पुणे : पुण्यातील वारजे, कर्वेनगर आणि सिंहगड रस्ता परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून ‘माणिकबाग ते एसएनडीटी’ मेट्रो प्रकल्पाला गती मिळाली आहे. Pune Metro News सुमारे ९ हजार ८५७ कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम पावसाळ्यानंतर प्रत्यक्षात सुरू होणार असून, पुढील चार वर्षांत हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्याचे नियोजन आहे अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली.
Pune Metro News या मेट्रो मार्गाची सुरुवात सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग येथून होणार आहे. पुढे सनसिटी, वारजे महामार्ग चौक, कर्वेनगर, डहाणूकर कॉलनी आणि महर्षी कर्वे पुतळा चौक मार्गे हा मार्ग एसएनडीटीपर्यंत पोहोचणार आहे.
शहराच्या पश्चिम भागातील महत्त्वाच्या निवासी आणि व्यावसायिक भागांना जोडणारा हा मार्ग असल्याने प्रवाशांसाठी तो अत्यंत सोयीचा ठरणार आहे.
वाहतूक कोंडीवर मोठा उपाय
सिंहगड रस्ता आणि कर्वे रस्ता परिसर हा पुण्यातील सर्वाधिक वाहतूक कोंडीचा भाग मानला जातो. दररोज हजारो वाहनांची गर्दी असल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. मेट्रो प्रकल्पामुळे Pune Metro News या भागातील वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि प्रवास अधिक जलद व सुरक्षित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मोठा आर्थिक प्रकल्प
या मेट्रो मार्गासाठी Manikbagh to SNDT Metro सुमारे ₹९,८५७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. महामेट्रोच्या वतीने हा प्रकल्प राबवला जाणार असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जलद गतीने काम पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये हा प्रकल्प मोठी भर घालणारा ठरणार आहे.
भूसंपादनाचे आव्हान
प्रकल्पासाठी Manikbagh to SNDT Metro काही ठिकाणी भूसंपादन करावे लागणार आहे. मात्र, नागरिकांना योग्य मोबदला देऊन हा प्रश्न सोडवला जाईल, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. स्थानिकांचा विरोध टाळण्यासाठी पारदर्शक प्रक्रिया राबवण्यावर प्रशासनाचा भर असेल
भविष्यातील वाहतुकीचा विचार
शहरातील रस्ते रुंद करणे आता शक्य नसल्याने मेट्रो आणि इलेक्ट्रिक बस हेच भविष्यातील सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. पर्यावरणपूरक आणि शाश्वत वाहतुकीकडे पुणे शहर वाटचाल करत असल्याचे या प्रकल्पातून दिसून येते.
प्रमुख मेट्रो स्थानके
Manikbagh to SNDT Metro या मार्गावर काही महत्त्वाची स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहेत:
कर्वेनगर – क्रोमा शोरूमसमोर
वारजे – रामचंद्र पाटील चौधरी शाळेसमोर
डहाणूकर कॉलनी – जनता सहकारी बँक परिसर
कर्वे रस्ता – करिष्मा चौक
ही स्थानके निवासी आणि व्यापारी भागांच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
चार वर्षांत पूर्णतेचे लक्ष्य
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल आणि पुढील चार वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. वेळेत काम पूर्ण करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येत आहे.
पुणेकरांसाठी दिलासादायक पाऊल
या मेट्रो प्रकल्पामुळे Manikbagh to SNDT Metro केवळ वाहतूक कोंडी कमी होणार नाही, तर प्रवासाचा वेळही मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. तसेच, प्रदूषण कमी होऊन शहर अधिक स्वच्छ आणि सुटसुटीत होण्यास मदत होणार आहे. पुणेकरांसाठी हा प्रकल्प भविष्यातील जीवनशैली अधिक सुलभ करणारा ठरणार आहे.