पुणे: हजारो वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या आयुर्वेद शास्त्राला खऱ्या अर्थाने २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘राजाश्रय’ मिळाला. स्वतंत्र आयुष मंत्रालयाच्या स्थापनेमुळे देशात आयुर्वेद संशोधनाच्या एका नव्या युगाचा प्रारंभ झाला आहे. याच धर्तीवर, पुणे येथील ‘रसायू लाईफ सायन्सेस‘ (Rasayu Life Sciences) ही संस्था आयुर्वेद संशोधनाला (Ayurveda Research) जागतिक पातळीवर नेण्याचे अत्यंत कौतुकास्पद कार्य करत आहे. या नव्या अत्याधुनिक वास्तूच्या माध्यमातून हे संशोधन कार्य अधिक गतिमान व प्रभावी होईल, असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr Pramod Sawant) यांनी व्यक्त केला.
(Rasayu Life Sciences) गेल्या तीन दशकांहून अधिक काळ आयुर्वेदाला आधुनिक संशोधन (Ayurveda Research) आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत हजारो गंभीर रुग्णांना नवजीवन देणाऱ्या ‘रसायू लाईफ सायन्सेस’च्या कर्वेनगर येथील नूतन वास्तूचा दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या कार्यक्रमाला विज्ञान-तंत्रज्ञान विषयक संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षा आणि राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच व्यासपीठावर रसायू लाईफ सायन्सेसचे निमंत्रक वैद्य योगेश बेंडाळे (Vaidya Yogesh Bendale) आणि वैद्य विनिता बेंडाळे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने दीपप्रज्ज्वलन, धन्वंतरी पूजन आणि धन्वंतरी स्तवनाने झाली.
आयुर्वेद संशोधनाला मिळाला सन्मान आणि गती: डॉ. प्रमोद सावंत
उपस्थितांना संबोधित करताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr Pramod Sawant) म्हणाले, “भारताला लाभलेली आयुर्वेदाची परंपरा ५ हजार वर्षांपेक्षाही जुनी आहे. दुर्दैवाने, स्वातंत्र्योत्तर काळात या शास्त्राकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आणि त्याला योग्य ते स्थान मिळू शकले नाही. मात्र, २०१४ मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आले आणि चित्र बदलले. आयुष मंत्रालयाची निर्मिती करून आयुर्वेदातील संशोधनासाठी (Ayurveda Research) मार्ग मोकळा करण्यात आला.”
पुढे बोलताना त्यांनी (Dr Pramod Sawant) रसायू लाईफ सायन्सेसच्या (Rasayu Life Sciences) कार्याचा गौरव केला. “वैद्य योगेश बेंडाळे (Vaidya Yogesh Bendale) आणि वैद्य विनिता बेंडाळे यांनी गेली ३० वर्षे सातत्याने सुरू ठेवलेले संशोधन, अचूक डेटाबेस, केस स्टडीज आणि आधुनिक काळातील ‘पर्सनलाइज्ड मेडिसिन’ (वैयक्तिकृत उपचार) या संकल्पनेची आयुर्वेदाशी घातलेली सांगड थक्क करणारी आहे. विशेषतः कर्करोगासारख्या (कॅन्सर) गंभीर आजारांच्या विविध प्रकारांवर रसायूने केलेले संशोधन जगभरातील रुग्णांसाठी वरदान ठरत आहे,” असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
देश-विदेशात आयुर्वेद पोहोचवणारे लोकसेवेचे व्रत: प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी
खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात रसायूच्या (Rasayu Life Sciences) कार्याचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, “वैद्य बेंडाळे (Vaidya Yogesh Bendale) दांपत्य हे केवळ वैद्यकीय व्यवसाय करत नसून, ते लोकसेवेचे एक मोठे व्रत घेऊन काम करत आहेत. आजाराच्या केवळ लक्षणांवर उपचार न करता, त्याच्या मूळाशी जाऊन शास्त्रशुद्ध पद्धतीने उपचार करण्याची त्यांची पद्धती उल्लेखनीय आहे. त्यांनी आपले संशोधन (Ayurveda Research) देश-विदेशातील विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे. सर्वसामान्य रुग्णांना परवडणारी आणि खात्रीशीर औषधे विकसित करण्याचा रसायूचा हा प्रयत्न अत्यंत महत्त्वाचा आणि अभिनंदनीय आहे.”
३० वर्षांचा अविरत प्रवास आणि ४५ हून अधिक पेटंट्स: वैद्य योगेश बेंडाळे
आपल्या प्रास्ताविकात आणि मनोगतात रसायू लाईफ सायन्सेसचे (Rasayu Life Sciences) संस्थापक वैद्य योगेश बेंडाळे (Vaidya Yogesh Bendale) यांनी संस्थेच्या प्रवासाचा पट उलगडला. ते म्हणाले, “१९९६ मध्ये जेव्हा आम्ही कामाला सुरुवात केली, तेव्हा पाश्चात्त्य वैद्यकीय शास्त्राच्या तुलनेत आयुर्वेद कुठे कमी पडतोय का, या विचारातून रसायू लाईफ सायन्सेसची संकल्पना जन्माला आली. गेल्या ३० वर्षांच्या अत्यंत खडतर आणि अथक संशोधनातून (Ayurveda Research) आज रसायूने ४५ पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय पेटंट्स मिळवले आहेत. अत्यंत अभिमानाची गोष्ट म्हणजे, रसायूने नुकतेच जगातील पहिले ‘ओरल ड्रग’ (तोंडाने घेण्याचे आयुर्वेदिक औषध) एका जागतिक आरोग्य व्यासपीठावर सादर केले आहे. या नव्या वास्तूच्या रूपातून संशोधनाचा हा यज्ञ अधिक ताकदीने पुढे सुरू राहील.”
दिमाखदार सोहळ्याची सांगता
(Rasayu Life Sciences) या संपूर्ण दिमाखदार सोहळ्याचे नेटके सूत्रसंचालन डॉ. प्रतीक तोरणे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी वैद्य योगेश बेंडाळे (Vaidya Yogesh Bendale) यांनी उपस्थित मान्यवर, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. पुण्याच्या कर्वेनगर भागातील ही नवीन भव्य वास्तू आता केवळ पुण्यासाठीच नव्हे, तर जागतिक स्तरावर आयुर्वेद संशोधनाचे एक प्रमुख केंद्र म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास या सोहळ्याच्या निमित्ताने व्यक्त करण्यात आला.
















