पुणे : Pune Municipal Corporation पुणे महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक Shrinath Bheemle यांची बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार Suhas Tingre यांचा उमेदवारी अर्ज एक मिनिट उशिरा दाखल झाल्याचे कारण देत निवडणूक अधिकारी Satishkumar Khadke यांनी तो अवैध ठरवला आणि भिमाले यांच्या निवडीची घोषणा केली.
Pune Municipal Corporation स्थायी समितीत भाजपचे १२ सदस्य असल्याने अध्यक्षपदाची निवडणूक औपचारिक ठरणार हे स्पष्ट होते. भाजपकडून भिमाले तर राष्ट्रवादीकडून टिंगरे यांना उमेदवारी देण्यात आली होती.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान टिंगरे यांनी नगरसचिवांकडे अर्ज सादर केला; मात्र तो नियोजित वेळेपेक्षा एक मिनिट उशिरा आल्याचे सांगत निवडणूक अधिकाऱ्यांनी तो फेटाळला.
यावेळी राष्ट्रवादीच्या माजी महापौर Vaishali Bankar तसेच काँग्रेसचे माजी महापौर Prashant Jagtap यांनी टिंगरे अर्ज दाखल करण्यापूर्वी कार्यालयात उपस्थित होते, त्यामुळे अर्ज वैध धरावा अशी मागणी केली. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी नियमांनुसार निर्णय घेतल्याचे सांगत भिमाले यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली.
महापौर Manjusha Nagpure, सभागृहनेते Ganesh Bidkar आणि भाजप शहराध्यक्ष Dheeraj Ghate यांच्यासह स्थायी समिती सदस्यांनी भिमाले यांचे अभिनंदन केले.
भिमाले यांचा विकासाचा रोडमॅप
निवडीनंतर बोलताना भिमाले यांनी शहराच्या विकासासाठी ठोस भूमिका मांडली. “नगरसेवक हा नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दुवा आहे. आता हे काम अधिक जबाबदारीने पार पाडू,” असे त्यांनी सांगितले. भाजप सत्ताकाळात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पुण्यात अनेक प्रकल्पांना गती मिळाल्याचा दावा त्यांनी केला.
त्यांनी नमूद केले की, पंतप्रधान Narendra Modi आणि मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या माध्यमातून शहरात एसटीपी प्रकल्प, इलेक्ट्रिक बस सेवा, विमानतळ विस्तारीकरण, विविध पायाभूत सुविधा विकास यांसारखे उपक्रम अंतिम टप्प्यात आहेत. “हे प्रकल्प मार्गी लावणे आणि पुढील पंचवार्षिक आराखड्याला दिशा देणे हा आमचा संकल्प आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
उत्पन्नवाढीवर भर, २३ गावांचा विकास प्राधान्याने
महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या विकासाचा मुद्दा त्यांनी विशेषत्वाने उपस्थित केला. “या भागांचा विकास आराखडा (डीपी) रद्द झाल्यानंतर नव्या नियोजनानुसार विकास करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू. महसूल वाढवण्यासाठी विविध पर्यायांचा अभ्यास करू,” असे ते म्हणाले.
महापालिकेचे उत्पन्न वाढवणे ही पहिली प्राथमिकता असल्याचे सांगत त्यांनी पीपीपी मॉडेल, सीएसआर निधी तसेच राज्य व केंद्र सरकारच्या योजनांच्या माध्यमातून प्रकल्प राबवण्यावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले. “महापालिकेवर अतिरिक्त आर्थिक भार न टाकता प्रकल्प पूर्ण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे,” असे त्यांनी सांगितले.
पुढील पंचवार्षिकसाठी दीर्घकालीन नियोजन
रिंग रोड, विमानतळ विस्तार, नव्याने समाविष्ट भागांचा समतोल विकास आणि अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल, असे भिमाले यांनी सांगितले. “फक्त एका वर्षाचा विचार न करता पुढील पंचवार्षिक डोळ्यासमोर ठेवून नियोजन करू. पुणे शहर विकसित करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारची मदत घेऊ,” असे त्यांनी नमूद केले.
भाजपच्या संख्याबळावर शिक्कामोर्तब झालेली ही निवडणूक आणि त्यानंतर मांडलेला विकासाचा आराखडा यामुळे पुणे महापालिकेतील पुढील राजकीय घडामोडींकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
















1 Comment