पुणे: पुणे शहराचा वाढता विस्तार आणि नागरिकांच्या गरजा लक्षात घेता, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आखण्यात आलेल्या विविध प्रकल्पांना अधिक गती देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ Madhuri Misal यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगरपालिकेत Pune Municipal Corporation एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत नदी पुनरुज्जीवन, रस्ते विकास, पाणीपुरवठा आणि समाविष्ट गावांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून कामांची गुणवत्ता आणि वेग वाढवण्याचे निर्देश देण्यात आले.
Pune Municipal Corporation बैठकीमध्ये पुणे शहरासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा (RFD) सविस्तर आढावा घेण्यात आला. नदीकाठचा विकास आणि प्रदूषण मुक्तीसाठी सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती यावेळी जाणून घेण्यात आली.
याचबरोबर ‘अमृत’ योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना राज्यमंत्री मिसाळ Madhuri Misal यांनी दिल्या. शहराच्या पर्यावरण संरक्षणासाठी हे प्रकल्प मैलाचा दगड ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
समाविष्ट गावे आणि नव्या विकास आराखड्याची चर्चा
पुणे महानगरपालिकेत Pune Municipal Corporation पूर्वी समाविष्ट झालेल्या ११ गावांचा विकास आराखडा (DP) आणि नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील नागरी सुविधांबाबत बैठकीत सखोल चर्चा झाली. २३ गावांमध्ये रस्ते, पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापनाचे जाळे निर्माण करण्यासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. या भागातील नागरिकांना शहराच्या मुख्य भागाप्रमाणेच दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पायाभूत सुविधा आणि प्रधानमंत्री आवास योजनेचा आढावा
Pune Municipal Corporation शहरातील रस्ते विकास प्रकल्प, मलनिःसारण आणि पाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या कामात कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच ‘प्रधानमंत्री आवास योजना’ आणि ‘श्रम साफल्य योजने’च्या माध्यमातून गरजूंना हक्काचे घर मिळवून देण्याच्या कामाला अधिक गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या. पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले गेले.
पावसाळ्यापूर्वीची तयारी आणि आपत्ती व्यवस्थापन
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी पावसाळ्यापूर्वीची रस्त्यांची कामे आणि नाला सफाई तातडीने पूर्ण करण्याचे आदेश Pune Municipal Corporation बैठकीत देण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना देतानाच, शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ‘वाहतूक आराखड्यावर’ अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यावरही चर्चा झाली.
शाळा आणि रुग्णांलयांचे आधुनिकीकरण
सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी महापालिकेच्या Pune Municipal Corporation शाळा व रुग्णालयांचा दर्जा सुधारण्यावर बैठकीत विशेष चर्चा करण्यात आली. महापालिका रुग्णालयांचे आधुनिकीकरण करून तिथे अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे आणि शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावून विद्यार्थ्यांना प्रगत शिक्षण देणे, हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी नमूद केले.
दिग्गज नेत्यांची आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती
या महत्त्वपूर्ण बैठकीची सुरुवात महापौर मंजुषा नागपुरे Manjusha Nagpure यांनी राज्यमंत्र्यांच्या Madhuri Misal स्वागताने केली. बैठकीस उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते निलेश निकम, रिपब्लिकन पार्टी (आठवले गट) पक्षनेत्या हिमाली कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षनेते सोपान चव्हाण, शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षनेते नितीन गावडे उपस्थित होते. प्रशासकीय स्तरावर महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, ओमप्रकाश दिवटे यांच्यासह सर्व खातेप्रमुख आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पुणेकरांसाठी संदेश: “शहराचा विकास हा केवळ भौतिक नसून तो नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणारा असावा. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने काम केल्यास पुणे एक आदर्श शहर म्हणून जागतिक नकाशावर अधिक ठळकपणे उधळेल,” असे मत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी यावेळी व्यक्त केले.