पुणे: विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे यांच्या वतीने लोणी काळभोर येथील विश्वराज बंधारा, विश्वशांती गुरूकुल, राजबाग येथे आयोजित दोन दिवसीय एमआयटी सांस्कृतिक संध्या (MIT Sanskrutik Sandhya) संगीत महोत्सवाचा समारोप सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. उपेन्द्र भट यांच्या सुमधूर गायनाने उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड, डॉ. मंगेश तु. कराड, विश्वशांती संगीत कला अकादमीच्या कार्यकारी संचालिका सौ. ज्योती कराड-ढाकणे, प्रा. स्वाती कराड चाटे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, दूरदर्शनचे माजी संचालक डॉ. मुकेश शर्मा तसेच प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
३१ डिसेंबर रोजी ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’च्या (MIT Sanskrutik Sandhya) समारोपप्रसंगी मध्यरात्री ठीक १२ वाजता त्याग व समर्पणाचे प्रतीक असलेल्या यज्ञकुंडामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांसह विकार, विकृती व विकल्प यांसारख्या दुर्गुणांची आहुती देण्यात आली. येणारे २०२६ हे वर्ष सुख, समाधान व शांततेने व्यतीत व्हावे, यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
MIT Sanskrutik Sandhya: अदिती रिसवाडकर यांच्याकडून कथ्थक नृत्य सादर
यावेळी विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “नववर्षाच्या पूर्वसंध्येला आपल्या अवगुणांची आहुती देऊन शांतीमय जीवन जगण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा.
भारतीय संस्कृती ही जगातील श्रेष्ठ संस्कृती असून तिच्या मूल्यांचे अनुकरण करणे आवश्यक आहे. तरुणांनी स्वधर्म, स्वाभिमान आणि स्वत्व जागवून भारतीय अस्मिता जपावी.”
या संगीत महोत्सवात अदिती रिसवाडकर यांनी कथ्थक नृत्य सादर केले. त्यानंतर तेजस उपाध्ये यांचे व्हायोलिन वादन, श्रीमती कल्याणी बोंद्रे व विश्वशांती संगीत कला अकादमीच्या विद्यार्थ्यांचे गायन झाले.
तसेच प्रा. शशांक दिवेकर यांचे सुगम संगीत आणि वारकरी संप्रदायातील सुप्रसिद्ध गायिका गोदावरीताई मुंडे यांच्या भक्तिरसपूर्ण गायनाने उपस्थितांची मने जिंकली. अखेरीस पं. उपेन्द्र भट यांच्या सुमधूर गायनाने कार्यक्रमाची (MIT Sanskrutik Sandhya) सांगता झाली.
कार्यक्रमाच्या शेवटी गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये यांनी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा देत उपस्थितांचे आभार मानले.
हेही वाचाः Navrasya: सूर्यदत्त नॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात; विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट सादरीकरण
Leave a Reply