यावेळी मराठीतील पहिल्या युट्यूब मालिकेचा अधिकृत शुभारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमास प्रसिद्ध गायक साजन बेंद्रे, सुप्रसिद्ध अभिनेते शिवभक्त सचिन गवळी, मालिकेचे निर्माते सर्जेराव गायकवाड व राम अश्रुजी पाटील, दिग्दर्शक ओंकार नागनाथ पिंपळे, तसेच मालिकेतील सर्व कलाकार व तंत्रज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Marathi YouTube Series युट्यूब मालिकेमुळे मराठी कलाविश्वाला नवे दालन खुले होईल – मेघराज राजेभोसले

पुणे : चित्रपट, ओटीटी आणि दूरदर्शन या तिन्ही माध्यमांचे प्रेक्षक, आशय आणि आर्थिक गणित वेगवेगळे असते. अनेक गुणवंत कलाकारांकडे क्षमता असूनही माध्यमांच्या मर्यादांमुळे त्यांना संधी मिळत नाही. अशा पार्श्वभूमीवर मराठी मनोरंजन ( Marathi YouTube Series ) विश्वात युट्यूब मालिका हे एक नवे आणि प्रभावी व्यासपीठ निर्माण होत असून, ‘तुझ्याचसाठी – एक मन विखुरलेलं’ ही मालिका मराठी कलाविश्वासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी व्यक्त केला.

पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित या मालिकेच्या भव्य लॉन्च सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मराठीतील पहिल्या युट्यूब मालिकेचा अधिकृत शुभारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमास प्रसिद्ध गायक साजन बेंद्रे, सुप्रसिद्ध अभिनेते शिवभक्त सचिन गवळी, मालिकेचे निर्माते सर्जेराव गायकवाड व राम अश्रुजी पाटील, दिग्दर्शक ओंकार नागनाथ पिंपळे, तसेच मालिकेतील सर्व कलाकार व तंत्रज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

( Marathi YouTube Series ) ‘तुझ्याचसाठी – एक मन विखुरलेलं’ या पहिल्या मराठी युट्यूब मालिकेचा भव्य शुभारंभ

मेघराज राजेभोसले पुढे म्हणाले, “मराठी मनोरंजन क्षेत्रात कलाकारांची कमतरता नाही, मात्र माध्यमांची व्याप्ती मर्यादित असल्याने सर्वांनाच संधी मिळतेच असे नाही. युट्यूबसारखे खुले डिजिटल माध्यम कलाकारांसाठी नवे दालन उघडते. ( Marathi YouTube Series ) ‘तुझ्याचसाठी – एक मन विखुरलेलं’ या मालिकेमुळे अनेक नव्या चेहऱ्यांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळेल. निर्मात्यांनी आर्थिक गणित योग्य प्रकारे जुळवले असून, मेहनतीला निश्चितच यश मिळेल. मराठी डिजिटल कंटेंटसाठी ही मालिका एक नवा मापदंड ठरेल.”

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनीही आपल्या मनोगतातून मालिकेच्या निर्मितीमागील प्रवास उलगडला. गायक साजन बेंद्रे यांनी मालिकेतील संगीत व गीतांना प्रेक्षकांचा भावनिक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. अभिनेते सचिन गवळी यांनी युट्यूबसारख्या माध्यमातून दर्जेदार आशय थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो, हे या मालिकेचे वैशिष्ट्य असल्याचे सांगितले.

निर्माते सर्जेराव गायकवाड आणि राम पाटील यांनी या मालिकेची संकल्पना, मेहनत आणि आर्थिक नियोजन याविषयी माहिती दिली. तर दिग्दर्शक ओंकार नागनाथ पिंपळे यांनी भावनिक नातेसंबंध, वास्तववादी मांडणी आणि आजच्या तरुणाईला भिडणारा आशय ही मालिकेची ताकद असल्याचे नमूद केले.

‘तुझ्याचसाठी – एक मन विखुरलेलं’ ही मराठीतील पहिली युट्यूब मालिका ( Marathi YouTube Series ) ९ फेब्रुवारीपासून, सोमवार ते शुक्रवार, सायंकाळी ८ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर सोनवणे यांनी केले.

मराठी मनोरंजन क्षेत्रात डिजिटल माध्यमांच्या नव्या पर्वाची नांदी करणारी ही मालिका प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करेल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

हे ही वाचा : http://Maharashtra Union Budget 2026 महाराष्ट्राला केंद्राकडून सुमारे 1 लाख कोटींचा निधी; विकसित भारताकडे राज्याची भक्कम वाटचाल – देवेंद्र फडणवीस