पुणे: पुणेकरांच्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आणि शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी (Pune Airport Metro) केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पुणे मेट्रो आणि पुणे महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत मंत्री मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी अनेक महत्त्वाकांक्षी आणि धाडसी निर्णयांवर शिक्कामोर्तब केले आहे. “पुणेकरांच्या सोयीसाठी आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन मेट्रो मार्गांची नव्याने रचना करा, निधीची मुळीच कमतरता भासू दिली जाणार नाही,” अशी ग्वाही देत त्यांनी अधिकाऱ्यांना कामाला गती देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
या बैठकीत प्रामुख्याने कल्याणीनगर ते पुणे विमानतळ (Pune Airport Metro) या नवीन मेट्रो मार्गाला मंजुरी देण्यात आली असून, कर्वे रस्त्यावर पौड फाटा ते थेट वनदेवी मंदिरापर्यंत दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
विमानतळ थेट मेट्रोच्या जाळ्याशी जोडले जाणार!
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी (Pune Airport Metro) ही अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे. कल्याणीनगर ते पुणे विमानतळ (Pune Airport Metro) या नवीन मेट्रो मार्गावर या बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले. काही महिन्यांपूर्वी मंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी मेट्रो प्रशासनाला विमानतळ जोडणीसाठी विविध पर्यायांचा अभ्यास करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आता कल्याणीनगर ते विमानतळ हा मार्ग अंतिम करण्यात आला असून, यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्व मेट्रो मार्ग थेट विमानतळाशी जोडले जाणार आहेत. यामुळे प्रवाशांचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचणार आहे.
पौड फाटा ते वनदेवी होणार भव्य दुमजली उड्डाणपूल
कर्वे रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि डेक्कनहून वारजेच्या दिशेने जाणाऱ्या वाहनधारकांना मोठा दिलासा देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पौड फाट्यापासून ते थेट वनदेवी मंदिरापर्यंत मेट्रोसह दुमजली उड्डाणपुलाचे नियोजन करण्याचे निर्देश मंत्री मोहोळ यांनी मेट्रो प्रशासनाला दिले आहेत.
यापूर्वी या मार्गावर पौड फाटा ते केवळ कर्वे पुतळ्यादरम्यान वाहनांसाठी साध्या उड्डाणपुलाचे नियोजन होते. मात्र, वाढती वाहतूक लक्षात घेता, केवळ वाहनधारकांसाठीच नव्हे तर थेट वनदेवीपर्यंत मेट्रो आणि वाहनांसाठी असा दुमजली उड्डाणपूल उभारला जाणार आहे. या निर्णयामुळे कर्वे रस्त्यावरील तब्बल पाच महत्त्वाचे चौक वाहतूक कोंडीमुक्त होणार असून स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
वनाज ते चांदणी चौक मार्गावर कचरा डेपोपासूनच दुहेरी उड्डाणपूल
वनाज ते चांदणी चौक या विस्तारित मेट्रो मार्गावर पौड रस्त्यावरील कोंडी कमी करण्यासाठी ‘नळ स्टॉप’च्या धर्तीवर कचरा डेपोपासूनच दुहेरी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांची मागणी आणि परिसरातील वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन हा सुधारित आराखडा तातडीने तयार करण्याचे निर्देश मंत्री मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी दिले आहेत.
शेवाळेवाडी-हडपसर-कात्रज मार्ग आता चांदणी चौक-वाकडपर्यंत!
पुणे शहराच्या सर्व दिशांना मेट्रोचे जाळे विस्तारण्याच्या दृष्टीने नियोजित ‘शेवाळेवाडी-हडपसर-कात्रज’ हा मार्ग आता थेट ‘चांदणी चौक ते वाकड’ असा वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या विस्तारित मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) करण्याचे निर्देश मेट्रो प्रशासनाला देण्यात आले आहेत. यामुळे संपूर्ण शहराभोवती मेट्रोचे एक वर्तुळाकार जाळे तयार होईल आणि उपनगरातील लाखो नागरिकांना त्याचा थेट फायदा होईल.
प्रलंबित HCMTR प्रकल्पाच्या निविदा काढण्याचे आदेश
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ३६ किलोमीटर लांबीच्या आणि २४ मीटर रुंदीच्या ‘HCMTR’ (हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झिट रूट) या अंतर्गत वर्तुळाकार रस्त्याच्या कामाला आता मोठी गती मिळणार आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश मंत्री मोहोळ यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना दिले आहेत. या प्रकल्पामुळे शहरातील अंतर्गत वाहतुकीचा ताण प्रचंड प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.
“निधीची काळजी करू नका, पुणेकरांचे हित महत्त्वाचे!”
बैठकीत (Pune Airport Metro) मेट्रो अधिकाऱ्यांनी काही मार्गांमधील बदल सुचवल्यास तांत्रिक अडचणी आणि निधीच्या उपलब्धतेबाबत प्रश्न उपस्थित केले. त्यावर अत्यंत सडेतोड भूमिका घेत मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, “निधी आणणे आणि सुधारित मंजुरी मिळवणे हे काम माझ्यावर सोडा. तुम्ही फक्त पुणेकरांच्या भविष्यातील हिताचा विचार करून सर्वोत्तम मार्गांची रचना करा.”
उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची उपस्थिती:
(Pune Airport Metro) पुणे मेट्रो भवन येथे आयोजित या बैठकीला महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डीकर, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ, संचालक विनोदकुमार अग्रवाल, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्यासह पुणे मनपाचे वरिष्ठ अधिकारी, माजी नगरसेवक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Pune Airport Metro) बैठकीत इतर महत्त्वाच्या मार्गांच्या (उदा. खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला, रामवाडी-वाघोली, पीसीएमसी-भक्ती शक्ती चौक, नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग आणि हडपसर-लोणी काळभोर) प्रस्तावांच्या सद्यस्थितीचाही सविस्तर आढावा घेण्यात आला.