Kharadi-Keshavnagar Bridge खराडी-केशवनगर पूल १५ ऑगस्टपर्यंत खुला होणार; लाखो वाहनचालकांना मिळणार दिलासा; मुख्य पुलाचे काम पूर्ण; ७०० मीटर जोडरस्ता, संरक्षक भिंत आणि डांबरीकरणाचे काम युद्धपातळीवर

Kharadi-Keshavnagar Bridge

पुणे : खराडी आणि मुंढवा-केशवनगर परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुळा-मुठा नदीवर उभारण्यात आलेल्या खराडी-केशवनगर पुलाचे (Kharadi-Keshavnagar Bridge) मुख्य बांधकाम पूर्ण झाले आहे. केशवनगरकडील सुमारे ७०० मीटर लांबीच्या जोडरस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असून, ते १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. जोडरस्त्याचे काम पूर्ण होताच हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

(Kharadi-Keshavnagar Bridge) खराडी, मुंढवा, केशवनगर, मगरपट्टा, हडपसर, वाघोली आणि वडगाव शेरी या भागांचा मागील काही वर्षांत वेगाने विस्तार झाला आहे. आयटी कंपन्या, व्यावसायिक संकुले, शैक्षणिक संस्था आणि मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांमुळे या परिसरातील वाहनसंख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे.

 परिणामी सकाळी आणि सायंकाळी प्रमुख रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होते. खराडी-केशवनगर पूल खुला झाल्यानंतर या भागातील वाहनचालकांना पर्यायी मार्ग उपलब्ध होऊन वाहतुकीचा ताण कमी होण्याची अपेक्षा आहे.

२३ कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

पूर्व पुण्यातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी पुणे महापालिकेने तीन वर्षांपूर्वी मुळा-मुठा नदीवर नवीन पूल (Kharadi-Keshavnagar Bridge) उभारण्याचा निर्णय घेतला होता. महापालिकेच्या पथ विभागाने सार्वजनिक-खासगी भागीदारी अर्थात पीपीपी तत्त्वावर या प्रकल्पाचे काम हाती घेतले. प्रकल्पासाठी सुमारे २३ कोटी २० लाख रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कामामधील पुलाचे मुख्य बांधकाम आता पूर्ण झाले आहे.

खराडीकडील पायाभूत सुविधा सज्ज

पुलाच्या (Kharadi-Keshavnagar Bridge) खराडीकडील भागामध्ये वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. वाहनांचे नियमन करण्यासाठी सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली असून, रस्त्याशी संबंधित अन्य कामेदेखील पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळे खराडीकडील बाजू वाहतुकीसाठी जवळपास सज्ज झाली आहे. मात्र, केशवनगरकडील जोडरस्त्याचे काम अपूर्ण असल्याने अद्याप पूल खुला करता आलेला नाही.

७०० मीटर जोडरस्ता ठरला निर्णायक

केशवनगरमधील रेणुकामाता मंदिर परिसरातून गोदरेजकडे जाणाऱ्या सुमारे ७०० मीटर लांबीच्या जोडरस्त्याचे (Kharadi-Keshavnagar Bridge) काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या रस्त्याचे पदपथ, डांबरीकरण आणि अन्य पूरक कामे पूर्ण झाल्यानंतरच पुलावरून नियमित वाहतूक सुरू करता येणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या कामासाठी १५ ऑगस्टची मुदत निश्चित केली आहे.

पावसामुळे डांबरीकरणास अडथळा

पावसाळी वातावरणामुळे जोडरस्त्याच्या (Kharadi-Keshavnagar Bridge) डांबरीकरणामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. सततच्या पावसामुळे रस्त्याचा पृष्ठभाग कोरडा होण्यास वेळ लागत असल्याने कामाच्या गतीवर परिणाम होत आहे. तरीही उपलब्ध वेळ आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन काम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

२५० मीटर संरक्षक भिंतीचे काम सुरू

जोडरस्त्याच्या (Kharadi-Keshavnagar Bridge) सुरक्षिततेसाठी सुमारे २५० मीटर लांबीची संरक्षक भिंत उभारण्यात येत आहे. या भिंतीचे कामही सध्या प्रगतिपथावर आहे. रस्त्यालगतचा भाग सुरक्षित करणे, पावसाळ्यात मातीची धूप रोखणे आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेची खात्री करणे या दृष्टीने ही भिंत महत्त्वाची ठरणार आहे.

शंभर झाडे हटविण्याचा मार्ग मोकळा

पुलाला (Kharadi-Keshavnagar Bridge) जोडणाऱ्या रस्त्याच्या मार्गात येणारी सुमारे शंभर झाडे हटविण्याचा प्रशासकीय मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे रखडलेल्या कामाला आता गती मिळण्याची शक्यता आहे. झाडे हटविण्याची प्रक्रिया, पदपथ उभारणी आणि डांबरीकरणाची कामे समन्वयाने पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर आहे.

भिमाले यांचे प्रशासनाला निर्देश

“पुलाच्या मार्गातील रस्त्यावर असलेली शंभर झाडे काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या पदपथ आणि डांबरीकरणाची कामे सुरू आहेत. ही सर्व कामे १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,” असे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

प्रकल्प दृष्टिक्षेपात

प्रकल्प खर्च : २३ कोटी २० लाख रुपये  

पुलाची लांबी : २४६.४० मीटर  

पुलाची रुंदी : २४ मीटर  

सेवा मार्ग : दोन्ही बाजूंना प्रत्येकी १ मीटर रुंदीचे स्वतंत्र मार्ग  

स्वतंत्र पदपथ : २ मीटर रुंद  

दुभाजकाची रुंदी : १ मीटर  

जोडरस्त्याची लांबी : सुमारे ७०० मीटर  

संरक्षक भिंत : सुमारे २५० मीटर

हे ही वाचा : Air Pollution पुण्याच्या श्वासाला प्रदूषणाचा विळखा; वर्षातील ३१ दिवस हवा ‘खराब’; वाहनांची विक्रमी भर, वाहतूक कोंडी आणि बांधकामांच्या धुळीने वाढवली चिंता; नायट्रोजन डायऑक्साइडसह सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण धोक्याच्या दिशेने

शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.
Exit mobile version