Wildlife Smuggling पुणे रेल्वे स्टेशन परिसरात थरार! दुर्मिळ वन्यजीवांची तस्करी करणारी टोळी DRI च्या जाळ्यात; ‘शेकरू’ अन् ‘तारे कासवं’ जप्त!

Wildlife Smuggling

पुणे: पुणे रेल्वे स्टेशन आणि परिसरात काल रात्री एका हाय-व्होल्टेज कारवाईने संपूर्ण शहर हादरून गेले! अत्यंत दुर्मिळ आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधींची किंमत असलेल्या वन्यजीवांची तस्करी (Wildlife Smuggling) करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा ‘महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने’ (DRI) पर्दाफाश केला आहे. DRI च्या पुणे प्रादेशिक पथकाने अत्यंत गुप्तपणे रचलेल्या सापळ्यात दोन तस्करांना जेरबंद केले असून, त्यांच्या ताब्यातून महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेले ३ अतिदुर्मिळ ‘शेकरू’ (Malabar Giant Squirrel) आणि ७ जिवंत ‘भारतीय तारे कासव’ (Indian Star Tortoise) हस्तगत करण्यात आले आहेत. या धडक कारवाईने वन्यजीव तस्करांच्या टोळीत एकच खळबळ माजली आहे.

(Wildlife Smuggling) मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे DRI च्या पुणे युनिटच्या अधिकाऱ्यांनी रेल्वे स्टेशन परिसरात संशयास्पद हालचालींवर बारीक नजर ठेवली होती. एका ठरलेल्या जागी दबा धरून बसलेल्या पथकाने पहिल्या संशयिताला ताब्यात घेतले.

त्याची झडती घेतली असता, समोर आलेले दृश्य पाहून अधिकारीही चक्रावले! दोन बंद पुठ्ठ्याच्या खोक्यांमध्ये (Corrugated Cartons) अत्यंत क्रूरपणे कोंबून ठेवलेले तीन जिवंत ‘शेकरू’ (मलबार जायंट स्क्विरल) तडफडत होते. निसर्गाचा हा अनमोल ठेवा थेट काळ्या बाजारात विकण्याचा या तस्करांचा डाव होता.

दुसऱ्या अड्ड्यावर धाड; सुटले तस्करांचे धाबे!

पहिल्या आरोपीला (Wildlife Smuggling) बेड्या ठोकताच DRI ने आपला मोर्चा पुण्यातील दुसऱ्या संशयास्पद अड्ड्याकडे वळवला. कसून चौकशी आणि धाडसी कारवाई करत पथकाने दुसऱ्या तस्कराच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या घराची झडती घेतली असता, तेथे अत्यंत दुर्मिळ प्रजातीचे ७ ‘तारे कासव’ जप्त करण्यात आले. वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ मधील ‘अनुसूची-१’ (Schedule I) अंतर्गत या दोन्ही प्रजातींना सर्वोच्च सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. अशा प्राण्यांची शिकार, वाहतूक आणि विक्री करणे हा अजामीनपात्र आणि गंभीर गुन्हा आहे.

आता थेट वन विभागाच्या ताब्यात!

DRI च्या या धडाकेबाज कारवाईनंतर दोन्ही आरोपींना, जप्त करण्यात आलेले वन्यजीव आणि तस्करीसाठी (Wildlife Smuggling) वापरलेले साहित्य वन विभाग, पुणे (Forest Department) यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या तस्करांचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय वन्यजीव तस्करी सिंडिकेटशी जोडले गेले आहेत का? हे शेकरू आणि तारे कासव नक्की कुठून आणले आणि कोणाला विकले जाणार होते? याचा सखोल तपास आता वन विभाग आणि DRI च्या मदतीने करत आहे. 

पुण्यातील अशा हाय-प्रोफाइल वन्यजीव तस्करीच्या प्रकरणाने वन माफियांचे धाबे पुरते दणाणले आहेत, एवढं मात्र नक्की!

हे ही वाचा : NCP Election Strategy प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? पार्थ पवारांनी स्पष्ट केली अधिकृत भूमिका; चर्चांना पूर्णविराम!

शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.
Exit mobile version