पुणे : हिंजवडीतील नामांकित आयटी कंपनीसोबतच्या कराराचा fake invoices scam गैरफायदा घेत ऑटोरायडर इंटरनॅशनल या कंपनीतील कर्मचाऱ्याने तब्बल ४२ लाख ५० हजार ९४४ रुपयांचा घोटाळा केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुणे पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला असून या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची सखोल छाननी केली जात आहे
बनावट बुकिंग आणि खोटी बिले तयार करून fake invoices scam तब्बल ९४० व्यवहारांद्वारे ही फसवणूक करण्यात आली असल्याने आयटी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
फिर्यादीनंतर गुन्हा दाखल
या प्रकरणी कंपनीचे असिस्टंट ब्रांच मॅनेजर परवेझ पठाण (रा. दौंड) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ग्राहक सेवा प्रतिनिधी मुकेश धर्मपाल धिंग्रा (रा. निगडी) याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला असून या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची सखोल छाननी केली जात आहे.
दीड वर्ष चालला घोटाळा
बंडगार्डन रोडवरील अशोका मॉल येथील कार्यालयातून हा संपूर्ण प्रकार २० एप्रिल २०२४ ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत सुरू होता. या काळात आरोपीने अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने बनावट बिले तयार करून कंपनीची फसवणूक केली. सुरुवातीला कोणालाही संशय न येता हा प्रकार दीड वर्षांहून अधिक काळ सुरू राहिला.
कामकाजाच्या पद्धतीचा गैरवापर
ऑटोरायडर इंटरनॅशनल AutoRider ही कंपनी व्यावसायिक संस्थांना भाड्याने गाड्या पुरविण्याचे काम करते. इन्फोसिस Infosys कंपनीसोबत १९९७ पासून असलेल्या करारानुसार गाड्यांचे बुकिंग ‘आय ट्रॅव्हल’ पोर्टलवरून केले जात होते. प्रत्येक बुकिंगला युनिक आयडी दिला जात होता. ही सर्व माहिती एक्सेल शीटमध्ये तयार करून पुणे व दिल्ली कार्यालयात पाठविली जात होती.
बनावट बिले तयार करण्याची पद्धत
मुकेश धिंग्रा याच्याकडे कंपनीच्या ऑपरेशनल सॉफ्टवेअरचा ऍक्सेस होता. याचाच गैरफायदा घेत त्याने स्वतःच्या लॉगिन आयडीवरून बनावट बुकिंग तयार केली. त्यानंतर खोटी बिले जनरेट करून ती प्रणालीमध्ये अपलोड केली जात होती. ग्राहकांकडून मिळणारे पैसे मात्र कंपनीत जमा न करता आरोपी स्वतःकडे ठेवत होता.
समेट प्रक्रियेत उघड झाला प्रकार
जुलै २०२५ मध्ये नियमित समेट (reconciliation) प्रक्रियेदरम्यान बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळली. यानंतर कंपनीने Infosys अंतर्गत चौकशी सुरू केली. तपासात अनेक बिले इन्फोसिसच्या Infosys अधिकृत नोंदींमध्ये नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार बनावट असल्याचे उघड झाले.
इन्फोसिसकडूनही दुजोरा
इन्फोसिसच्या Infosys बिलिंग विभागाशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी संबंधित बिले त्यांच्या प्रणालीतील नसल्याचे स्पष्ट केले. तसेच अशा कोणत्याही बुकिंगची नोंद नसल्याचे सांगितले. यामुळे घोटाळ्याची खात्री पटली आणि कंपनीने पोलिसांत धाव घेतली.
ग्राहकांकडून थेट पैसे उकळले
आरोपीने बनावट बुकिंग दाखवून अनेक ग्राहकांकडून थेट पैसे घेतल्याचे तपासात समोर आले आहे. काही ग्राहकांनी ऑनलाइन तर काहींनी रोख स्वरूपात पैसे दिल्याची कबुली दिली. धक्कादायक बाब म्हणजे काही प्रकरणांत गाड्याच पोहोचल्या नव्हत्या, तर काही बुकिंग जुन्या नोंदींवर आधारित असल्याचेही आढळले.
पोलिस तपास वेगात
या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक हंडाळ करत असून आरोपीने आणखी किती व्यवहारांमध्ये फसवणूक केली आहे, याचा शोध घेतला जात आहे. आर्थिक गैरव्यवहाराच्या या प्रकारामुळे कंपन्यांनी अंतर्गत नियंत्रण प्रणाली अधिक मजबूत करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
विश्वासावर आधारित सेवा व्यवस्थेतच असा घोटाळा घडल्याने उद्योग क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. डिजिटल प्रणाली असूनही मानवी हस्तक्षेपामुळे फसवणूक शक्य असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.