PMC BJP Candidate List
PMC BJP Candidate List

PMC BJP Candidate List: आमदार-खासदारांच्या नातेवाईकांना उमेदवारी नाही

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी (PMC BJP Candidate List) आज संध्याकाळनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधीच पक्षातील आमदार आणि खासदारांना मोठा धक्का देणारी माहिती समोर आली आहे.

या निवडणुकीत आमदार व खासदारांनी त्यांच्या मुला-मुलींसाठी किंवा जवळच्या नातेवाईकांसाठी केलेल्या शिफारसींना उमेदवारी दिली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी लॉबिंग करणाऱ्या अनेक मान्यवरांना जोरदार झटका बसला आहे.

PMC BJP Candidate List: २३०० हून अधिक इच्छुकांचे अर्ज दाखल

पुणे महापालिकेच्या १६५ जागांसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले होते. त्यासाठी तब्बल २३०० हून अधिक इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. याच दरम्यान इतर पक्षांमधील दहाहून अधिक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षातील अंतर्गत स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे.

या परिस्थितीत अनेक जुने, निष्ठावंत भाजप कार्यकर्ते निवडणूक लढवू शकणार नाहीत, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यातच शहरातील काही आमदार आणि खासदारांनी त्यांच्या मुलांना किंवा नातेवाईकांना उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न केल्याची चर्चा होती.

मात्र पक्षाने भूमिका स्पष्ट करत आमदार आणि खासदारांच्या नातेवाईकांना उमेदवारी (PMC BJP Candidate List) दिली जाणार नसल्याचे ठामपणे सांगितले आहे. केवळ एखादा नातेवाईक पूर्वीपासून सक्रियपणे भाजपमध्ये काम करत असल्यास, त्याच्या उमेदवारीचा स्वतंत्रपणे विचार केला जाऊ शकतो, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या मुलीच्या उमेदवारीबाबत पक्षातील काही नेत्यांनी विचारणा केली होती. मात्र कुलकर्णी यांनी स्वतः नकार देत प्रभाग क्रमांक २९ एरंडवणे-हॅपी कॉलनी येथून त्यांच्या दोन कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याचा आग्रह धरल्याने पक्षात याबाबत जोरदार चर्चा झाल्याची माहिती आहे.

आमदार आणि खासदारांच्या घरातील उमेदवारांना संधी दिल्यास पक्षातील नाराजी वाढू शकते आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ शकतो, या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री उशिरा नातेवाईकांना उमेदवारी देऊ नये, अशा सूचनेसह सुधारित यादी प्रदेश पातळीवर पाठवण्याचा आदेश देण्यात आल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले (PMC BJP Candidate List).

हेही वाचाः Aam Aadmi Party: पुण्यात १०० हून अधिक जागांवर आप लढणार महापालिका निवडणूक 

शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.