Modi Govt 12 Years
Modi Govt 12 Years

Modi Govt 12 Years विकसित भारत २०४७’ चा भक्कम पाया गेल्या १२ वर्षांतच रचला गेला! पुण्यासाठी विशेष प्रकल्पांची घोषणा; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या यशस्वी १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त पुण्यात विशेष पत्रकार परिषद

पुणे : “स्वातंत्र्याच्या शताब्दीनिमित्ताने सन २०४७ मध्ये जो विकसित भारत निर्माण होणार आहे, त्याचा अत्यंत मजबूत आणि भक्कम पाया गेल्या १२ वर्षांत (Modi Govt 12 Years) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रचला गेला आहे. भारताने केवळ देशांतर्गत प्रगती केली नसून जागतिक स्तरावर आपले स्थान अत्यंत भक्कम केले आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय नागरी विमानसेवा आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.

(Modi Govt 12 Years) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या यशस्वी तपपूर्तीनिमित्त (१२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल) पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहर कार्यालयात विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न नाना काटे, पुणे जिल्हा ग्रामीण (उत्तर) चे अध्यक्ष प्रदीप कंद, पुणे जिल्हा ग्रामीण (दक्षिण) चे अध्यक्ष शेखर वढणे आदी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींचा ऐतिहासिक विक्रम: सलग ४,९९३ दिवस देशसेवा

पत्रकार परिषदेत बोलताना मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) म्हणाले की, सन २०१४ मध्ये देशातील जनतेने भाजप आणि एनडीए (NDA) आघाडीवर विश्वास ठेवून स्पष्ट बहुमताची सत्ता दिली. ‘सबका साथ, सबका विकास’ या महामंत्रामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग १२ वर्षे (Modi Govt 12 Years) देशाच्या सर्वोच्च पदावर कार्यरत राहिले आहेत. १० जून २०२६ रोजी सलग ४,९९३ दिवस पंतप्रधानपदावर राहण्याचा ऐतिहासिक विक्रम मोदी यांनी केवळ देशातील जनतेच्या अतूट विश्वासाच्या बळावर केला आहे. मागील १२ वर्षांत सरकारने केलेली अभूतपूर्व आणि लोकाभिमुख विकासकामे घेऊनच आम्ही आगामी काळात जनतेमध्ये जात आहोत.

आर्थिक महासत्ता आणि महागाईवर नियंत्रण

मोदी सरकारच्या काळातील (Modi Govt 12 Years) आर्थिक यशाचा पाढा वाचताना मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी सांगितले की, भारताची अर्थव्यवस्था पूर्वी जगामध्ये ११ व्या स्थानावर रेंगाळत होती, ती आता थेट ४ थ्या स्थानावर पोहोचली आहे. युपीए (UPA) सरकारच्या काळात महागाईचा सरासरी दर १० टक्के इतका चढा होता, तो मोदी सरकारच्या काळात अत्यंत कौशल्याने हाताळून सरासरी ५.१ टक्क्यांवर मर्यादित ठेवण्यात सरकारला मोठे यश आले आहे.

गरीब कल्याण योजना आणि पारदर्शक कारभार

देशातील सुमारे २५ टक्के लोकसंख्या आता दारिद्र्यरेषेच्या बाहेर आली आहे. विविध लोककल्याणकारी योजनांमुळे देशातील ५० टक्के जनता थेट शासकीय योजनांची लाभार्थी बनली असून, ८० टक्के जनतेला मोफत धान्य पुरवले जात आहे. काँग्रेसच्या काळातील भ्रष्टाचाराला आणि मध्यस्थांना आळा घालत मोदी सरकारने (Modi Govt 12 Years) थेट लाभ हस्तांतरणच्या (DBT) माध्यमातून तब्बल ५१ लाख कोटी रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले आहेत. 

पायाभूत सुविधांचा वेगवान विकास आणि मेट्रो नेटवर्क

महामार्ग निर्मितीचा वेग: देशात पूर्वी राष्ट्रीय महामार्ग उभारणीचा दर प्रतिदिन ११ किमी होता, (Modi Govt 12 Years) तो आता दररोज ३४ किमी इतका वाढला आहे. रेल्वेचे १०० टक्के विद्युतीकरण आणि वंदे भारत ट्रेनचा वेगाने होणारा विस्तार हे देशाच्या आधुनिकतेचे प्रतीक आहे.

मेट्रो नेटवर्कचे जाळे: देशातील केवळ ५ शहरांमधील २४८ किमीचा मेट्रो मार्ग आता २३ शहरांमध्ये १ हजार ९३ किमीपर्यंत विस्तारित करण्यात आला आहे.

हवाई वाहतूक क्षेत्रातील मोठी झेप

केंद्रीय नागरी विमानसेवा राज्यमंत्री म्हणून मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी हवाई क्षेत्रातील क्रांतीवर विशेष प्रकाश टाकला. १२ वर्षांपूर्वी देशात केवळ ७४ विमानतळे कार्यरत होती, आज (Modi Govt 12 Years) त्यांची संख्या १६५ वर पोहोचली आहे. ‘उडान’ योजनेचा १.५ कोटी प्रवाशांनी लाभ घेतला असून, स्वस्त दरात खाद्यपदार्थ मिळण्यासाठी ‘उडान कॅफे’ सुरू करण्यात आले आहेत. तसेच उडान २.० अंतर्गत आणखी १२० नवीन स्थानांवरून सुमारे ४ कोटी प्रवाशांना याचा थेट फायदा होणार आहे. याशिवाय, जनधन योजनेंतर्गत देशात ५६ कोटी बँक खाती उघडण्यात आली असून आज जगात सर्वाधिक डिजिटल आर्थिक व्यवहार भारतात होत आहेत.

पुण्याच्या विकासासाठीचे विशेष प्रकल्प

पुण्याचे प्रतिनिधित्व करताना मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासासाठी सुरू असलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती दिली: (Modi Govt 12 Years)

वाहतूक कोंडीवर मात: पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी ५६ किलोमीटरचे भुयारी मार्ग निर्माण करण्याचे काम वेगाने सुरू आहे. 

मेट्रो थेट विमानतळापर्यंत: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लवकरच सुरू होणार असून, आगामी काळात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिक थेट मेट्रोने विमानतळापर्यंत प्रवास करू शकतील. 

विमानतळ विस्तार: पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल तयार झाले असून, धावपट्टी विस्तारीकरणासाठी ३१३ एकर जागा घेऊन काम वेगाने सुरू आहे. 

ई-बसेस मंजुरी: पुण्यासाठी १ हजार नवीन ई-बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे पुण्याची सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम व पर्यावरणपूरक होईल.

शेवटी बोलताना मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी स्पष्ट केले की, (Modi Govt 12 Years) देशात स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना करून देशाचा १/३ भाग सहकाराशी जोडला गेला आहे, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. तसेच संरक्षण क्षेत्रात पावणेसात लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, एकेकाळी आयातदार असलेला भारत आज ९० हून अधिक देशांना २३ हजार कोटी रुपयांचे संरक्षण साहित्य निर्यात करत आहे.

हे ही वाचा :  Pune Nashik Railway पुणे-नाशिक रेल्वेला ‘GMRT’चा तांत्रिक अडथळा नाही, पण ‘डिंभे’च्या पाणी वळवण्याच्या बोगद्याला आमचा तीव्र विरोध कायम! – दिलीप वळसे पाटील; परदेशी तज्ज्ञांच्या प्राथमिक अभिप्रायाची माजी गृहमंत्र्यांनी दिली माहिती