Dhere Trust Awards

Yashwantrao Chavan Art and Literature Award यशवंतरावांच्या दूरदृष्टीचा लाभ आजही मराठी रंगभूमीला; ४०वे कवी संमेलन व यशवंतराव चव्हाण कला साहित्य पुरस्कार सोहळा उत्साहात

पुणे : Yashwantrao Chavan Art and Literature Award मराठी नाट्यसृष्टीच्या विकासासाठी दूरदृष्टीने निर्णय घेणारे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मराठी नाटकांवर करमणूक कर आकारला जाणार नाही, असा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयामुळे मराठी रंगभूमीला मोठा आधार मिळाला असून त्याचे फायदे आजतागायत मिळत आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक व अभिनेते Satish Alekar यांनी केले.

स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट आणि गंगा लॉज मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४० वे कवी संमेलन व यशवंतराव चव्हाण कला साहित्य पुरस्कार सोहळा Yashwantrao Chavan Art and Literature Award टिळक स्मारक मंदिर येथे उत्साहात पार पडला. या वेळी ते बोलत होते.

या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते Mahesh Kothare यांना ‘यशवंतराव चव्हाण कला जीवनगौरव पुरस्कार’, तर ‘रानमाणूस’ म्हणून ओळखले जाणारे सामाजिक कार्यकर्ते Prasad Gavde यांना ‘अजितदादा सामाजिक कार्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. प्रत्येकी ५१ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप होते.

याशिवाय ‘यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार’ बुलढाणा येथील कवी Preshit Pradeep Siddhabhatti (काव्यसंग्रह – विस्मरणाच्या आरण्यात), चंद्रपूरचे Avinash Poinakar (दंडकारूण्य) आणि नाशिकच्या Pratibha Pawar-Khairnar (वंशावळीच्या प्राचीन सरीतून) यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप ११,००१ रुपये रोख व सन्मानचिन्ह असे होते.

कार्यक्रमाला ज्येष्ठ वात्रटिकाकार Ramdas Phutane, ज्येष्ठ कवी Ashok Naigaonkar, नीलिमा कोठारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष Sunil Tingre, संयोजक व ट्रस्टचे विजय ढेरे, संजय ढेरे, गौरव फुटाणे, सचिन जाधव, कुणाल जाधव, माजी महापौर Dattatraya Dhankawade, माजी आमदार Mohan Joshi आदी मान्यवर उपस्थित होते.

मराठी रंगभूमीबाबत यशवंतरावांची दृष्टी

सतीश आळेकर यांनी आपल्या भाषणात Yashwantrao Chavan यांच्या आठवणींना उजाळा दिला. मराठी नाटकांचे दिल्लीमध्ये प्रयोग होत असताना मराठी कलावंतांच्या पाहुणचारासाठी ते पुढाकार घेत असत. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मराठी नाटकांवरील करमणूक कर माफ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यामुळे मराठी रंगभूमीला मोठा दिलासा मिळाला. ते अत्यंत उत्तम वाचक आणि रसिक होते, अशी आठवणही आळेकर यांनी सांगितली.

‘गंगा लॉज’शी जुळलेले नाते – महेश कोठारे

पुरस्कार स्वीकारताना Mahesh Kothare यांनी सांगितले की, “यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. माझ्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात १९७५ मध्ये गंगा लॉजच्या खालच्या मजल्यापासून झाली होती. मला गुरुसमान असलेल्या आण्णासाहेब देऊळगावकरांचे कार्यालयही याच ठिकाणी होते.” मराठी चित्रपटसृष्टीतील अनुभवही त्यांनी यावेळी मांडले.

पर्यावरणस्नेही जीवनशैलीचे महत्त्व

सामाजिक कार्यकर्ते Prasad Gavde यांनी कोकणातील निसर्गाशी सुसंवाद साधून जगणाऱ्या लोकांचा उल्लेख केला. पर्यावरणाशी जुळवून घेतलेले शाश्वत जीवन आजच्या विकास प्रक्रियेसाठी आदर्श असल्याचे त्यांनी सांगितले.

कवींनी समाजाचे प्रतिनिधित्व करावे – रामदास फुटाणे

प्रास्ताविकात Ramdas Phutane यांनी कवींनी सर्वसामान्यांचे जीवन, समस्या आणि दुःख यांचे प्रतिनिधित्व करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. याच उद्देशाने गेली ४० वर्षे कवी संमेलनाची परंपरा जपली असल्याचे त्यांनी नमूद केले.

काव्यमैफलीने रसिक मंत्रमुग्ध

कवी संमेलनात विविध विषयांवरील काव्यरचनांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. स्त्रीस्वातंत्र्य, सामाजिक विषमता, दुष्काळ, धर्म, शेती आणि राजकीय परिस्थिती यांवर भाष्य करणाऱ्या कवितांनी श्रोत्यांना विचार करायला भाग पाडले. Ashok Naigaonkar यांनी विनोदी शैलीत समाजकारण आणि राजकारणातील विसंगती उलगडून दाखवली, तर इतर कवींनीही समकालीन विषयांवर प्रभावी काव्यसादरीकरण केले.

या कवी संमेलनात राज्यभरातील नामवंत कवी सहभागी झाले होते. त्यांच्या आशयघन कवितांनी पुणेकर रसिकांना हसवले, विचार करायला लावले आणि अनेक क्षणी डोळ्यांत पाणीही आणले.

हे ही वाचा : UN CSW70 Conference संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक महिला आयोगाच्या परिषदेत पुण्याच्या वैद्य ईशानी बेंडाळे यांचा तिसऱ्यांदा सहभाग, ऑक्सफर्ड विद्यापीठात उच्चशिक्षण घेणाऱ्या ईशानी मांडणार महिलांच्या न्याय व समानतेचे मुद्दे