पुणे जिल्हा परिषदेच्या २०२५ – २०२६ (Pune ZP Election 2026) मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांची अधिकृत आघाडी झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या ७३ जागा व पंचायत समितीच्या १४६ जागांवर ही आघाडी एकत्रित निवडणूक लढविणार असून याची घोषणा पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीरंग पाटील व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय सचिव व पुणे जिल्हा समन्वयक ॲड.प्रियदर्शी तेलंग यांनी पत्रकार परिषदेत केले.
Pune ZP Election 2026: मतविभागणी टाळण्याच्या हेतूने आघाडी
या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने पुणे जिल्हा परिषदेसाठी नेमण्यात आलेले निरीक्षक प्रशांत जगताप व ॲड. अभय छाजेड तसेच वंचित बहुजन आघाडीचे विशाल गवळी हे उपस्थित होते.
जातीवादी शक्तीच्या विरोधामध्ये एकत्रित लढण्याच्या हेतूने व मतविभागणी टाळण्याच्या हेतूने ही आघाडी केली असून सदर आघाडी करताना दोन्ही पक्षांच्या तालुका अध्यक्षांशी आपापसात चर्चा झाली असून त्यांनी स्थानिक पातळीवर उमेदवार ठरवले असून दोन्ही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी त्यास मान्यता दिली आहे.
नामांकन पत्र दाखल केल्यानंतर या आघाडीची आकडेवारी जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे (Pune ZP Election 2026).
हेही वाचाः International Ayurveda Ratna Award: डॉ हरीश पाटणकर यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान
Leave a Reply