Architects Engineers Surveyors Association

Pune Architecture Awards पायाभूत विकास, बांधकाम क्षेत्रामध्ये आर्किटेक्टचे मोलाचे  योगदान, आर्कि. विलास अवचट यांचे प्रतिपादन; आर्किटेक्ट, इंजिनिअर्स अँड सर्व्हेयर्स असोसिएशनतर्फे ‘एईएसए वार्षिक पुरस्कार’ वितरण

पुणे: Pune Architecture Awards “पायाभूत सुविधा, बांधकाम क्षेत्राचा विकास झपाट्याने होत असून, त्यामध्ये आर्क्टिकेट बहुमूल्य योगदान देत आहेत. इंजिनिअर आणि आर्क्टिकेट यांची देशाला नवीन आकार देण्यात महत्वपूर्ण भूमिका आहे. बदलत्या काळात तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्पर्धात्मक व आव्हानात्मक प्रकल्प उभारणे सोपे होत आहे,” असे प्रतिपादन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सचे अध्यक्ष आर्कि. विलास अवचट यांनी केले. कृत्रिम बुद्धिमतेसारखे तंत्रज्ञान अवगत करून आर्किटेक्ट्सनी स्वतःला समृद्ध करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

आर्किटेक्ट, इंजिनिअर्स अँड सर्व्हेयर्स असोसिएशनतर्फे (एईएसए-एसा) आयोजित ‘एईएसए वार्षिक पुरस्कार’ वितरण सोहळ्यात Pune Architecture Awards अवचट बोलत होते. पुरस्काराचे हे ३१ वे वर्ष होते.

पुणे स्टेशनजवळील हॉटेल शेरेटोन ग्रँड येथे झालेल्या सोहळ्यावेळी ‘एईएसए’चे अध्यक्ष आर्कि. राजीव राजे, चेअरमन आर्कि. महेश बांगड, संयोजक इंजि. पराग लकडे, बी. जी. शिर्के उद्योग समूहाचे व्हाईस चेअरमन आर. बी. सूर्यवंशी, संचालक वाय. पी. काजळे, वरिष्ठ उपाध्यक्ष बी. पी. कुलकर्णी, आर्कि. विश्वास कुलकर्णी आदी उपस्थित होते.

यावेळी बीएनसीए व एईएसए यांच्यात पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिल्ट एन्व्हायर्नमेंटसाठी सामंजस्य करार झाला. आर्कि. राजीव राजे आणि डॉ. अनुराग कश्यप यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

आर्कि. विलास अवचट म्हणाले, “आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स व संबंधित क्षेत्रात कार्यरत असलेल्या घटकांसाठी काम करणारी ही संस्था आहे. वार्षिक पुरस्कार सोहळा चांगल्या कामाचे कौतुक करणारा उपक्रम आहे. गेल्या ५५ वर्षांत ‘एईएसए’ संस्थेने वेगवेगळे इंजिनिअर्स, आर्किटेक्ट, सर्व्हेयर्स जोडले आहेत.

व्यावसायिकांनी एकत्रितपणे चांगले काम केल्यास कोणतेही काम मोठे किंवा छोटे असा भेदभाव राहत नाही. पुढील चार दशकात देश मोठ्या प्रमाणात विकास साधणार आहे. त्याचे साक्षीदार व साथीदार होण्याची संधी आपल्याला आहे.”

आर्कि. पंकज भागवतकर यांना ‘रोहन यंग अचिवर्स अवॉर्ड’, आर्कि. तुषार कोठावदे यांच्या ग्रंथालयला पुणे शहराबाहेरील, तर आर्कि. हेमंत शांताराम महाजन यांच्या पुण्यातील पीवायसी हिंदू जिमखाना विंचूरकर पॅव्हेलियनला ‘नॉन रेसिडेन्शियल पब्लिक अँड कल्चरल बिल्डिंग’ पुरस्कार, आर्कि. सौरभ मालपाणी यांच्या ‘अ व्हिला इन पुणे’ प्रकल्पाला, तर आर्कि. पूजा चाफळकर यांच्या जोशेट फार्म्सस्टे प्रकल्पाला, तर आर्कि. अभिषेक आहेर यांच्या ऐक्यम प्रकल्पाला ‘सिंगल रेसिडेन्शियल फॅमिली होम’ पुरस्कार,

आर्कि. हेमंत शांताराम महाजन, आर्कि. धैर्यशील पोवार आणि माहेश्वरी डेव्हलपर्स यांना ‘रेसिडेन्शियल स्टँड अलोन मल्टीटेनिमेंट बिल्डिंग पुरस्कार’, आर्कि. विकास अचलकर यांच्या मॉँट क्लेअर प्रकल्पाला ‘नॉन रेसिडेन्शियल कमर्शियल’ पुरस्कार, तर आर्कि. शिरीष केंभावी यांच्या नॅशनल फिल्म अर्काइव्ह्ज प्रकल्पाला ‘नॉन रेसिडेन्शियल इन्स्टिट्यूशनल’ पुरस्कार, तर आर्किटेक्ट युनायटेडच्या केएसबी लिमिटेडचे प्रशासकीय कार्यालय प्रकल्पाला ‘इंडस्ट्रियल बिल्डिंग अँड कॅम्पसेस’ पुरस्कार करण्यात आला.

बी. पी. कुलकर्णी, आर्कि. राजीव राजे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. आर्कि. महेश बांगड यांनी स्वागत प्रास्ताविक केले. आर्कि. आलोका काळे यांनी सूत्रसंचालन केले. इंजि. पराग लकडे यांनी आभार मानले.

हे ही वाचा :Dr Dudhbhate Netralaya “गौरव तीच्या कर्तृत्वाचा” : महिला दिनी कर्तृत्ववान महिलांचा दिमाखात सन्मान; डॉ. दुधभाते नेत्रालय व आदित्य फाउंडेशनचा उपक्रम; सावित्रीबाई फुले पुरस्कारांनी तीन महिलांचा गौरव, समाजाला प्रेरणादायी संदेश