दिल्ली ;- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्प Union Budget 2026 सादर करताना देशाच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला. गेल्या १२ वर्षांत भारताने सातत्याने प्रगती केली असून गुंतवणुकीला चालना मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. जीएसटी अधिक सोपी करणे, उद्योगस्नेही वातावरण निर्माण करणे आणि रोजगाराच्या नव्या संधी वाढवणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पातील घोषणांमुळे Union Budget 2026 सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करणाऱ्या वस्तू स्वस्त-महाग झाल्या आहेत.
काय स्वस्त झालं ? Union Budget 2026
या अर्थसंकल्पात Union Budget 2026 आरोग्य, हरित ऊर्जा आणि देशांतर्गत उत्पादनाला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे वैद्यकीय उपकरणे, कॅन्सर व मधुमेहाची औषधे स्वस्त होणार आहेत. याचा थेट फायदा रुग्णांना आणि आरोग्य क्षेत्राला होईल.
हरित ऊर्जेला चालना देण्यासाठी लिथियम-आयन बॅटरी, ईव्ही बॅटरी, ईव्ही वाहने, सौर पॅनेल आणि सोलरशी संबंधित वस्तूंवरील शुल्कात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहने आणि सौरऊर्जेचा वापर वाढण्याची शक्यता आहे.
तंत्रज्ञानाच्या बाबतीत मोबाईल फोन, एलसीडी व एलईडी टीव्ही स्वस्त होणार असून ग्राहकांसाठी ही दिलासादायक बाब आहे. “मेक इन इंडिया”ला बळ देण्यासाठी भारतात बनवलेले कपडे, बूट आणि क्रीडा साहित्य स्वस्त करण्यात आले आहेत.
वाहतुकीच्या दृष्टीने मोटारसायकल, सीएनजी, बायोगॅस स्वस्त झाल्याने मध्यमवर्गीयांना दिलासा मिळणार आहे.
तसेच फ्रोझन मासे, अपघात विमा आणि परदेशात शिक्षण घेणे यांचाही खर्च कमी होणार असल्याने विविध क्षेत्रांना फायदा होईल.
काय महाग झालं ? Union Budget 2026
दुसरीकडे, आरोग्य आणि सामाजिक दुष्परिणाम लक्षात घेऊन सरकारने तंबाखूजन्य पदार्थांवर कडक भूमिका घेतली आहे. चघळण्याचा तंबाखू, फिल्टर खैनी, जर्दा, गुटखा महाग झाले आहेत. तसेच दारूवरील कर वाढल्याने मद्यप्रेमींना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
उद्योग आणि वित्त क्षेत्रात पीव्हीसी फ्लेक्स शीट्स, इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्ले, भंगार, खनिजे महाग झाली आहेत. गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाच्या असलेल्या ऑप्शन ट्रेडिंगवरही कराचा बोजा वाढवण्यात आला आहे.
एकूणच, हा अर्थसंकल्प Union Budget 2026 पर्यावरणपूरक, आरोग्यस्नेही आणि उत्पादनाभिमुख असून सर्वसामान्यांना काही बाबतीत दिलासा देणारा, तर काही क्षेत्रांवर शिस्त आणणारा ठरतो, असे चित्र आहे.
हे ही वाचा :- http://Firing at Rohit Shetty house बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार; मुंबई हादरली, गुन्हे शाखेचा तपास सुरू




















Leave a Reply