पुणे : कर्करोगावरील आयुर्वेद संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण व्यासपीठ मिळाले आहे. पुण्यातील रसायु कॅन्सर क्लिनिकने Rasayu Cancer Clinic केलेल्या संशोधनाची (Cancer Research) अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजीतर्फे आयोजित ‘अॅस्को ब्रेकथ्रू २०२६’ या जागतिक परिषदेसाठी निवड झाली आहे. या संशोधनाचा समावेश ‘जर्नल ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजी’ या प्रतिष्ठित वैद्यकीय नियतकालिकातही करण्यात आला आहे. कर्करोगाचे रुग्ण आयुर्वेदाकडून नेमक्या कोणत्या अपेक्षा ठेवतात, त्यांच्या कोणत्या गरजा अपूर्ण राहतात आणि उपचारांविषयी त्यांची समज किती आहे, यावर या अभ्यासातून प्रकाश टाकण्यात आला आहे.
(Cancer Research) रसायु कॅन्सर क्लिनिकचे संस्थापक वैद्य योगेश बेंडाळे Dr. Yogesh Bendale यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले. २०२० ते २०२५ या कालावधीत क्लिनिकमध्ये उपचारासाठी आलेल्या ३,३५१ कर्करोग रुग्णांच्या माहितीचा अभ्यासात समावेश करण्यात आला.
भारतातील कर्करोग रुग्णांच्या आयुर्वेदाविषयीच्या Ayurveda अपेक्षांचा प्रत्यक्ष रुग्णमाहितीच्या आधारे करण्यात आलेला हा व्यापक अभ्यास असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
रुग्णांच्या अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न
‘एक्सपेक्टेशन्स अँड अनमेट नीड्स ऑफ कॅन्सर पेशंट्स सीकिंग आयुर्वेद रसायन थेरपी—अ क्रॉस सेक्शनल स्टडी फ्रॉम इंडिया’ या शीर्षकाने संशोधन प्रबंध (Cancer Research) सादर करण्यात आला. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर रुग्ण आयुर्वेदाची निवड का करतात, त्यांना उपचारांमधून काय साध्य करायचे असते आणि आधुनिक उपचारांसोबत आयुर्वेदाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा आहे, हे समजून घेणे हा अभ्यासाचा प्रमुख उद्देश होता.
जीवनमानासाठी आयुर्वेदाला प्राधान्य
अभ्यासातील (Cancer Research) निष्कर्षांनुसार, रुग्ण आयुर्वेदाकडे Ayurveda केवळ केमोथेरपी किंवा रेडिओथेरपीमुळे होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी वळत नसल्याचे दिसून आले. सुमारे ३१ टक्के रुग्णांनी दुष्परिणामांचे व्यवस्थापन हे आयुर्वेद स्वीकारण्यामागील प्रमुख कारण सांगितले. त्याउलट ५१ टक्के रुग्णांनी उत्तम जीवनमान मिळवण्यासाठी आयुर्वेदाची निवड केल्याचे नमूद केले.
रोगनियंत्रणासह मानसिक आधाराची अपेक्षा
अधिक काळ चांगले आरोग्य राखणे, रोगावर प्रभावी नियंत्रण मिळवणे, मानसिक आधार मिळणे आणि उपचारप्रवासात विश्वासार्ह मार्गदर्शन मिळावे, अशा विविध अपेक्षांनी रुग्ण आयुर्वेदाचा Ayurveda आधार घेत असल्याचे अभ्यासातून (Cancer Research) समोर आले. त्यामुळे कर्करोग उपचारांमध्ये केवळ आजार किंवा त्याची लक्षणे यांचा विचार न करता रुग्णाच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक गरजांकडेही लक्ष देण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.
पूर्वीच्या उपचारांबाबत असमाधान
अभ्यासातील (Cancer Research) २७ टक्के रुग्णांनी पूर्वी घेतलेल्या उपचारांबाबत समाधान नसल्याने आयुर्वेदाची निवड केल्याचे सांगितले. मुख्य उपचार पूर्ण झाल्यानंतर कर्करोग पुन्हा उद्भवू नये, या अपेक्षेने ७.५ टक्के रुग्ण आयुर्वेदाकडे वळल्याचे आढळले. या अपेक्षांकडे वैद्यकीयदृष्ट्या संवेदनशीलतेने पाहणे आणि रुग्णांना उपलब्ध पुराव्यांच्या आधारे वास्तववादी माहिती देणे महत्त्वाचे असल्याचे संशोधनातून सूचित करण्यात आले.
प्रत्येक तीनपैकी एका रुग्णाला आजाराची अवस्था अज्ञात
संशोधनातील (Cancer Research) चिंताजनक निष्कर्ष म्हणजे प्रत्येक तीन रुग्णांपैकी जवळपास एका रुग्णाला स्वतःच्या कर्करोगाची नेमकी अवस्था माहिती नव्हती. म्हणजेच ३० टक्क्यांहून अधिक रुग्णांना आजार किती पसरला आहे किंवा तो कोणत्या टप्प्यावर आहे, याची पुरेशी जाणीव नसल्याचे स्पष्ट झाले. उपचारांचे पर्याय निवडताना ही माहिती अत्यंत महत्त्वाची असल्याने रुग्ण आणि नातेवाइकांच्या योग्य समुपदेशनाची गरज अधोरेखित झाली आहे.
प्रगत अवस्थेतही पूर्ण बरे होण्याची अपेक्षा
प्रगत अवस्थेतील सुमारे २२ टक्के रुग्णांना पूर्णपणे बरे होण्याची अवास्तव अपेक्षा असल्याचेही अभ्यासात (Cancer Research) दिसून आले. कर्करोगाचे स्वरूप, उपचारांची उद्दिष्टे, अपेक्षित परिणाम आणि मर्यादा याबाबत रुग्णांना स्पष्ट माहिती मिळणे आवश्यक आहे. वैद्यकीय तज्ज्ञ, रुग्ण आणि नातेवाईक यांच्यातील संवाद अधिक पारदर्शक आणि प्रभावी करण्याची तातडीची गरज या निष्कर्षांनी समोर आणली आहे.
पुराव्यावर आधारित समावेशक उपचारांची गरज
“कर्करोगाचा उपचार म्हणजे केवळ रोगावर मात करणे नव्हे; रुग्णाला उत्तम जीवनमान, कमी दुष्परिणाम आणि योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. समावेशक कर्करोग उपचार अधिक प्रभावी करण्यासाठी पुराव्यावर आधारित संशोधन आणि रुग्णप्रशिक्षण ही काळाची गरज आहे. त्यामुळे रुग्णांना योग्य चिकित्सेची निवड करणे सोयीचे होईल,” असे वैद्य योगेश बेंडाळे यांनी सांगितले.