Hinjawadi हिंजवडीच्या वाहतूक कोंडीवर ‘मेगा प्लॅन’; प्रमुख चौक मोकळे, शटल सेवा अन् पावसाळी गटारांना गती; एमआयडीसी आणि पीएमआरडीएचा संयुक्त कृती आराखडा; आयटी कंपन्यांच्या वेळांत अंतर, जड वाहनांवर गर्दीच्या वेळी बंदी आणि मेट्रो स्थानकांना थेट जोडणीचा प्रस्ताव

Hinjawadi

पुणे: पुण्यातील हिंजवडी (Hinjawadi) आयटी परिसरात दररोज होणारी वाहतूक कोंडी Traffic फोडण्यासाठी सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. आयटी कंपन्या, कर्मचारी, स्थानिक नागरिक आणि प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एमआयडीसी व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने संयुक्तपणे उपाययोजना आखल्या आहेत. प्रमुख चौकांतील वाहतूक सुरळीत करणे, मेट्रो स्थानकांना शटल सेवेने जोडणे, पावसाळ्यातील पाणी साचण्याची समस्या सोडवणे आणि गर्दीच्या वेळेत जड वाहनांना प्रतिबंध करणे, अशा विविध उपायांचा त्यात समावेश आहे.

हिंजवडी (Hinjawadi) परिसरात सकाळी आणि संध्याकाळी आयटी कर्मचाऱ्यांच्या वाहनांची मोठी गर्दी होते. याच काळात जड वाहनांची ये-जा सुरू राहिल्याने कोंडीत भर पडते. 

त्यामुळे सकाळी ७ ते १० आणि संध्याकाळी ४ ते ८ या गर्दीच्या वेळेत जड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्याचे नियोजन आहे. या निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ठिकाणी वाहतूक रक्षक तैनात केले जाणार आहेत.

कंपन्यांच्या वेळांमध्ये अंतर

(Hinjawadi) एकाच वेळी हजारो कर्मचारी कार्यालयात येत असल्याने आणि संध्याकाळी एकाच वेळेस बाहेर पडत असल्याने रस्त्यांवर वाहनांचा ताण वाढतो. तो कमी करण्यासाठी आयटी कंपन्यांच्या कार्यालयीन वेळांमध्ये किमान एक तासाचे अंतर ठेवण्याचा प्रस्ताव आहे. कंपन्यांनी टप्प्याटप्प्याने कर्मचाऱ्यांच्या प्रवेश व सुटण्याच्या वेळा निश्चित केल्यास वाहनांची संख्या एकाच वेळी रस्त्यावर येणार नाही. त्यामुळे दैनंदिन कोंडी कमी होण्यास मदत होऊ शकते.

प्रमुख चौकांमध्ये वाहतूक सुधारणा

(Hinjawadi) चौक, भूमकर चौक, लक्ष्मी चौक, शिवाजी चौक आणि विप्रो सर्कल या प्रमुख ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी विशेष उपाय केले जाणार आहेत. या चौकांमधील वाहतुकीचा अभ्यास करून लेन व्यवस्थापन, सिग्नलचे नियोजन, वळणांचे नियंत्रण आणि वाहतूक पोलिसांची नियुक्ती यावर भर दिला जाणार आहे. रस्त्यांवरील अनधिकृत थांबे व वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बाबींवरही कारवाई अपेक्षित आहे.

मेट्रो स्थानकांना शटलची जोड

मेगापोलिस सर्कल, क्वाड्रन सर्कल, डोहलर, इन्फोसिस फेज-दोन, विप्रो टेक्नॉलॉजीज, पोल इंडिया, शिवाजी चौक आणि हिंजवडी (Hinjawadi) स्टेशन या महत्त्वाच्या ठिकाणांना थेट जोडणी देण्याचे नियोजन आहे. मेट्रो स्थानकांपासून आयटी कंपन्यांपर्यंत शटल सेवा उपलब्ध झाल्यास खासगी वाहनांचा वापर कमी होऊ शकतो. मेट्रो आणि शटल यांचा समन्वय साधून कर्मचाऱ्यांना सुरक्षित, वेगवान आणि सोयीस्कर सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय देण्याचा प्रयत्न असेल.

‘लास्ट माइल’ प्रवास होणार सोपा

मेट्रोने हिंजवडीत (Hinjawadi) पोहोचल्यानंतर कार्यालयापर्यंत जाण्यासाठी कर्मचाऱ्यांना सध्या स्वतंत्र वाहन किंवा रिक्षेचा आधार घ्यावा लागतो. प्रस्तावित शटल सेवेमुळे ही अडचण दूर होईल. मेट्रोच्या वेळांनुसार शटलच्या फेऱ्या निश्चित केल्यास प्रवासाचे नियोजन सुलभ होईल. या व्यवस्थेमुळे मेट्रो प्रवाशांची संख्या वाढण्याबरोबरच प्रमुख रस्त्यांवरील दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा ताण कमी होण्याची शक्यता आहे.

पाणी साचण्यावर कायमस्वरूपी उपाय

पावसाळ्यात हिंजवडीतील (Hinjawadi) अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प होते. ही समस्या सोडवण्यासाठी सुमारे २५ किलोमीटर लांबीच्या नाल्यांवरील अतिक्रमणे हटवण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर ६० किलोमीटर लांबीच्या पावसाळी गटारांची कामे वेगाने पूर्ण केली जाणार आहेत. पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत राहिल्यास रस्त्यांवरील जलमय परिस्थिती आणि त्यामुळे होणारी कोंडी कमी होऊ शकेल.

प्रवाशांसाठी सुविधांवर भर

या आराखड्यात (Hinjawadi) केवळ वाहतूक कोंडी कमी करण्यावर नव्हे, तर प्रवाशांच्या सुविधांवरही लक्ष देण्यात आले आहे. प्रवासी आणि नागरिकांसाठी पादचारी मार्ग अहवाल तयार करणे, आकर्षक बसथांबे उभारणे आणि प्रवासी विश्रांती केंद्रे विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. धावपटी भूमिगत युटिलिटी डक्टच्या बाहेरील शंभर वाहतूक रक्षक तैनात करण्याचाही विचार करण्यात आला आहे.

संयुक्त यंत्रणेसमोर अंमलबजावणीचे आव्हान

या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरू असल्याचे पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. आराखड्यातील सर्व उपाय वेळेत आणि समन्वयाने राबवले, तर हिंजवडीतील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. मात्र, कंपन्या, प्रशासन, वाहतूक पोलीस आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळाल्यासच हा महत्त्वाकांक्षी आराखडा प्रत्यक्षात यशस्वी ठरणार आहे.

हे ही वाचा : Purandar Airport पुरंदर विमानतळाला ‘टेकऑफ’; डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामाचा श्रीगणेशा ! ७५ टक्के जमिनीचा ताबा प्रशासनाकडे; तीन महिन्यांत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन, शेतकऱ्यांना ३,६०० कोटींचे वाटप

Exit mobile version