पुणे शहरातील प्रसिध्द पुष्प प्रदर्शनाची पुण्यासहित देश-विदेशातील वाट पाहत असतात, अशा पुण्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या एम्प्रेस बॉटनिकल गार्डन Empress Garden तर्फे गार्डनमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही Empress Garden flower show एम्प्रेस गार्डन फ्लॉवर शो बड्स एन’ ब्लूम्स – २०२६ प्रदर्शन आजपासून सुरु झाले आहे.
बड्स एन’ ब्लूम्स – २०२६ Empress Garden flower show चे आयोजन २३ ते २७ जानेवारी २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे.
पुष्प प्रदर्शन २०२६ पाहण्याची वेळ २३ जानेवारी रोजी दुपारी १:०० ते सायंकाळी ७:०० असेल आणि २४ ते २७ जानेवारी दरम्यान रोज सकाळी ९:०० ते सायंकाळी ७:०० वेळ असेल.
कलात्मक पुष्परचनाः जपानी पद्धतीच्या (इकेबाना) पुष्परचना आणि विविध प्रकारचे बोन्साय वृक्ष हे यंदाच्या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असतील.
प्रदर्शनाचे औचित्य साधून एम्प्रेस गार्डन Empress Garden विविध पानाफुलानी नटलेली पाहण्याची संधी निसर्गप्रेमी पुष्परसिकांना मिळणार आहे. राज्यस्तरीय सहभागः पुणे शहरासह कोल्हापूर, सांगली, नाशिक आणि इतर राज्यांतील नामांकित नर्सरी व्यावसायिक यात सहभागी होणार आहेत.
विविध स्पर्धाः बागप्रेमींसाठी फुलांची मांडणी, फळे-भाजीपाला स्पर्धा आणि आकर्षक कुंड्यांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धांसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही.विद्यार्थ्यांचा सहभागः मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी नुकत्याच झालेल्या चित्रकला आणि हस्ताक्षर स्पर्धेत विविध शाळांतील सुमारे ८०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.
Leave a Reply