नववर्षाच्या जल्लोषात रस्ते सुरक्षित राहावेत यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ (Pune Drunk and Drive Action) विरोधात कडक पावले उचलली. ३१ डिसेंबरच्या रात्रीपासून १ जानेवारीच्या पहाटेपर्यंत शहरभर विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली.
या कारवाईत मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या २०८ वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वर्दळ वाढल्याने वाहतूक शाखेने ४० ठिकाणी नाकाबंदी पॉइंट उभारले होते. यावेळी एकूण २,१२८ वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये मद्यसेवन करून वाहन चालवणाऱ्या २०८ जणांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.
तसेच, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५१ वाहने जप्त करण्यात आली. या संपूर्ण मोहिमेतून ७०,४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
Pune Drunk and Drive Action: मद्यसेवन करून वाहन चालविणे हा गंभीर गुन्हा
दरम्यान, नाताळ ते नववर्ष या कालावधीत म्हणजेच २४ ते ३१ डिसेंबरदरम्यान शहरातील ३० वाहतूक विभागांमार्फत दररोज रात्री विशेष तपासणी करण्यात आली. या काळात मद्यधुंद वाहनचालकांवर एकूण ४८६ कारवाई (Pune Drunk and Drive Action) करण्यात आल्या असून, मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गतवर्षी २०२५ मध्ये पुणे शहरात मद्यधुंद वाहनचालकांविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. एकूण ६,७६५ वाहनचालकांवर खटले दाखल करून प्रकरणे न्यायालयात सादर करण्यात आली आहेत.
मद्यसेवन करून वाहन चालविणे हा गंभीर गुन्हा असून यामुळे अपघातांचा धोका वाढतो. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून स्वतःसह इतरांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे (Pune Drunk and Drive Action).
हेही वाचाः CR Sanglikar Arrest: पीएसीएल जमीन घोटाळ्याप्रकरणी उद्योजकाला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक



















Leave a Reply