पुणेः सर्वोच्च न्यायालयाने ११ ऑगस्ट रोजी लहान मुलांवर झालेल्या श्वान हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना भटक्या श्वानांचा प्रश्न तातडीने सोडवण्याचे निर्देश दिले आहेत.
या आदेशाची अंमलबजावणी न केल्यास कठोर कारवाईचा इशाराही न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे पुणे महापालिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्था युद्धपातळीवर कामाला लागल्या आहेत (stray dog shelters).
राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे महापालिकांना शैक्षणिक संस्था, रुग्णालये, क्रीडा संकुले तसेच बस व रेल्वे स्थानक परिसरातील भटक्या श्वानांसाठी स्वतंत्र निवारे (stray dog shelters) उभारण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पुणे महापालिकेकडून निवाऱ्यांसाठी योग्य जागांचा शोध घेणे व आवश्यक यंत्रणा उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आतापर्यंत शहरात तीन ठिकाणी निवाऱ्यासाठी (stray dog shelters) जागा निश्चित करण्यात आली असून, आणखी १७ जागांचा शोध सुरू आहे. मात्र, शहरात मोकळ्या जागांचा अभाव असल्याने महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या संदर्भात राज्याच्या नगरपरिषद संचालनालयाने १८ ऑगस्ट रोजी एक परिपत्रक जारी करून महापालिका, नगरपरिषद व नगरपंचायतींना भटक्या श्वानांना पकडून त्यांचे लसीकरण व निर्बीजीकरण करून निवाऱ्यात ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच, दोन आठवड्यांच्या आत भटक्या श्वानांची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित संस्थांच्या प्रमुखांनी कुंपण, सीमा भिंत व प्रवेशद्वारे यांसारख्या उपाययोजना करून श्वानांचा मोकाट प्रवेश रोखावा, तसेच एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
Stray Dog Shelters: निवाऱ्यांमुळे वाढणार आर्थिक भार
प्राणी जन्म नियंत्रण नियम २०२३ नुसार निर्बीजीकरण व लसीकरणानंतर श्वानांना त्यांच्या मूळ ठिकाणी सोडण्याची तरतूद होती. मात्र, नव्या आदेशानुसार श्वानांना निवाऱ्यात हलवावे लागणार आहे. त्यामुळे निवारे उभारणे, श्वानांना पकडणे, त्यांना अन्नपुरवठा करणे व देखरेख ठेवणे ही सर्व जबाबदारी महापालिकेवर येणार आहे.
शहरातील सुमारे एक लाख भटक्या श्वानांसाठी किमान २० निवारे (stray dog shelters) उभारावे लागणार असून, खाद्य व मनुष्यबळासाठी दरवर्षी सुमारे १८२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर महापालिकेचे बाणेर, नायडू रुग्णालय व मुंढवा येथील तीन निवारे, तसेच स्वयंसेवी संस्थांचे तीन निवारे असे एकूण सहा निवारे (stray dog shelters) कार्यरत आहेत.
शहरात आणखी २० निवाऱ्यांची गरज असून, त्यापैकी तीन ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक निवाऱ्यात १०० ते १,००० श्वान ठेवण्याचे नियोजन असून, काम वेगाने सुरू आहे, अशी माहिती पशुवैद्यकीय विभागप्रमुख डॉ. सारिका फुंडे यांनी दिली.
हेही वाचाः Homi Bhabha Hospital Pune: ठेकेदारांचे कर्मचारी रुग्णालयातच ठाण मांडून; काम ७ वर्षांपासून प्रलंबित

















1 Comment