Meyor Manjusha Nagpure

Pune waterlogging पुण्यातील १२० पाणी साचणाऱ्या ठिकाणांवर जूनपूर्वी उपाययोजना; अतिक्रमणांवरही कारवाईचा इशारा; नाले-ओढ्यांलगतच्या अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण सुरू; पावसाळ्यापूर्वी प्रशासन सज्ज

पुणे : पुण्यात अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या पाणी साचण्याच्या Pune waterlogging समस्येवर उपाय म्हणून पुणे महापालिकेने मोठी मोहीम हाती घेतली आहे. शहरातील २२७ ठिकाणांपैकी १२० ठिकाणी जूनपूर्वी कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. पुणे शहरात मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अशा एकूण २२७ ठिकाणांची ओळख पटविण्यात आली असून, त्यांचे तीन टप्प्यांत वर्गीकरण करण्यात आले आहे. 

Pune waterlogging वारंवार पाणी साठणार-या  १२० ठिकाणी जूनपूर्वी आवश्यक उपाययोजना पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या सोमवारपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे.

 अवकाळी पावसाने उघड केले व्यवस्थेचे अपयश

गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले Flood-prone areas Pune. काही ठिकाणी पाणी नागरिकांच्या घरात शिरले, तर झाड कोसळून एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. या घटनांमुळे प्रशासनाच्या पूर्वतयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आपत्कालीन बैठकीत महत्त्वाचे निर्णय

या पार्श्वभूमीवर महापौरांनी Manjusha Nagpure तातडीची बैठक बोलावून विविध विभागांना आवश्यक सूचना दिल्या. बैठकीत महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंते आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले.

 नाले-ओढ्यांवरील अतिक्रमण हटवणार

शहरातील पाणी साचण्यामागे नाले आणि ओढ्यांलगत झालेली अनधिकृत बांधकामे हे एक मोठे कारण असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा बांधकामांचे सर्वेक्षण करून त्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अतिक्रमण हटवण्याची मोहीम लवकरच सुरू होणार आहे.

 झाडांच्या छाटणीसाठी वर्षभर मोहीम

पावसात झाडे व फांद्या कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. प्रशासनाने स्पष्ट केले की झाडांची छाटणी ही केवळ पावसाळ्यापूर्वीची मर्यादित प्रक्रिया नसून वर्षभर चालणारी मोहीम आहे. उंच आणि धोकादायक झाडांची छाटणी तसेच आवश्यकतेनुसार हटवण्याची कारवाई केली जाईल.

 नागरिकांच्या नुकसानीचा पंचनामा

अवकाळी पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरून आर्थिक नुकसान झाले आहे. अशा सर्व प्रकरणांमध्ये पंचनामा करून पुढील मदतीचा विचार केला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

धोकादायक होर्डिंग्जवरही कारवाई

जोरदार वाऱ्यामुळे होर्डिंग्ज कोसळण्याच्या घटना लक्षात घेऊन शहरातील अनधिकृत व धोकादायक होर्डिंग्जचे ऑडिट करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

“पुणेकरांना पावसाळ्यात होणारा त्रास कमी करण्यासाठी आम्ही ठोस पावले उचलत आहोत. पाणी साचणाऱ्या १२० ठिकाणांवरील कामे जूनपूर्वी पूर्ण केली जातील. तसेच नाले-ओढ्यांवरील अतिक्रमण आणि धोकादायक होर्डिंग्जवर कोणतीही तडजोड न करता कारवाई केली जाईल,” –  महापौर मंजुषा नागपुरे  Manjusha Nagpure

ही संपूर्ण मोहीम वेळेत पूर्ण झाल्यास यंदाच्या पावसाळ्यात पुणेकरांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा : Chandni Chowk to Bhugaon Road चांदणी चौक–भूगाव मार्ग पुनर्विकासाला ब्रेक; २०० कोटींच्या आराखड्यावर फेरविचाराचे आदेश; स्थायी समितीचा निर्णय; निधीअभावी सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश