पुणे : राजेश पांडे Rajesh Pande यांची भारतीय जनता पक्षाच्या BJP Maharashtra प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही अधिकृत घोषणा केली. त्यामुळे राज्यातील संघटनात्मक बांधणीमध्ये पांडे यांची भूमिका अधिक बळकट झाली आहे.
BJP Maharashtra यापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष असताना लोकसभा निवडणुकीदरम्यान पांडे Rajesh Pande यांच्याकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
आता नव्या अध्यक्षांच्या कार्यसंघातही त्यांना स्थान देण्यात आले असून, संघटनात्मक सातत्य राखण्याचा पक्षाचा स्पष्ट संदेश यातून दिसून येतो.
राजेश पांडे Rajesh Pande यांच्यासह निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक आणि सुनील राणे हे सरचिटणीस म्हणून काम पाहणार आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील ही टीम आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे.
४० वर्षांहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले पांडे हे अभ्यासू, मितभाषी आणि कुशल संघटक म्हणून ओळखले जातात.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीत वाढलेले आणि विद्यार्थी चळवळीतील कार्यातून घडलेले नेतृत्व म्हणून त्यांची प्रतिमा आहे.
त्यांच्या Rajesh Pande सार्वजनिक जीवनाची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मधून झाली.
पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात संघटनात्मक विस्तार घडवून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. युवक आणि लोकसहभागाच्या माध्यमातून राबवलेल्या उपक्रमांमुळे त्यांनी ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ स्तरावरील नोंदी घडवून आणल्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यासह राज्यातील तीन प्रमुख विद्यापीठांच्या व्यवस्थापन परिषदांवर त्यांनी सदस्य म्हणून काम केले आहे.
विशेष म्हणजे, त्यांच्या Rajesh Pande पुढाकाराने सुरू झालेल्या पुणे पुस्तक महोत्सव या उपक्रमाने गेल्या तीन वर्षांत जागतिक स्तरावर ओळख निर्माण केली आहे. वाचन संस्कृतीला चालना देणाऱ्या या महोत्सवाने १५ हून अधिक विश्वविक्रम नोंदवत अभूतपूर्व यश संपादन केले आहे. सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रातील या कार्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक नियोजनातही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.
पक्षनिष्ठा, संघटन कौशल्य आणि सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पांडे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे, असे पक्षांतर्गत बोलले जात आहे. पश्चिम महाराष्ट्रात तसेच राज्यभरातील कार्यकर्त्यांना या नियुक्तीमुळे नवचैतन्य मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
दरम्यान, नियुक्तीनंतर पांडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “गेल्या ४० वर्षांपासून सामाजिक जीवनात कार्यरत आहे. एका सामान्य कार्यकर्त्यावर पक्षाने पुन्हा विश्वास दाखवून मोठी जबाबदारी दिली, याबद्दल मी केंद्रीय नेतृत्व, प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांचा आभारी आहे.
आगामी काळात संघटना अधिक भक्कम करण्यासाठी नव्या ऊर्जेने काम करणार आहे.”
राज्यातील आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजेश पांडे यांची ही नियुक्ती संघटनात्मक दृष्ट्या महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

















1 Comment