Daikin India डायकिन इंडियाकडून एआय आधारित ‘व्हीआरव्ही अल्फा’ एसी श्रेणी सादर; ऊर्जा कार्यक्षमता, स्मार्ट तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक उपायांवर भर; शोजो अँडो यांची पत्रकार परिषदेत माहिती

Daikin India

पुणे : उष्णतेचा कडाका वाढत असताना एअर कंडिशनिंग क्षेत्रात मोठी झेप घेत डायकिन इंडियाने Daikin India २०२६ साठी एआय आधारित ‘व्हीआरव्ही अल्फा’ (VRV Alpha) एसी श्रेणी सादर केली आहे. ऊर्जा कार्यक्षमता, स्मार्ट कनेक्टिव्हिटी आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानावर आधारित ही नवीन मालिका प्रीमियम तसेच नव्या ग्राहकांना लक्षात घेऊन विकसित करण्यात आली आहे.

सेनापती बापट रस्त्यावरील JW Marriott Pune येथे झालेल्या पत्रकार परिषदेत कंपनीचे Daikin India उपव्यवस्थापकीय संचालक शोजो अँडो Shozo Ando यांनी ही माहिती दिली.

यावेळी संचालक व वरिष्ठ उपाध्यक्ष संजय गोयल, पश्चिम विभागीय वरिष्ठ उपाध्यक्ष उल्हास शर्मा यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

‘रिस्पॉन्सिबल कूलिंग’वर भर

अँडो Shozo Ando म्हणाले की, “नवीन रूम एसी श्रेणी ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिएंसीच्या २०२६ स्टार रेटिंग मानकांनुसार विकसित करण्यात आली आहे. ‘रिस्पॉन्सिबल कूलिंग’ या संकल्पनेवर आधारित या एसींमध्ये पेटंटेड स्ट्रीमर डिस्चार्ज तंत्रज्ञान, स्मार्ट IoT कनेक्टिव्हिटी, अँटी-कॉरोजन कोटिंग आणि ५४°C तापमानातही प्रभावी कूलिंग देणारे तंत्रज्ञान समाविष्ट आहे.

५-स्टार एसींवर विशेष लक्ष

या श्रेणीत ५-स्टार इन्व्हर्टर स्प्लिट एसींवर विशेष भर देण्यात आला आहे. शांत कार्यप्रणाली, जलद कूलिंग आणि वीज बचत ही या मॉडेल्सची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे प्रीमियम शहरी ग्राहकांसोबतच पहिल्यांदाच एसी खरेदी करणाऱ्यांसाठीही ही श्रेणी आकर्षक ठरणार आहे.

 एआय-आधारित AI based air conditioner ‘व्हीआरव्ही अल्फा’ची ताकद

व्यावसायिक व उच्च-स्तरीय निवासी प्रकल्पांसाठी सादर करण्यात आलेली ‘व्हीआरव्ही अल्फा’ सिरीज ही एआय AI based air conditioner आणि IoT तंत्रज्ञानावर आधारित आहे. ही प्रणाली हवामानातील बदल ओळखून स्वतःची कार्यप्रणाली समायोजित करते, ज्यामुळे ऊर्जा बचत आणि वापरकर्त्याचा आराम दोन्ही सुधारतात.

 उत्पादन क्षमता आणि तंत्रज्ञानाचा संगम

कंपनीकडे Daikin India सध्या ६० हून अधिक मॉडेल्सची २०२६ श्रेणी असून जपानी तंत्रज्ञान आणि भारतीय गरजांचा उत्तम संगम साधण्यात आला आहे. तसेच नीमराना आणि श्री सिटी येथील उत्पादन प्रकल्पांमुळे कंपनीचे उत्पादन सामर्थ्य अधिक बळकट झाले आहे.

 एप्रिलपासून किंमतवाढ जाहीर

कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि पुरवठा साखळीवरील खर्च लक्षात घेता, कंपनी एप्रिल २०२६ पासून एसींच्या किमतीत ७ ते १२ टक्क्यांनी वाढ करणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले.

 ‘व्हीआरव्ही अल्फा’ची प्रमुख वैशिष्ट्ये

विजेची मोठी बचत करणारे एआय तंत्रज्ञान

उत्कृष्ट व सातत्यपूर्ण कूलिंग

हवामानानुसार कार्यक्षम कामगिरी

गरजेनुसार विस्तार करता येणारी प्रणाली

क्लाउड-आधारित स्मार्ट नियंत्रण प्रणाली

 डायकिन इंडियाविषयी Daikin India थोडक्यात

वार्षिक उलाढाल : १.५ अब्ज डॉलर

भारतातील गुंतवणूक : २८०० कोटी रुपये

उत्पादन केंद्रे : नीमराना, श्री सिटी

संशोधन केंद्रे : ३ अत्याधुनिक युनिट्स

‘नेका पुरस्कार २०२५’ विजेते

हे ही वाचा : ITF Tennis Tournament आंतरराष्ट्रीय लॉन टेनिसमध्ये भारतीय जोडीचा झंकार; अथर्व शर्मा – माध्वीन कामत यांचे दुहेरी विजेतेपद; पुण्याचा अभिमान उंचावला

Exit mobile version