E-waste collection drive Pune कसब्यात ई-कचऱ्याचा डोंगर हलला; १० हजार किलो संकलनातून पर्यावरण रक्षणाचा नवा संदेश, भेटवस्तू नको, ई-कचरा द्या” उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; शास्त्रोक्त पद्धतीने होणार प्रक्रिया

MLA Hemant Rasane

पुणे : पुण्यातील कसबा मतदारसंघात ई-कचऱ्याच्या समस्येला उत्तर देणारा एक अनोखा आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. आमदार हेमंत रासने Hemant Rasane यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित “भेटवस्तू नको, ई-कचरा द्या” E-waste collection drive Pune या मोहिमेला नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत तब्बल १० हजार किलो ई-कचरा जमा केला. या उपक्रमामुळे वर्षानुवर्षे घरात पडून राहिलेल्या इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

E-waste collection drive Pune घरातील ओला आणि सुका कचरा नियमितपणे महापालिकेकडे दिला जात असला, तरी ई-कचऱ्याचे व्यवस्थापन ही मोठी समस्या बनली आहे.

मोबाईल, संगणक, टीव्ही, चार्जर, बॅटऱ्या यांसारख्या वस्तूंमध्ये शिसे, पारा आणि कॅडमियमसारखी घातक रसायने असतात. या कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लागल्यास माती, पाणी आणि हवेचे प्रदूषण वाढते, ज्याचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर होतो.

“भेटवस्तू नको, ई-कचरा द्या” E-waste collection drive Pune संकल्पनेला नागरिकांचा प्रतिसाद

शनिपारजवळील कवठी अड्डा येथे आयोजित या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. जुन्या टेपरेकॉर्डरपासून टीव्ही, फ्रिजसारख्या मोठ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत विविध साहित्य जमा करण्यात आले. पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी घेतलेली ही पुढाकाराची भूमिका विशेष ठरली.

महापालिकेच्या माध्यमातून शास्त्रोक्त प्रक्रिया

संकलित करण्यात आलेल्या १० हजार किलो ई-कचऱ्यावर महापालिकेमार्फत शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जाणार आहे. या प्रक्रियेमुळे घातक रसायनांचे सुरक्षित विघटन होऊन पर्यावरणाला होणारा धोका टाळता येणार आहे. ई-कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन हा काळाची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

महापौरांचा उपक्रमाला पाठिंबा

महापौर मंजुषा नागपुरे Manjusha Nagpure यांनी या उपक्रमाचे E-waste collection drive Pune कौतुक करताना सांगितले की, महापालिकेमार्फत ओला व सुका कचरा नियमितपणे गोळा केला जातो; मात्र ई-कचऱ्याचे व्यवस्थापन ही मोठी समस्या आहे. अशा उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होऊन पर्यावरण संरक्षणाला चालना मिळते.

आमदार हेमंत रासने यांची प्रतिक्रिया

आमदार हेमंत रासने Hemant Rasane यांनी सांगितले की, ई-कचरा ही जागतिक पातळीवरील गंभीर समस्या आहे. वाढदिवसानिमित्त नागरिकांनी फुलांऐवजी ई-कचरा देऊन पर्यावरणासाठी सकारात्मक पाऊल उचलले आहे. हा उपक्रम केवळ कचरा संकलन नसून, पर्यावरण रक्षणासाठी एक सामूहिक चळवळ ठरेल.

पदाधिकारी व नागरिकांची मोठी उपस्थिती

या उपक्रमात E-waste collection drive Pune भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, कसबा मंडल अध्यक्ष अमित कंक, छगन बुलाखे, प्रशांत सुर्वे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या सहभागामुळे उपक्रमाला अधिक बळ मिळाले.

पर्यावरण रक्षणासाठी सामूहिक पाऊल

कसब्यात राबविण्यात आलेला हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी एक आदर्श ठरला आहे. नागरिकांनी दाखविलेला उत्साह आणि सहभाग पाहता, भविष्यात अशा उपक्रमांची गरज अधिक अधोरेखित झाली आहे. ई-कचऱ्याच्या योग्य व्यवस्थापनासाठी समाजाने एकत्र येणे आवश्यक असल्याचा संदेश या मोहिमेतून देण्यात आला.

हे ही वाचा : Pune hookah parlour raid विमाननगरमध्ये ‘ अटलांटिस’ रुफटॉप लाऊंजवर छापा; अवैध हुक्का पार्लरचा पर्दाफाश, अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; विदेशी दारू व साहित्यांसह दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

Exit mobile version