Bharat Gite उद्योगाला अध्यात्माची जोड; ‘ॲल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया’ भरत गिते यांची भगवानगडाला भेट; महंत न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराजांशी शिक्षण, युवकांचे भविष्य आणि सामाजिक बांधिलकीवर चर्चा; श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदिराच्या कामाची घेतली माहिती

Bharat Gite

पुणे/भगवानगड : उद्योगविश्वात आपल्या कर्तृत्वाचा स्वतंत्र ठसा उमटविणारे आणि ‘ॲल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया’ म्हणून परिचित असलेले तौरल इंडिया ग्रुपचे संस्थापक भरत गिते (Bharat Gite) यांनी नुकतीच भगवानगडाला Bhagwangad भेट दिली. यावेळी त्यांनी भगवानगडाचे मठाधिपती महंत न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराज यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. उद्योग आणि व्यवसायासह शिक्षण, युवकांचे भविष्य, सामाजिक बांधिलकी, अध्यात्म, संस्कार आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासंदर्भात उभयतांमध्ये सखोल व प्रेरणादायी चर्चा झाली.

(Bharat Gite) उद्योगांच्या माध्यमातून रोजगार, कौशल्यविकास आणि प्रगतीच्या विविध संधी निर्माण होतात; तर अध्यात्माच्या माध्यमातून समाजाला संस्कार, मूल्ये आणि योग्य दिशा मिळते. त्यामुळे उद्योगाने निर्माण केलेल्या संधी आणि अध्यात्मातून मिळणारे संस्कार यांची प्रभावी सांगड घालणे आवश्यक असल्याचे मत या चर्चेत व्यक्त करण्यात आले. 

समाजातील युवकांना केवळ रोजगारक्षम बनविण्याबरोबरच सामाजिक जाणीव असलेले जबाबदार नागरिक घडविण्यासाठी उद्योग, शिक्षण आणि अध्यात्म या तीनही क्षेत्रांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही अधोरेखित करण्यात आले.

ज्ञानेश्वर माऊली मंदिराच्या कामाची माहिती

भगवानगडावर Bhagwangad साकारत असलेल्या भव्य श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदिराच्या कामाची माहिती महंत नामदेव शास्त्री महाराज Namdev Shastri Maharaj यांनी भरत गिते (Bharat Gite) यांना दिली. मंदिराची संकल्पना, त्यामागील आध्यात्मिक भूमिका आणि सध्या सुरू असलेल्या विविध कामांविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. भाविकांसाठी श्रद्धेचे केंद्र ठरण्याबरोबरच संत ज्ञानेश्वर माऊलींचे विचार आणि वारकरी परंपरेचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हे मंदिर महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

भगवानगडाच्या शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक

भगवानगड Bhagwangad ही केवळ अध्यात्माची भूमी नसून शिक्षण, संस्कार आणि सामाजिक परिवर्तनाचे केंद्र म्हणूनही कार्यरत आहे. गडावर विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेची माहिती भरत गिते (Bharat Gite) यांनी जाणून घेतली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी योग्य वातावरण आणि आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण युवकांना प्रगतीची संधी देण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचेही चर्चेदरम्यान नमूद करण्यात आले.

कीर्तनकार विद्यार्थ्यांशी साधला संवाद

भगवानगडावरील संस्थेत वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेत असलेल्या कीर्तनकार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि आध्यात्मिक वाटचालीची माहितीही भरत गिते (Bharat Gite) यांनी घेतली. कीर्तन, प्रवचन आणि संत साहित्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारी नवी पिढी घडविण्याचे कार्य भगवानगडावर सुरू आहे. पारंपरिक वारकरी शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची जोड देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रयत्नांबाबत गिते यांनी जाणून घेतले. संस्कारक्षम आणि समाजाभिमुख युवक घडविणाऱ्या या कार्याचे त्यांनी कौतुक केले.

भगवानबाबांची प्रतिमा देऊन सन्मान

या सदिच्छा भेटीदरम्यान महंत न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराज यांनी भरत गिते (Bharat Gite) यांचा श्री संत भगवानबाबा महाराजांची प्रतिमा भेट देऊन सन्मान केला. श्री संत भगवानबाबा महाराजांचे विचार, त्यांचे सामाजिक कार्य आणि शिक्षणाबाबतची दूरदृष्टी पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा क्षण विशेष ठरला. उद्योग क्षेत्रात कार्यरत असताना सामाजिक बांधिलकी जपण्याची प्रेरणा अशा आध्यात्मिक भेटींमधून मिळत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

मान्यवरांची उपस्थिती

या भेटीप्रसंगी भगवानगडाचे उत्तराधिकारी ह.भ.प. कृष्णा महाराज शास्त्री, तौरल इंडिया कंपनीचे व्यवस्थापक निलेश जायभाये, लेट्सअप मराठीचे इंजि. जनार्धन जायभाये आणि उद्योजक केशव नागरगोजे यांच्यासह अनेक भक्तगण उपस्थित होते. उद्योग, शिक्षण आणि अध्यात्म यांच्यातील समन्वयातून समाजाच्या विकासाला नवी दिशा मिळू शकते, असा सकारात्मक संदेश या भेटीतून देण्यात आला.

हे ही वाचा : Pune Rural Police महाराष्ट्र-मध्य प्रदेशात घरफोड्यांचा धडाका; पुणे ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात सराईत चोरटा; १६ तोळे सोन्याचे दागिने आणि दुचाकीसह २४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त; तीन गुन्ह्यांची उकल, आरोपीवर यापूर्वी १४ गुन्हे दाखल

शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.
Exit mobile version