अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प ‘विकसित भारत’ संकल्पनेला बळ देणारा असून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी निर्णायक ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Maharashtra Union Budget 2026 महाराष्ट्राला केंद्राकडून सुमारे 1 लाख कोटींचा निधी; विकसित भारताकडे राज्याची भक्कम वाटचाल – देवेंद्र फडणवीस

मुंबई : केंद्र सरकारच्या 2026-27 च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी ( Maharashtra Union Budget 2026 ) मोठी आर्थिक पर्वणी जाहीर झाली असून राज्याला सुमारे 1 लाख कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प ‘विकसित भारत’ संकल्पनेला बळ देणारा असून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी निर्णायक ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय करातून महाराष्ट्राला ( Maharashtra Union Budget 2026 ) 98,306 कोटी रुपयांचा वाटा मिळणार असून, विविध पायाभूत व विकास प्रकल्पांसाठी 12,355 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे.

त्यामुळे एकूण मिळकत सुमारे 1 लाख कोटी रुपये इतकी होणार असल्याचे फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा नसून शहरीकरण, औद्योगिकीकरण, रोजगारनिर्मिती आणि पायाभूत सुविधा विकासाचा स्पष्ट रोडमॅप देणारा आहे. देशपातळीवर पायाभूत सुविधांसाठी 12 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून, याचा मोठा लाभ ( Maharashtra Union Budget 2026 ) महाराष्ट्राला मिळणार आहे. याआधी ही गुंतवणूक केवळ 1 लाख कोटींच्या आसपास होती, हे त्यांनी अधोरेखित केले.

5 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी नियोजनबद्ध शहरी विकास, एकात्मिक नागरी सुविधा आणि आधुनिक दळणवळण व्यवस्था उभी राहणार आहे. यामुळे मुंबई महानगर प्रदेश (MMR), पुणे, नागपूर यांसारख्या शहरांना गती मिळेल. मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे राज्याच्या GDP मध्ये लक्षणीय वाढ होईल, तसेच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा औद्योगिक विकास वेगाने होईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि सिंचन क्षेत्रासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळणार आहे. उपसा सिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण, अ‍ॅग्रीबिझनेस प्रकल्प आणि ग्रामीण रस्ते यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.

महिलांच्या सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे. ‘लखपती दिदी’ योजनेच्या यशानंतर महिलांसाठी स्वतंत्र मॉल्स, उद्योग संधी आणि प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी वसतिगृहांची योजना हा सामाजिक बदल घडवणारा निर्णय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


आरोग्य क्षेत्रात जिल्हा रुग्णालयांमध्ये आपातकालीन वैद्यकीय सुविधा (Emergency Care Units) उभारण्याचा निर्णय मोलाचा ठरणार असून वैद्यकीय शिक्षणासाठीही मोठी तरतूद करण्यात आली आहे.

याशिवाय, मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉर, मुंबई व पुणे मेट्रो, एमएमआरमधील ग्रीन मोबिलिटी, समृद्धी महामार्गावरील ITMS यांसारख्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राची ओळख आधुनिक, गतिमान आणि गुंतवणूकस्नेही राज्य म्हणून अधिक मजबूत होणार आहे.


एकूणच, हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या ( Maharashtra Union Budget 2026 ) आर्थिक, सामाजिक आणि पायाभूत विकासासाठी गेम-चेंजर ठरेल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा ; http://Union Budget 2026 महाराष्ट्राच्या विकासाला गती – मेट्रो, ग्रामीण भाग, हायस्पीड रेल्वेसाठी कोट्यवधींची तरतूद

शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.