक पोलिसांकडे असून, उर्वरित तपास एसआयटीकडे आहे.

या प्रकरणासाठी २४ अधिकाऱ्यांचे विशेष पथक कार्यरत आहे.

लैंगिक अत्याचार आणि फसवणुकीचे गंभीर आरोप

एसआयटीच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ८ गुन्हे हे महिला लैंगिक अत्याचाराशी संबंधित आहेत. उर्वरित ३ गुन्हे फसवणूक आणि अंधश्रद्धा विरोधी कायद्याअंतर्गत नोंदवले गेले आहेत. आरोपी महिलांना मानसिकदृष्ट्या कमकुवत करून त्यांचा गैरफायदा घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भीती, अंधश्रद्धा आणि ब्लॅकमेलिंगचा वापर

तपासादरम्यान असे समोर आले की, अशोक खरात हा दैवी शक्तीचा आधार घेत महिलांना घाबरवत होता. खडे, रुद्राक्ष, चिंचुके आणि विविध धार्मिक विधींचा वापर करून तो विश्वास निर्माण करत असे. त्यानंतर कुटुंबीयांच्या मृत्यूची भीती दाखवून, बदनामीची धमकी देत लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक केली जात होती.

३० हून अधिक साक्षीदारांची चौकशी

एसआयटीने आतापर्यंत ३० पेक्षा अधिक साक्षीदारांची चौकशी केली आहे. पीडित महिला आणि साक्षीदारांच्या जबाबांमधून आरोपीच्या कार्यपद्धतीचा सविस्तर उलगडा झाला आहे. अनेक महिलांना मानसिक दबावाखाली ठेवून दीर्घकाळ शोषण केल्याचे समोर आले आहे.

४६५० आक्षेपार्ह व्हिडिओ लिंक हटवल्या

या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पीडित महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. सायबर टीमने आतापर्यंत ४६५० लिंक हटवल्या आहेत. तसेच अशा प्रकारचे कंटेंट शेअर करणारी ४५१ अकाउंट कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहेत. या संदर्भात दोन स्वतंत्र गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.

सायबर पथकाची सतत नजर

सायबर गुन्हे शाखेची विशेष टीम या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. सोशल मीडियावर पुन्हा अशा प्रकारचे व्हिडिओ अपलोड होऊ नयेत यासाठी सतत मॉनिटरिंग सुरू आहे. पीडितांची गोपनीयता राखण्यावरही विशेष भर दिला जात आहे.

आर्थिक व्यवहारांची चौकशी; ईडीची एन्ट्री

अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारांबाबतही संशय व्यक्त होत आहे. त्याची संपत्ती आणि पैशांचा स्त्रोत तपासण्यासाठी अंमलबजावणी संचालनालय (ED)ने या प्रकरणात प्रवेश केला आहे. एसआयटीने ईडीला आवश्यक ती सर्व माहिती सुपूर्द केली आहे.

तपासातून आणखी धक्कादायक खुलासे अपेक्षित

या प्रकरणाचा तपास अजून सुरू असून, पुढील काळात आणखी गंभीर आणि धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीविरोधात ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

हे ही वाचा : Pune Rain News पावसाळ्यापूर्वी पुणे सज्ज! सखल भागांतील पाणी साचण्यावर महापालिकेचा ‘वॉर मोड’; सभागृह नेते गणेश बिडकर यांचे निर्देश; नालेसफाई, अतिक्रमण हटाव आणि तातडीच्या उपाययोजनांना गती