जीएस ग्लोबल अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांनी साधला जागतिक विद्यापीठांशी थेट संवाद

Study Abroad Fair Pune जीएस ग्लोबल अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांनी साधला जागतिक विद्यापीठांशी थेट संवाद

पुणे : परदेशी शिक्षणासाठी मार्गदर्शन करणाऱ्या Study Abroad Fair Pune जीएस ग्लोबल अकॅडमीतर्फे आयोजित जागतिक विद्यापीठांशी थेट संवाद कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भांडारकर रस्त्यावरील संस्थेच्या कॅम्पसमध्ये जागतिक दर्जाच्या विविध विद्यापीठांसोबत थेट संवाद व विद्यार्थी प्रवेश अभियान यशस्वीपणे पार पडले. परदेशातील उच्च शिक्षणासाठी ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य होता.

परदेशातील उच्च शिक्षणासाठी ५०० हून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी Study Abroad Fair Pune

या कार्यक्रमात विविध आंतरराष्ट्रीय विद्यापीठांच्या प्रतिनिधींनी तेथील अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती, तसेच परदेशातील करिअर संधींबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. Study Abroad Fair Pune पुण्यातील विद्यार्थ्यांमध्ये परदेशी शिक्षणाविषयी वाढती उत्सुकता यामधून दिसून आली. या उपक्रमामुळे जीएस ग्लोबल अकॅडमीचे जागतिक विद्यापीठांशी असलेले नेटवर्क अधिक मजबूत झाले असून, विद्यार्थ्यांना थेट दर्जेदार शिक्षण संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

जीएस ग्लोबल अकॅडमीचे संस्थापक गणेश शिरसाठ बोलताना म्हणाले, “परदेशी शिक्षणासाठी सर्व प्रकारच्या सेवा आणि मार्गदर्शन देणाऱ्या जीएस ग्लोबल अकॅडमीमध्ये ‘आयईएलटीएस’, ‘टोफेल’, ‘जीआरई’, ‘जीमॅट’, ‘सॅट’ व ‘पीटीई’ यांसारख्या आंतरराष्ट्रीय परीक्षांसाठी प्रशिक्षण दिले जाते. सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, मॉक टेस्ट सुविधा, ग्रंथालय व स्वतंत्र अभ्यासिका उपलब्ध करून दिल्या आहेत. जर्मन, फ्रेंच व जापनीज व अन्य परदेशी भाषांचे प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास व सॉफ्ट स्किल्सचे मार्गदर्शन दिले जाते. अनुभवी समुपदेशकांकडून प्रवेशापासून व्हिसा, प्रवास व निवास व्यवस्थेपर्यंत संपूर्ण व वैयक्तिक मार्गदर्शन करण्यात येते

हे ही वाचा :- http://Pune Mayor Reservation Controversy पुणे महापालिकेच्या महापौरपदाच्या आरक्षणावर न्यायालयीन वादसर्वसाधारण महिला आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान, सोडत रद्द होणार का?

शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.