Pune Municipal Corporation शिंदेवाडीत उभारणार १६० टीपीएच क्षमतेचे दोन अत्याधुनिक डांबरी प्लान्ट; दक्षिण पुण्यातील रस्त्यांच्या कामांना मिळणार गती; ८.९१ कोटींच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी, अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

Pune Municipal Corporation

पुणे : पुणे महापालिकेच्या ( Pune Municipal Corporation ) येरवडा येथील जुन्या डांबरी मिश्रण प्रकल्पावरील वाढता ताण कमी करण्यासाठी शिंदेवाडी येथे १६० टीपीएच क्षमतेचे दोन नवीन बॅच मिक्स प्लान्ट उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुमारे ८ कोटी ९० लाख ९० हजार रुपये खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी पार्कर प्लान्ट इंडिया प्रा. लि. या कंपनीची निविदा बी-२ पद्धतीने निश्चित करण्यात आली आहे. स्थायी समितीने प्रस्तावाला मान्यता दिल्यामुळे प्रकल्पाच्या प्रत्यक्ष उभारणीला आता गती मिळणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले Shrinath Bhimale यांनी दिली.

( Pune Municipal Corporation ) शिंदेवाडीतील नवीन प्रकल्पामुळे कात्रज, गुजरवाडी, कोळेवाडी, उंड्री, बिबवेवाडी, कोंढवा-येवलेवाडी, धनकवडी, सिंहगड रस्ता आणि वारजे-कर्वेनगर परिसरात डांबरी मिश्रणाचा जलद पुरवठा करणे शक्य होणार आहे.

 पुणे महापालिकेच्या ( Pune Municipal Corporation ) हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या दक्षिण भागातील South Pune गावांनाही या प्रकल्पाचा लाभ होईल. सध्या या परिसरातील कामांसाठी येरवडा येथून डांबरी मिश्रण आणावे लागत असल्यामुळे वाहतुकीसाठी अधिक वेळ खर्च होतो.

येरवडा प्रकल्पावर वाढला उत्पादनाचा ताण

पुणे महापालिकेचा ( Pune Municipal Corporation ) १२० टीपीएच क्षमतेचा बॅच मिक्स प्लान्ट येरवडा येथे २०१६ पासून कार्यरत आहे. या प्रकल्पातून आतापर्यंत सुमारे सात ते साडेसात लाख मेट्रिक टन डांबरी मिश्रणाचे उत्पादन करण्यात आले आहे. सातत्याने मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे प्रकल्पातील यंत्रसामग्री आणि विविध सुटे भाग झिजले आहेत. परिणामी, तांत्रिक बिघाडामुळे प्रकल्प वारंवार बंद पडत असून मागणीनुसार डांबरी मिश्रणाचा पुरवठा करताना महापालिका प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागत आहे.

महापालिका आयुक्तांनी दिले होते निर्देश

येरवडा प्रकल्पाची सद्यस्थिती, वाढती उत्पादनाची मागणी आणि दक्षिण पुण्यातील South Pune रस्त्यांच्या कामांची आवश्यकता लक्षात घेऊन महापालिका आयुक्तांनी नवीन डांबरी मिश्रण प्रकल्प उभारण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शिंदेवाडी येथील महापालिकेच्या ( Pune Municipal Corporation ) मालकीच्या जागेची निवड करण्यात आली. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर महापालिकेच्या डांबरी मिश्रण उत्पादन क्षमतेत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे.

निविदा प्रक्रियेत चार कंपन्यांचा सहभाग

या कामासाठी महापालिकेने ( Pune Municipal Corporation ) २०२४ मध्ये निविदा प्रक्रिया राबविली होती. या प्रक्रियेत एकूण चार निविदा प्राप्त झाल्या. तांत्रिक कागदपत्रे, कंपन्यांची पात्रता आणि प्रकल्पाच्या अटींची छाननी केल्यानंतर त्यापैकी दोन निविदा पात्र ठरल्या. आर्थिक निविदांमध्ये पार्कर प्लान्ट इंडिया प्रा. लि. ही कंपनी एल-१ अर्थात सर्वांत कमी दराची निविदाधारक ठरली.

प्लान्टची प्रत्यक्ष पाहणी करून खातरजमा

निविदा अंतिम करण्यापूर्वी महापालिकेच्या ( Pune Municipal Corporation ) संबंधित अधिकाऱ्यांनी कंपनीच्या प्लान्टची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रस्तावित यंत्रसामग्रीची क्षमता, उत्पादनाची गुणवत्ता आणि निविदेतील आवश्यक तांत्रिक बाबींची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर बी-२ पद्धतीने निविदा निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. कामाची व्याप्ती आवश्यकतेनुसार कमी करून सुमारे ८ कोटी ९० लाख ९० हजार रुपयांपर्यंत प्रकल्पाचे काम करून घेण्याचे नियोजन आहे.

५.३६ एकर जागेचा होणार प्रभावी वापर

शिंदेवाडी Shindewadi जकात नाक्याजवळ महापालिकेच्या ( Pune Municipal Corporation ) ताब्यात सुमारे २१ हजार ७०० चौरस मीटर म्हणजेच ५.३६ एकर जागा आहे. या जागेचा सध्या पीएमपीएलकडून जुने टायर, ड्रम, निकामी वाहने आणि अन्य भंगार साहित्य ठेवण्यासाठी वापर केला जात आहे. मोठ्या क्षेत्रावर भंगार पडून असल्यामुळे जागेचा अपेक्षित वापर होत नव्हता. आता याच जागेवर नवीन डांबरी मिश्रण प्रकल्प उभारून महापालिकेच्या मालमत्तेचा प्रभावी वापर केला जाणार आहे.

वाहतुकीचा वेळ आणि खर्च वाचणार

( Pune Municipal Corporation ) दक्षिण पुण्यातील रस्त्यांसाठी येरवड्याहून डांबरी मिश्रणाची वाहतूक करताना मोठे अंतर पार करावे लागते. वाहतूक कोंडीमुळे मिश्रण पोहोचण्यास विलंब होण्याची शक्यताही असते. शिंदेवाडीतील प्रकल्प सुरू झाल्यानंतर पुरवठ्याचे अंतर कमी होणार असून वाहतुकीचा वेळ आणि खर्च वाचेल. रस्त्यांची दुरुस्ती, डांबरीकरण आणि नव्याने समाविष्ट गावांमधील विकासकामे अधिक वेगाने पूर्ण करण्यास मदत होणार आहे.

येरवडा प्लान्टवरील भार होणार कमी

शिंदेवाडीतील Shindewadi दोन्ही प्लान्ट कार्यान्वित झाल्यानंतर येरवडा येथील विद्यमान प्रकल्पावरील उत्पादनाचा ताण विभागला जाईल. येरवडा प्रकल्पातून शहराच्या मध्यवर्ती, पूर्व आणि अन्य भागांना पुरवठा करणे अधिक सुलभ होईल. त्याचवेळी शिंदेवाडी प्रकल्पातून दक्षिण पुण्याची गरज भागवली जाणार असल्याने डांबरी मिश्रणाच्या पुरवठ्याचे नियोजन अधिक सक्षम आणि कार्यक्षम होईल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

हे ही वाचा : Pimpri-Chinchwad पीसीएमसीतील रखडलेल्या भूसंपादनाला ‘डेडलाइन’; २२ कामे ३१ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश; पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा ‘मिशन मोड’; डीपी रस्त्यांच्या मिसिंग लिंकसाठी महापालिकेला निधीची तरतूद करण्याच्या सूचना

शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.
Exit mobile version