पुणे : (IMDR Convocation 2026) “कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये पारंपरिक ‘एन्ट्री-लेव्हल’ नोकऱ्या कमी होत आहेत. मात्र, नाविन्यपूर्ण संशोधन करणाऱ्या, कौशल्य आणि समस्या सोडविण्याची क्षमता असणाऱ्या तरुणांसाठी चांगल्या वेतनाच्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत,” असे प्रतिपादन बजाज जनरल इन्शुरन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तपन सिंघेल यांनी केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटी (डीईएस) संचालित (IMDR Convocation 2026) इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्चच्या (आयएमडीआर) ५१ व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून सिंघेल बोलत होते.
‘आयएमडीआर’च्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष श्री जगदीश कदम, ‘डीईएस’चे कार्यवाह डॉ. आनंद काटिकर, संचालिका डॉ. शिखा जैन, प्राध्यापक, कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारंभात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचे आणि विविध पुरस्कारांचे वितरण, तसेच ‘अन्वेष-इनोव्हेशन टू इम्पॅक्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन व ‘पीच परफेक्ट’ या स्टार्टअप स्पर्धेच्या विजेत्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.
डॉ. तपन सिंघेल म्हणाले, “भविष्यात केवळ एक टक्का स्टार्टअप हे युनिकॉर्न ठरतील. त्यामुळे समस्या सोडविण्याची क्षमता ही करिअरमधील सर्वात महत्त्वाची बाब आहे. आज एका व्यक्तीलाही एकहाती कंपनी उभारून कोट्यवधी रुपये कमावण्याची संधी आहे. संधी मिळाल्यावर तिचे सोने करा आणि त्या हातातून जाऊ देऊ नका. शिक्षण हे केवळ बुद्धिमत्तेचे प्रशिक्षण नसून, वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची ताकद देते. अपयशाला न घाबरता नव्या उमेदीने पुढे जात नोकरी, व्यवसायातील अपेक्षा समजून घ्या. त्यातूनच तुम्हाला आनंदी जीवन जगण्याची कला अवगत होईल.”
प्रास्ताविकात डॉ. शिखा जैन यांनी (IMDR Convocation 2026)’आयएमडीआर’चा ५१ वा दीक्षांत सोहळा संस्थेच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. डॉ. जैन म्हणाल्या, “पुण्यातील पहिले बिझिनेस स्कूल म्हणून ‘आयएमडीआर’ची ओळख असून, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पीजीडीएम अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी उत्तम शैक्षणिक व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उद्योगजगतासोबत करार, संशोधनावर विशेष भर दिला आहे. विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण प्रयोग करत यशस्वी व्हावे आणि संस्थेचे व पालकांचे नाव उंचावावे, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. तपन सिंघेल यांच्याशी विद्यार्थ्यांचे प्रश्नोत्तर सत्र रंगले. क्वांटम मेकॅनिक्स, टॉक्सिक वर्क कल्चर, बाँड श्युरिटी, संशोधक ते इन्शुरन्स इंडस्ट्रीचा प्रवास, इन्शुरन्स क्षेत्राचे भविष्य अशा विविध विषयांवरील प्रश्नांना त्यांनी मनमोकळी उत्तरे दिली. प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तक खरेदीसाठी कूपन देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
श्री. जगदीश कदम व डॉ. आनंद काटीकर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. गोपा दास यांनी पुरस्कारांची घोषणा केली. डॉ. सोनाली खुर्जेकर यांनी आभार मानले, तर सूत्रसंचालन डॉ. पृथा उबगडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
गुणवंतांचा झाला सन्मान
(IMDR Convocation 2026) समारंभात विविध श्रेणींतील गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले. ‘जयदिप शिवदासानी ट्रॉफी’ सर्वोत्तम क्रीडापटू (पीजीडीएम बॅच) रौनक राठी याला, पीजीडीएम एकूण कामगिरी ‘जयदिप शिवदासानी ट्रॉफी’ ओम वैद्य यांना, ‘दिवंगत अर्जुन सिंह गांधी ट्रॉफी’ कलात्मक उत्कृष्टेसाठी ईशा जोगळेकर हिला, ‘विजय हथीरामानी यंग प्रोफेशनल प्राईज’ स्वानंदी भानोसे हिला, विजय हथीरामानी करंडक एकूण उत्कृष्टतेसाठी अक्षय भोसले याला, ‘चेतन शहा ट्रॉफी’ शांभवी रघुवंशी हिला, मलिना रॉय पुरस्कार समृद्धी गाडे, गोल्ड मेडल वैष्णवी दैठणकर हिला, तर सिल्व्हर मेडल श्रेया शेवाळे, ब्रिगेडियर एन. बी. ग्रँट पुरस्कार प्रतीक्षा पाटील हिला देण्यात आला.





















Leave a Reply