पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत २०२४-२५ या वर्षासाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेतील पारदर्शकतेला तडा देण्याचा प्रयत्न Exam Cheating Case उघडकीस आला असून लेखी परीक्षेदरम्यान कॉपी करताना एका तरुणीला पकडण्यात आले आहे. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेमुळे भरती प्रक्रियेतील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा लक्ष केंद्रीत झाले आहे.
Exam Cheating Case ताथवडे येथील परीक्षा केंद्रात तपासणीदरम्यान चिठ्ठ्या व कपड्यांवर लिहिलेली उत्तरे आढळली; वाकड पोलिसांची कारवाई
अनुजा दिलीप चव्हाण (वय २५, रा. उंडाळे, ता. कराड, जि. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार अर्चना नवनाथ सस्ते यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना रविवारी (दि. १६) सकाळी सुमारे पावणे दहा वाजण्याच्या सुमारास ताथवडे येथील श्री बालाजी युनिव्हर्सिटीमध्ये घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत Pimpri Chinchwad Police २०२४-२५ या वर्षासाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. त्याअंतर्गत विविध परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात येत आहे. ताथवडे येथील श्री बालाजी युनिव्हर्सिटी Balaji University Tathawade येथे रविवारी सकाळी परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणात उमेदवार उपस्थित होते. परीक्षा सुरू होण्यापूर्वी सर्व उमेदवारांची कडक तपासणी करण्यात येत होती.
नियमांनुसार परीक्षा केंद्रात कोणतेही लिखित साहित्य, इलेक्ट्रॉनिक उपकरणे किंवा कॉपीसाठी वापरता येईल असे साधन आणण्यास सक्त मनाई आहे.
मात्र तपासणीदरम्यान अनुजा चव्हाण हिच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने अधिक सखोल तपासणी करण्यात आली. त्यावेळी तिच्या जिन्स पॅन्टच्या खिशात परीक्षेशी संबंधित दोन चिठ्ठ्या आढळून आल्या.
याशिवाय, अधिक तपास करताना तिच्या जिन्स पॅन्ट आणि टॉपवरही काही प्रश्नांची उत्तरे लिहिलेली असल्याचे निदर्शनास आले.
या प्रकारामुळे परीक्षा केंद्रातील अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत संबंधित तरुणीला ताब्यात घेतले आणि वाकड पोलिसांना Wakad Police Station माहिती दिली.
पोलिसांनी Wakad Police Station घटनास्थळी येऊन पंचनामा केला आणि संबंधित साहित्य जप्त केले. त्यानंतर अनुजा चव्हाण हिच्याविरुद्ध फसवणूक व गैरप्रकार करण्याच्या उद्देशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त कुराडे करीत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे पोलीस भरती प्रक्रियेत काही उमेदवारांकडून गैरप्रकार करण्याचे प्रयत्न होत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. प्रशासनाकडून कठोर नियम असूनही अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने सुरक्षा अधिक कडक करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
पोलीस भरती ही अनेक तरुणांच्या भवितव्याशी संबंधित प्रक्रिया असल्याने तिची निष्पक्षता टिकवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
हे ही वाचा : Pune Municipal Corporation अभय योजनेचा पालिकेला ‘सुवर्णस्पर्श’ : चार महिन्यांत तब्बल ९५४ कोटींची वसुली


















