पुणे : लोकप्रिय टेलिव्हिजन शो MasterChef India च्या नवव्या सीझनचे परीक्षक आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेलिब्रिटी शेफ Vikas Khanna यांना सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने प्रतिष्ठित ‘सूर्यदत्त नॅशनल अवॉर्ड २०२६’ Suryadatta National Award 2026 प्रदान करण्यात आला. भारतीय पाककलेला जागतिक स्तरावर मानाचे स्थान मिळवून देत हॉस्पिटॅलिटी आणि क्युलिनरी आर्ट्स क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा सन्मान देण्यात आला.
Suryadatta National Award 2026 सूर्यदत्त संस्थेच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या हस्ते खन्ना यांना विशेष सन्मानचिन्ह, मानपत्र, पारंपारिक पुणेरी पगडी, सूर्यदत्त गोल्ड मेडल आणि संस्थेचा पारंपारिक स्कार्फ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्राचार्या डॉ. रसिका गुमास्ते आणि ज्योतिमा श्रीवास्तव यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जगभरात भारतीय खाद्यसंस्कृतीचा झेंडा उंचावणारे शेफ विकास खन्ना हे केवळ एक यशस्वी क्युलिनरी तज्ज्ञ नसून लेखक, समाजसेवक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणूनही ओळखले जातात. भारतीय पाककलेतील परंपरा आणि आधुनिकता यांचा संगम साधत त्यांनी जागतिक स्तरावर भारतीय खाद्यसंस्कृतीला नवे स्थान मिळवून दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत सूर्यदत्त संस्थेने त्यांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान केला.
पुरस्कार Suryadatta National Award 2026 स्वीकारताना भावना व्यक्त करताना विकास खन्ना Vikas Khanna म्हणाले, “सूर्यदत्तसारख्या प्रतिष्ठित आणि सेवाभावी संस्थेकडून हा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना मला अत्यंत आनंद आणि समाधान वाटत आहे. हा पुरस्कार माझ्या आजवरच्या प्रवासाला आणि केलेल्या कष्टांना मिळालेली पावती आहे. महाराष्ट्रातील तसेच देशभरातील क्युलिनरी आर्ट्स आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरातून असा सन्मान मिळणे ही अभिमानाची बाब आहे.”
ते Vikas Khanna पुढे म्हणाले, “हॉटेल मॅनेजमेंट हे केवळ करिअर नसून ती एक सेवा आहे. सूर्यदत्त संस्था ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना केवळ पदव्या न देता कौशल्य, मूल्याधिष्ठित शिक्षण आणि सामाजिक जाणीव देण्याचे काम करत आहे, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा संस्थांची मोठी गरज आहे.”
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी खन्ना यांच्या प्रवासाचा गौरव करताना सांगितले की, “अमृतसरच्या अरुंद गल्ल्यांपासून ते न्यूयॉर्कमधील मिशलिन स्टार रेस्टॉरंटपर्यंतचा विकास खन्ना यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी भारतीय पाककलेला जागतिक स्तरावर मानाचे स्थान मिळवून देत हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात नवे मापदंड निर्माण केले आहेत. त्यांच्या योगदानामुळे भारतीय खाद्यसंस्कृतीला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.”
सुषमा चोरडिया यांनीही खन्ना यांच्या यशोगाथेचा उल्लेख करताना सांगितले की, “शेफ विकास खन्ना यांची कथा ही स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे. जिद्द, चिकाटी आणि आपल्या कलेप्रती असलेली निष्ठा असेल तर अमृतसर ते अमेरिका असा प्रवास अशक्य नाही, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या यशातून आमच्या हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना मोठी प्रेरणा मिळेल.”
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनीही खन्ना यांच्याशी संवाद साधत क्युलिनरी आर्ट्स आणि जागतिक हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील संधींबाबत मार्गदर्शन घेतले. त्यांच्या अनुभवांमधून विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर करिअर घडविण्याच्या अनेक शक्यता समजल्या.
सूर्यदत्त संस्थेच्या वतीने अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांना विद्यार्थ्यांसमोर आणण्यावर नेहमीच भर दिला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि जागतिक पातळीवर करिअर घडविण्याची प्रेरणा मिळते, असा विश्वासही संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.




















