Hotmix Plant अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी खड्डेमुक्तीला ‘बूस्टर’; येरवडा प्लांटसाठी १४ कोटींच्या डांबर खरेदीला हिरवा कंदील; पेट्रोलियम कंपन्यांकडून थेट खरेदी; १५ क्षेत्रीय कार्यालयांना मिळणार डांबरी मिश्रण, पावसाळ्यातील रस्ते दुरुस्तीला वेग येण्याची अपेक्षा

Shrinath Bhimale

पुणे : पावसामुळे पुण्यातील रस्त्यांची चाळण झाली असतानाच महापालिकेने खड्डे दुरुस्ती मोहिमेला वेग देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येरवडा येथील पुणे  महापालिकेचा हॉटमिक्स प्लांट (Hotmix Plant) अखंडित सुरू ठेवण्यासाठी डांबर, एलडीओ, इमल्शन, रोडबॉन्ड आणि थर्मिक ऑइल या पेट्रोलियमजन्य साहित्याच्या सुमारे १४ कोटी रुपयांच्या थेट खरेदीला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. त्यामुळे शहरातील खड्डे बुजविणे, रस्त्यांची देखभाल आणि पुनर्डांबरीकरणाच्या कामांना गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

(Hotmix Plant) येरवडा येथील महापालिकेचा बॅच मिक्स अर्थात हॉटमिक्स प्लांट हा शहरातील रस्ते दुरुस्ती व्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. या प्लांटमधून पुणे महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांसह मुख्य पथ विभागाला दररोज डांबरी मिश्रणाचा पुरवठा केला जातो.

 पावसाळ्यात पडलेले खड्डे बुजविणे, खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे तसेच आवश्यक ठिकाणी पुनर्डांबरीकरण करण्यासाठी या मिश्रणाचा वापर होतो.

प्लांट वर्षभर दोन शिफ्टमध्ये कार्यरत ठेवण्यासाठी कच्च्या मालाचा नियमित पुरवठा आवश्यक आहे. साहित्याअभावी उत्पादन थांबल्यास शहरातील रस्ते दुरुस्तीवर थेट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पुढील दोन महिन्यांची गरज लक्षात घेऊन ही खरेदी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर मांडला होता. त्याला मान्यता देण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

कंपन्यांकडून थेट खरेदीचा निर्णय

प्रस्तावानुसार, रस्त्यांसाठी (Hotmix Plant) वापरण्यात येणारे व्हीजी-३० ग्रेडचे डांबर, एलडीओ आणि थर्मिक ऑइल हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड तसेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडकडून खरेदी केले जाणार आहे. आरएस-१ आणि आरएस-२ प्रकारचे इमल्शन तसेच पावसाळ्यात खड्डे दुरुस्तीसाठी उपयुक्त ठरणारे रोडबॉन्ड अर्थात कोल्डमिक्स हिंदुस्थान कोलास प्रायव्हेट लिमिटेडकडून घेतले जाणार आहे.

महापालिकेने २०२३ मध्येही या (Hotmix Plant) साहित्याच्या खरेदीसाठी सुमारे १४ कोटी २९ लाख रुपयांची निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यानंतर २७ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या स्थायी समितीच्या ठरावानुसार महापालिका अधिनियमातील विशेष तरतुदीचा वापर करून उत्पादक कंपन्यांकडून थेट खरेदी करण्याचे अधिकार आयुक्तांना देण्यात आले. त्याच धर्तीवर यंदाही पुढील दोन महिन्यांसाठी साहित्य खरेदी केले जाणार आहे. या प्रक्रियेसाठी स्वतंत्र अनामत रक्कम किंवा करारनामा करण्यात येणार नसल्याचे प्रस्तावात स्पष्ट करण्यात आले आहे.

नवीन प्लांटसाठी प्रथमच थर्मिक ऑइल

येरवडा हॉटमिक्स प्लांटमध्ये (Hotmix Plant) पार्कर कंपनीचा नवीन बॅच मिक्स प्लांट कार्यान्वित केला जात आहे. या यंत्रणेसाठी महापालिका प्रथमच थर्मिक ऑइल खरेदी करणार आहे. डांबरी मिश्रण आवश्यक तापमानात ठेवणे आणि संपूर्ण यंत्रणा सुरळीत चालविण्यासाठी थर्मिक ऑइल महत्त्वाचे असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. नवीन प्लांट पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर डांबरी मिश्रणाच्या उत्पादनात वाढ होऊन क्षेत्रीय कार्यालयांना वेळेत पुरवठा होण्याची अपेक्षा आहे.

अर्थसंकल्पात १३.९९ कोटींची तरतूद

महापालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात ‘विशेष कार्याधिकारी-पथ’ या अर्थशीर्षाखाली १३ कोटी ९९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून पुढील दोन महिन्यांसाठी आवश्यक साहित्य (Hotmix Plant) खरेदी केले जाणार आहे. खरेदी प्रक्रिया तातडीने पूर्ण झाल्यास पावसाने उघडीप दिल्यानंतर शहरभर खड्डे दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेता येणार आहेत.

शाह यांच्या दौऱ्यामुळे नागरी प्रश्नही केंद्रस्थानी

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह Amit Shah १ ऑगस्ट २०२६ रोजी पुण्यात येणार आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यासाठी त्यांचा हा दौरा आहे. या कार्यक्रमाला राज्यातील प्रमुख नेतेही उपस्थित राहणार असल्याने पुण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. 

शाह Amit Shah यांच्या दौऱ्याचा आणि डांबर खरेदीच्या निर्णयाचा थेट संबंध नसला, तरी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीपूर्वी शहरातील खड्डे, वाहतूककोंडी आणि रस्त्यांची दुरवस्था हे मुद्दे पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यामुळे १४ कोटींच्या खरेदीची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती वेगाने होते आणि पुणेकरांना खड्ड्यांमधून किती लवकर दिलासा मिळतो, याकडे आता लक्ष लागले आहे.

हे ही वाचा : Kharadi-Keshavnagar Bridge खराडी-केशवनगर पूल १५ ऑगस्टपर्यंत खुला होणार; लाखो वाहनचालकांना मिळणार दिलासा; मुख्य पुलाचे काम पूर्ण; ७०० मीटर जोडरस्ता, संरक्षक भिंत आणि डांबरीकरणाचे काम युद्धपातळीवर

शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.
Exit mobile version