Dattatray Atre Amrit Mahotsav Pune

Dattatray Atre Amrit Mahotsav Pune ‘दत्तात्रय अत्रे म्हणजे दीपस्तंभासारखे कार्य करणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व’; डॉ. पी. डी. पाटील यांच्याकडून गौरव; आडकर फौंडेशनतर्फे ज्येष्ठ ज्योतिष अभ्यासक अत्रे गुरुजींचा अमृत महोत्सवी सत्कार

पुणे: Dattatray Atre Amrit Mahotsav Pune सामाजिक बांधिलकी जपत ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा देण्याचे आणि अनेकांचा आत्मविश्वास वाढवण्याचे मोलाचे कार्य ज्येष्ठ ज्योतिष अभ्यासक दत्तात्रय अत्रे करत आहेत. त्यांचा सन्मान करणे म्हणजे एका ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचा गौरव करण्यासारखे असून, हा क्षण समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील Dr. P. D. Patil यांनी केले. 

आडकर फौंडेशनतर्फे Adkar Foundation देहू येथील ज्येष्ठ ज्योतिष अभ्यासक, विचारवंत आणि लेखक दत्तात्रय अत्रे यांचा ‘अमृत महोत्सवी अभीष्टचिंतन सोहळा’ Dattatray Atre Amrit Mahotsav Pune मंगळवारी (दि. २१) पुण्यातील नवी पेठ येथील पत्रकार भवन येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पी. डी. पाटील Dr. P. D. Patil बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, Dr. Sadanand More आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर, रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर आणि सुलोचना अत्रे उपस्थित होत्या. 

नि:स्वार्थ सेवा आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व

कार्यक्रमात Dattatray Atre Amrit Mahotsav Pune बोलताना डॉ. पी. डी. पाटील Dr. P. D. Patil यांनी दत्तात्रय अत्रे Dattatray Atre यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, अत्रे गुरुजींनी आयुष्यभर समाजाकडून कोणत्याही अपेक्षेविना कार्य केले आहे. ज्योतिष शास्त्राचा वापर त्यांनी केवळ भविष्य सांगण्यासाठी नाही, तर खचलेल्या माणसाला आधार देण्यासाठी आणि त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी केला. समाजातील अशा निस्पृह आणि गुणवंत व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचा सन्मान करणे, हे आडकर फौंडेशनचे कार्य पुण्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासात नक्कीच नोंद घेण्यासारखे आहे. अत्रे गुरुजींचे कार्य हे एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे असून ते अनेकांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.

ज्योतिष आणि कर्माचा ‘नवपंचम योग’

 ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे Dr. Sadanand More यांनी अत्रे गुरुजींशी Dattatray Atre असलेल्या आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, दत्तात्रय अत्रे Dattatray Atre आणि डॉ. पी. डी. पाटील हे दोन्ही दिग्गज आज एकाच मंचावर येणे, हा जणू ज्योतिष शास्त्रातील ‘नवपंचम योग’ आहे. अत्रे यांनी ज्योतिष शास्त्राकडे केवळ एक शास्त्र म्हणून न पाहता ‘प्रारब्ध, संचित आणि क्रियमाण’ या कर्मप्रकारांचा सखोल अभ्यास केला आहे. ते एक व्रतस्थ ज्योतिषी आहेत. बालपणापासूनचा त्यांचा स्नेह हा अतिशय निरपेक्ष असून, त्यांच्या अभ्यासातून अनेकांचे जीवन समृद्ध झाले आहे, असेही डॉ. मोरे यांनी नमूद केले.

माणसांमधील गुंतवणूक आणि सकारात्मक ऊर्जा

आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर यांनी अत्रे गुरुजींच्या सकारात्मक दृष्टिकोनाचे कौतुक केले. ते म्हणाले की, अत्रे गुरुजींकडे Dattatray Atre पाहिल्यानंतर एक प्रकारची सकारात्मकता जाणवते. त्यांनी आयुष्यभर केवळ पैसा किंवा प्रसिद्धीमागे न धावता ‘माणसांमध्ये गुंतवणूक’ केली आहे. प्रेम आणि जिव्हाळ्याच्या जोरावर त्यांनी उभे केलेले हे सामाजिक कार्य वंदनीय आहे. पावित्र्य राखून ज्योतिष शास्त्राचा उपयोग लोककल्याणासाठी कसा करावा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे अत्रे गुरुजी Dattatray Atre आहेत.

आध्यात्मिक अधिष्ठान आणि विज्ञानाची सांगड

आपल्या सत्काराला उत्तर देताना दत्तात्रय अत्रे Dattatray Atre भावूक झाले होते. ते म्हणाले की, माझ्या आयुष्यात जे काही सकारात्मक बदल झाले, त्यामागे डॉ. पी. डी. पाटील यांची ऊर्जा आणि प्रेरणा आहे. त्यांनी अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालत मला नेहमीच प्रोत्साहन दिले. तसेच डॉ. सदानंद मोरे यांनी मला सखोल अभ्यासाची गोडी लावली आणि सिद्धांताच्या आधारे मार्गक्रमण करण्याचा सल्ला दिला. डॉ. मोरे हे माझ्यासाठी ‘विज्ञानयुगातील आधुनिक व्यास’ आहेत. आजवरच्या प्रवासात माझ्या कुटुंबाने दिलेला पाठिंबा मोलाचा असून, लोकांना त्यांच्या गुणदोषांसह स्वीकारणे हीच माझी खरी दैवी संपत्ती आहे, असे अत्रे यांनी यावेळी सांगितले.

आडकर फौंडेशनचा सामाजिक उपक्रम

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ॲड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आडकर फौंडेशनच्या कार्याची माहिती देताना अत्रे गुरुजींच्या Dattatray Atre सत्कारामागची भूमिका विशद केली. समाजातील अशा हिऱ्यांचा सन्मान करणे हे फौंडेशन आपले कर्तव्य समजते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले, तसेच त्यांनी मानपत्राचे वाचनही केले. अत्रे गुरुजींना यावेळी सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि ग्रंथभेट देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्याला पुण्यातील अनेक मान्यवर, साहित्यप्रेमी आणि अत्रे गुरुजींचे स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे ही वाचा : Pune Children’s Book Fair पुण्यात रंगणार साहित्याचा उन्हाळी उत्सव; ३० एप्रिलपासून दिमाखदार ‘बालपुस्तक जत्रा’! गणेश कला क्रीडा रंगमंच येथे १०० दालने आणि ५ दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल; प्रवेश विनामूल्य

शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.