यावेळी संस्थेचे सहकार्यवाह मुकुल पाटगावकर यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे कार्यकारिणी सदस्य विनायक डंबीर तसेच रा.स्व.संघाचे प्रांत प्रचार प्रमुख अतुल अग्निहोत्री यांची प्रमुख उपस्थिती होती.

Shriguruji Award दादा लाड, भारतभूषणदासजी महाराज यांना जनकल्याण समितीचा ‘पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार’

पुणे : शेती संशोधन आणि समाजप्रबोधनाच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या दोन व्यक्तिमत्त्वांना यंदाचा प्रतिष्ठेचा ( Shriguruji Award ) ‘पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. शेतीभूषण श्रीरंग देवबा लाड (दादा लाड) आणि वाराणसीचे आचार्य श्री महंत भारतभूषणदासजी महाराज यांचा या पुरस्काराने सन्मान होणार आहे.

( Shriguruji Award ) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे प्रतिवर्षी दिल्या जाणा-या या पुरस्काराचे हे ३१ वे वर्ष आहे. 

पुण्यात शनिवार, दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजता सिम्बायोसिस, विमाननगर येथील एसव्हीसी सभागृहात होणाऱ्या समारंभात ( Shriguruji Award ) हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक मा. स. गोळवलकर उपाख्य श्रीगुरुजी यांच्या जयंतीनिमित्ताने हा राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो.

जनकल्याण समितीचे कार्यवाह राजन गोर्‍हे यांनी बुधवारी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत पुरस्कारांची अधिकृत घोषणा केली. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपये रोख असे आहे.

अनुसंधान क्षेत्रातील योगदानासाठी दादा लाड यांना, तर समाजप्रबोधन क्षेत्रातील कार्यासाठी आचार्य भारतभूषणदासजी महाराज यांना हा सन्मान प्रदान केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

( Shriguruji Award ) या पुरस्कार वितरण समारंभाला प्रसिद्ध उद्योगपती डॉ. अभय फिरोदिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, रा.स्व.संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेयजी होसबाळे हे प्रमुख वक्ते असतील.

शेती संशोधनात दादा लाड यांचे भरीव योगदान

दादा लाड यांनी शेती क्षेत्रात केलेले संशोधन देशपातळीवर दखलपात्र ठरले आहे. कापूस उत्पादन वाढीसाठी विकसित केलेले ‘दादा लाड तंत्रज्ञान’ भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) यांच्याकडून मान्यताप्राप्त आहे. कापसासोबतच ज्वारी, गहू, सोयाबीन आणि तूर या पिकांच्या लागवड व उत्पादन वाढीसाठी त्यांनी केलेले प्रयोग आणि मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहे.

याशिवाय लाल कंधारी देशी गायींच्या संवर्धन आणि प्रसारासाठी त्यांनी केलेले कार्यही उल्लेखनीय आहे. स्वदेशी शेती, जैवविविधता आणि शाश्वत कृषी पद्धती यांचा पुरस्कार करणारे त्यांचे संशोधन शेती क्षेत्रासाठी दिशादर्शक मानले जाते.

समाजप्रबोधनात भारतभूषणदासजी महाराजांचे प्रेरणादायी कार्य

आचार्य श्री महंत भारतभूषणदासजी महाराज गेली अनेक वर्षे समाजप्रबोधन आणि सामाजिक समरसतेसाठी कार्यरत आहेत. संत गुरु रविदास यांनी दिलेला समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश त्यांनी देशभर पोहोचवला आहे.

उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, ओडिशा, राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीसह विविध राज्यांमध्ये त्यांनी केलेले प्रवचन, संवाद आणि प्रबोधन कार्य समाजाला जोडणारे ठरले आहे. समाजातील भेदभाव, अंधश्रद्धा व कुरीती दूर करण्यासाठी त्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न उल्लेखनीय आहेत.

जनकल्याण समितीचे ( Janakalyan Samiti ) व्यापक सेवाकार्य

‘जनकल्याण समिती’तर्फे ( Janakalyan Samiti ) महाराष्ट्रात आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, पूर्वांचल विकास आणि दिव्यांग कल्याण या पाच प्रमुख क्षेत्रांत १७ मोठे सेवा प्रकल्प राबवले जात आहेत.

यामध्ये आठ शहरांतील पूर्वांचल वसतिगृहे, रुग्णालये, आरोग्य सल्ला व समुपदेशन सेवा, रुग्णसेवा, तीन रक्तकेंद्रे, पुण्यातील सेवा भवन, सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्र, सिकल सेल व थॅलेसेमिया प्रकल्प, दिव्यांगांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच तीन जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रांचा समावेश आहे.

या पुरस्कार समारंभाला पुणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दादा लाड आणि आचार्य श्री महंत भारतभूषणदासजी महाराज यांच्या कार्याला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जनकल्याण समितीने केले आहे.

यावेळी संस्थेचे सहकार्यवाह मुकुल पाटगावकर यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे कार्यकारिणी सदस्य विनायक डंबीर तसेच रा.स्व.संघाचे प्रांत प्रचार प्रमुख अतुल अग्निहोत्री यांची प्रमुख उपस्थिती होती.

हे ही वाचा : http://Pune Municipal Corporation पुणे महापालिकेत भाजपचे धक्कातंत्र : मंजुषा नागपुरे महापौर, परशुराम वाडेकर उपमहापौर निश्चित

शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.