Municipal Commissioner Naval Kishore Ram

Pune Municipal Corporation वाहतूक व्यवस्था सक्षम, वेगवान करण्यासाठी अल्पकालीन उपाययोजना करणार – आयुक्त नवल किशोर राम

पुणे : पुणे शहरात पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) पोलिस, जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व विभागांना बरोबर घेऊन लोकसहभागातून डिसेंबर २०२६ या एक वर्षाच्या कालावधीत शहरातील रस्ते व वाहतूक व्यवस्थेत चांगला बदल घडलेला दिसेल. शहरातील वाहतूक व्यवस्था सक्षम, सुरक्षित व वेगवान करण्यासाठी महापालिकेकडून अल्पकालीन, मध्यम व दीर्घकालीन उपाययोजना केल्या जाणार आहेत. वेळेचे नियोजन करून अल्पकालीन योजना प्रत्यक्षात उतरविण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे, असे पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.

“देशातील अन्य शहरांच्या तुलनेत पुणे शहर (Pune Municipal Corporation) ३० वर्षात तब्बल ३०० टक्के वाढले आहे. त्या तुलनेत पायाभूत सोई-सुविधा तितक्या झपाट्याने वाढू शकत नाहीत. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होते -अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील

पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने पुण्यातील शहरी गतिशीलता (अर्बन मोबिलीटी ) या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर मंजूषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, विरोधी पक्षनेते ऍड.निलेश निकम, सभागृहनेते गणेश बिडकर यांच्यासह अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी, पवनीत कौर, ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योजक अमित परांजपे, साकार रोबोटीक्सचे सहसंस्थापक डॉ.मनोज पोचट यावेळी उपस्थित होते.

आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, शहरात (Pune Municipal Corporation) पुणेकरांची वाहतूक केवळ ५० टक्के इतकी आहे, तर उर्वरित वाहतूक ग्रामीण भागातून पुणे शहर मार्गे पुढे जाणारी वाहतूक असल्यामुळे वाहतुकीची समस्या उद्भवते.

सध्या मेट्रो, रिंगरोड, मिसिंग लिंकची कामे सध्या सुरु आहेत, पाच वर्षात ही कामे पूर्ण झाल्यानंतर २०३० नंतर पुण्यात वाहतुकीचा प्रश्न उद्भवणार नाही. वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी मोठ्या निधीची नव्हे, तर एकात्मिकपणे कामाची गरज आहे.महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या,

पुणे शहर कोंडीमुक्त करण्यासाठी पालिकेकडे (Pune Municipal Corporation) उपलब्ध असलेल्या साधनसंपत्तीचा प्रभावी वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. अल्पकालीन, तात्काळ करता येणाऱ्या उपायांवर भर देत नागरिकांना सार्वजनिक वाहतूक, बस व मेट्रोचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे गरजेचे आहे.

त्यासाठी प्रत्यक्ष रस्त्यावर चालत पाहणी करून समस्या नोंदविणारे ‘जागल्या’ नेमण्यासारख्या उपक्रमांतून प्रशासन अधिक गतिमानपणे काम करणार आहे. अनिरुद्ध पावसकर यांनी दृकश्राव्य सादरीकरणाद्वारे वाहतुकीची सद्यःस्थिती मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनकर गोजारे यांनी केले.

हे ही वाचा : Pune University Chowk पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोसह डबल डेकर उड्डाणपूल अंतिम टप्प्यात; वाहतुकीच्या कोंडीतून कायमस्वरूपी दिलासा

शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.