पुणे : सिंहगड रस्त्यावरील दररोजच्या वाहतूक कोंडीवर (Sinhagad Road Traffic) कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी धायरी, नऱ्हे, नांदेड सिटी, वडगाव ते दांडेकर पूल या परिसरातील प्रमुख रस्ते, पर्यायी मार्ग आणि चौकांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश महापौर मंजूषा नागपुरे Manjusha Nagpure यांनी वाहतूक पोलिसांना दिले. सर्वेक्षणाचा सविस्तर अहवाल १५ दिवसांत पुणे महापालिकेला सादर करण्यास सांगण्यात आले आहे. अहवालानुसार आवश्यक पायाभूत कामे करण्यासह वाहतूक वॉर्डन नियुक्त करून उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी केली जाणार आहे. तोपर्यंत मुख्य रस्ते आणि वर्दळीच्या चौकांतील वाहतूक पोलीस व वॉर्डनची संख्या वाढविण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
(Sinhagad Road Traffic) सिंहगड रस्ता परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीची समस्या तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापौर नागपुरे यांनी सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयात तातडीची बैठक घेतली.
बैठकीत लोकप्रतिनिधी, वाहतूक पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कोंडीची प्रमुख कारणे, पर्यायी मार्गांची स्थिती आणि तातडीने करता येणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा केली.
लोकप्रतिनिधींकडून तीव्र नाराजी
धायरीतील उंबऱ्या गणपती चौकापासून दांडेकर पुलापर्यंत सकाळी आणि संध्याकाळी वाहनांच्या लांब रांगा (Sinhagad Road Traffic) लागत असल्याचा मुद्दा नगरसेवकांनी उपस्थित केला. कोंडीच्या वेळी अनेक चौकांत वाहतूक पोलीस उपस्थित नसल्याने शालेय विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. वारंवार पत्रव्यवहार करूनही ठोस कारवाई होत नसल्याबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली.
नियमभंग आणि पार्किंगमुळे समस्या गंभीर
वाहतूक पोलिसांच्या अनुपस्थितीमुळे विरुद्ध दिशेने वाहने चालविणे, सिग्नल तोडणे आणि अनधिकृत पार्किंगचे प्रमाण वाढल्याचे बैठकीत निदर्शनास आणण्यात आले. रस्त्यालगतची अतिक्रमणे, खड्डे, चुकीच्या ठिकाणी असलेले बसथांबे तसेच वाहतुकीस अडथळा ठरणारे डीपी आणि ओव्हरहेड केबल्स यांमुळेही परिस्थिती (Sinhagad Road Traffic) गंभीर होत असल्याचे लोकप्रतिनिधींनी सांगितले.
‘पोलिसांची काहीच जबाबदारी नाही का?’
महापौर नागपुरे Manjusha Nagpure यांनी वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. कोंडीच्या वेळी (Sinhagad Road Traffic) पोलीस रस्त्यावर दिसत नाहीत आणि उपस्थित कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्याऐवजी दंडात्मक कारवाईत व्यस्त असतात, अशी टीका त्यांनी केली. चौकांत पोलीस उपस्थित राहिल्यास वाहनचालकांवर नियमांचा धाक राहतो. मात्र, पोलीसच नसतील तर कोंडी आणि नियमभंग वाढणारच, असे त्या म्हणाल्या.
अतिक्रमणांची माहिती पालिकेला द्यावी
रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी महापालिकेची असली, तरी त्यांच्यामुळे वाहतुकीला अडथळा (Sinhagad Road Traffic) होत असल्यास पोलिसांनी त्याची माहिती पालिकेला देणे आवश्यक आहे, असे महापौरांनी स्पष्ट केले. पोलीस आणि महापालिकेने संयुक्त पाहणी करून अतिक्रमणांविरोधात समन्वयाने कारवाई करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
मिरवणुकांबाबत आयुक्तांची भेट घेणार
सण, उत्सव आणि विविध कार्यक्रमांना परवानगी देताना संभाव्य वाहतूक कोंडी (Sinhagad Road Traffic) व ध्वनीप्रदूषणाचा पुरेसा विचार होत नसल्याची नाराजी बैठकीत व्यक्त करण्यात आली. रस्ते आणि चौकांत होणाऱ्या मिरवणुकांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत सर्वपक्षीय शिष्टमंडळासह पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याचे महापौर नागपुरे यांनी सांगितले.
नगरसेवकांनी मांडल्या सात प्रमुख मागण्या
प्रत्येक चौकात वर्दळीच्या वेळी (Sinhagad Road Traffic) वाहतूक पोलीस नियुक्त करणे, अतिक्रमणांविरोधात संयुक्त कारवाई करणे, अनधिकृत पार्किंग रोखणे आणि गर्दीच्या वेळेत दंडाऐवजी वाहतूक नियमनावर भर देण्याची मागणी नगरसेवकांनी केली. वाहतुकीस अडथळा ठरणारे डीपी व ओव्हरहेड केबल्स हटविणे, खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करणे आणि चुकीच्या ठिकाणी असलेले बसथांबे स्थलांतरित करण्याची मागणीही करण्यात आली.
महापालिकेकडून सर्वतोपरी सहकार्य
मुख्य सिंहगड रस्त्यासह धायरी, वडगाव, नऱ्हे, नांदेड सिटी तसेच राजाराम पूल ते नवशा मारुती परिसरातील रस्ते आणि चौकांचे सर्वेक्षण पोलिसांनी पूर्ण करावे, असे नागपुरे यांनी सांगितले. अहवालात सुचविलेली आवश्यक कामे महापालिकेकडून तातडीने केली जातील. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाला निधी, मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
बैठकीला अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
बैठकीला प्रभाग समिती अध्यक्ष सचिन मोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत कुवंर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड, पोलीस निरीक्षक सुनील गवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका प्रवीण गोरे, सचिन पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते काका चव्हाण, माजी उपमहापौर प्रसन्न जगताप यांच्यासह संबंधित नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होते.
हे ही वाचा : MH 12 : पुण्याची ओळख ‘MH 12’ कायम राहणार ? मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराला सकारात्मक प्रतिसाद