पुणे : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या (Akhil Bharatiya Marathi Chitrapat Mahamandal) पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला असून, यात मेघराज राजेभोसले (Meghraj Rajebhosle) यांच्या नेतृत्वाखालील ‘समर्थ पॅनेल’ने ऐतिहासिक आणि एकहाती विजय मिळवला आहे. महामंडळाच्या सर्वच्या सर्व जागा जिंकत समर्थ पॅनेलने विरोधकांना चारी मुंड्या चीत केले आहे. या निकालामुळे चित्रपट क्षेत्रातील सभासदांनी पुन्हा एकदा मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वावर आणि गेल्या दहा वर्षांतील त्यांच्या कामावर शिक्कामोर्तब केल्याचे स्पष्ट झाले आहे.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या (Akhil Bharatiya Marathi Chitrapat Mahamandal) एकूण १७ जागांसाठी ही निवडणूक पार पडली. यामध्ये ३ जागा आधीच बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यामुळे उर्वरित १४ जागांसाठी अत्यंत चुरशीने मतदान झाले. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच समर्थ पॅनेलच्या उमेदवारांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली.
मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर समर्थ पॅनेलचे सर्व १४ उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. बिनविरोध आलेल्या ३ जागांसह महामंडळातील सर्वच्या सर्व १७ जागांवर आता समर्थ पॅनेलचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
समर्थ पॅनेलचे विजयी शिलेदार
समर्थ पॅनेलच्या या ऐतिहासिक विजयामध्ये (Akhil Bharatiya Marathi Chitrapat Mahamandal) नेतृत्व करणारे मेघराज राजेभोसले (Meghraj Rajebhosle) यांच्यासह सुनील महाजन, दीपक कदम, अजित शिरोळे, राज काझी, सुशांत शेलार, धनाजी यमकर, सुभाष नकाशे, शरद चव्हाण, प्रवीण पाटील, चैत्राली डोंगरे, रवींद्र गावडे, गणेश गारगोटे आणि विकास तोरणे या सर्व उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या सर्व शिलेदारांमुळे समर्थ पॅनेलचे संपूर्ण पॅनेल एकसंधपणे निवडून आले असून, महामंडळाची पुढील पाच वर्षांची धुरा आता या नवनिर्वाचित समर्थ कार्यकारिणीच्या खांद्यावर सोपवली गेली आहे.
‘विरोधकांच्या बेछूट आरोपांना सभासदांनी दिले चोख उत्तर’
विजयी झाल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त करताना समर्थ पॅनेलचे प्रमुख मेघराज राजेभोसले (Meghraj Rajebhosle) भावूक आणि तितकेच आक्रमक दिसले. ते म्हणाले, “निवडणुकीच्या (Akhil Bharatiya Marathi Chitrapat Mahamandal) प्रचारादरम्यान विरोधी पॅनेलकडून आमच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बेछूट आणि बिनबुडाचे आरोप करण्यात आले. महामंडळाची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, आजच्या निकालाने दाखवून दिले आहे की, महामंडळाचे सुज्ञ सभासद कोणत्याही अफवांना बळी पडले नाहीत. त्यांनी विरोधकांचे सर्व खोटे आरोप स्पष्टपणे नाकारले आहेत आणि आम्ही गेल्या दहा वर्षांत केलेल्या प्रामाणिक कामाची पोचपावती या ऐतिहासिक विजयाच्या रूपाने दिली आहे.”
राजेभोसले (Meghraj Rajebhosle) पुढे म्हणाले, “हा विजय केवळ आमचा नसून मराठी चित्रपटसृष्टीतील प्रत्येक कष्टकरी घटकाचा आहे. सभासदांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्यामुळे आम्हाला भविष्यात अधिक जोमाने काम करण्याची नवी ऊर्जा मिळाली आहे. आम्ही आगामी काळात मराठी चित्रपटसृष्टीच्या हितासाठी आणि चित्रपट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कटिबद्ध राहू.”
पुण्यात समर्थ समर्थकांचा जल्लोष
(Akhil Bharatiya Marathi Chitrapat Mahamandal) निकाल स्पष्ट होताच पुण्यातील मतमोजणी केंद्राबाहेर समर्थ पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी आणि चित्रपट क्षेत्रातील कलाकारांनी एकच जल्लोष केला. गुलालाची उधळण, ढोल-ताशांचा गजर आणि ‘मेघराज राजेभोसले आगे बढो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. फटाक्यांची आतिषबाजी करत नवनिर्वाचित संचालकांचे जंगी स्वागत करण्यात आले.
पुढील ५ वर्षांचा रोडमॅप आणि आव्हाने
या दणदणीत विजयानंतर नवनिर्वाचित कार्यकारिणीसमोर मराठी चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी देण्याचे मोठे आव्हान असणार आहे. यामध्ये प्रामुख्याने मराठी चित्रपटांना हक्काची थिएटर मिळवून देणे, तंत्रज्ञ व कलाकारांच्या मानधनाचे आणि पेन्शनचे प्रश्न सोडवणे, तसेच महामंडळाचे (Akhil Bharatiya Marathi Chitrapat Mahamandal) कामकाज अधिक पारदर्शक आणि गतिमान करणे यावर भर दिला जाणार असल्याचे पॅनेलच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व घटकांना सोबत घेऊन, मराठी चित्रपटसृष्टीचा जागतिक स्तरावर नावलौकिक वाढवण्यासाठी नवनिर्वाचित मंडळ प्रयत्नशील राईल, असा विश्वास यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

















