पुणे : पुणे शहरातील नऊ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या अंतर्गत रस्त्यांवर सिमेंट काँक्रिटीकरण न करता तेथे केवळ डांबरी रस्ते करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पुणे महापालिका Pune Municipal Corporation आयुक्त नवलकिशोर राम यांनी घेतला आहे. पावसाळ्यात सिमेंट रस्त्यांमुळे पाणी साचून वस्त्यांमध्ये शिरत असल्याच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
Pune Municipal Corporation शहरातील अनेक भागांमध्ये सिमेंट रस्त्यांमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नसल्याची समस्या गंभीर बनली आहे. परिणामी मुसळधार पावसात पाणी थेट घरांमध्ये, सोसायट्यांमध्ये आणि पार्किंगमध्ये घुसत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने येत होत्या.
या समस्येची दखल घेत महापालिकेने आता अरुंद रस्त्यांसाठी धोरणात बदल केला आहे.
९०० किमी अरुंद रस्त्यांचा प्रश्न
पुणे शहरात सुमारे ९०० किलोमीटर लांबीचे सहा ते १२ मीटर रुंदीचे रस्ते आहेत. यामध्ये विशेषतः अंतर्गत वसाहतींमधील रस्त्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये पावसाळी गटारांची यंत्रणा अपुरी असल्याने सिमेंट रस्त्यांचा परिणाम अधिक तीव्रतेने जाणवत होता.
सिमेंट रस्त्यांचे तोटे स्पष्ट
सिमेंट काँक्रिटीकरणामुळे पाण्याचा नैसर्गिक निचरा थांबतो, ही मोठी समस्या पुढे आली आहे. तसेच उष्णतेत वाढ होणे, रस्ते गरम होणे आणि परिसरातील तापमान वाढणे यासारखे परिणामही दिसून येतात. शिवाय, पाणी, वीज, गॅस यांसारख्या सेवा वाहिन्यांसाठी वारंवार खोदाई केल्यास सिमेंट रस्त्यांची दुरुस्ती खर्चिक आणि वेळखाऊ ठरते.
डांबरी रस्ते अधिक किफायतशीर
महापालिकेच्या Pune Municipal Corporation आकडेवारीनुसार, सिमेंट रस्त्यासाठी प्रति चौरस मीटर सुमारे ६,००० रुपये खर्च येतो, तर डांबरी रस्त्यासाठी हा खर्च ४,५०० रुपयांपर्यंत मर्यादित आहे. त्यामुळे डांबरीकरण केल्यास मोठ्या प्रमाणावर निधीची बचत होणार आहे.
अभियंत्यांना परिपत्रकाचे आदेश
या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांना परिपत्रक काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार साडेसात ते नऊ मीटर रुंदीच्या रस्त्यांवर सिमेंटऐवजी डांबरीकरणालाच प्राधान्य दिले जाणार आहे.
नगरसेवकांच्या मागण्यांना लगाम
प्रभाग स्तरावरील निधीतून सिमेंट रस्त्यांसाठी नगरसेवकांकडून मोठ्या प्रमाणावर आग्रह धरला जात होता. मात्र, नव्या धोरणामुळे या मागण्यांना मर्यादा येणार असून, शहराच्या दीर्घकालीन गरजांनुसार निर्णय घेतला जाणार आहे.
शहरातील रस्त्यांचे चित्र
पुण्यात Pune Municipal Corporation सध्या सुमारे ९०० किमी डांबरी रस्ते, ४०० किमी सिमेंट काँक्रिट रस्ते आणि १०० किमी रस्ते अद्याप विकसित झालेले नाहीत. याशिवाय समाविष्ट गावांमधील सुमारे ७०० किमी रस्त्यांचा विकासही बाकी आहे.
नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा
महापालिकेच्या Pune Municipal Corporation या निर्णयामुळे पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्येतून नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसेच शहरातील पायाभूत सुविधांचे नियोजन अधिक शाश्वत आणि खर्चिकदृष्ट्या परवडणारे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
















