Marathi Sahitya Sammelan पुण्यात रंगणार ऐतिहासिक १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन! २८ ते ३१ जानेवारी २०२७ दरम्यान पुणे विद्यापीठात होणार भव्य सोहळा; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऐतिहासिक प्रांगणात भरणार साहित्याचा दरबार

Marathi Sahitya Sammelan

पुणे : मराठी वाङ्‌मयीन परंपरेचा सुवर्णक्षण ठरणारे ऐतिहासिक १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Marathi Sahitya Sammelan) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऐतिहासिक प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. साहित्याचा हा महाकुंभ २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत पुण्यात भरणार आहे. संमेलनाचे स्थळ आणि तारखांवर अखेर शिक्कामोर्तब झाले असून, शतकमहोत्सवी सोहळ्याची जय्यत तयारी आता सुरू झाली आहे.

साहित्य संमेलनाच्या (Marathi Sahitya Sammelan) इतिहासामध्ये पुणे शहरात होणारे हे १४ वे संमेलन आहे. मात्र, पुणे विद्यापीठाच्या आवारात हे संमेलन पहिल्यांदाच आयोजित केले जात आहे. 

पुणे विद्यापीठाच्या भव्य परिसराची निवड (Marathi Sahitya Sammelan)

वाहतुकीचे नियोजन आणि प्रशस्त जागा: शहरातील मध्यवर्ती भागातील संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि रसिकांच्या सोयीसाठी विद्यापीठ परिसराला प्राधान्य देण्यात आले आहे. विद्यापीठातील भव्य मैदानांमुळे पार्किंग आणि इतर व्यवस्था करणे सोपे होणार आहे.

प्रमुख कार्यक्रम स्थळे: संमेलनाचे (Marathi Sahitya Sammelan) मुख्य सोहळे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीचे प्रांगण, क्रीडा संकुल (स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स) आणि छत्रपती संभाजी महाराज सभागृहात पार पडतील.

कविकट्टा आणि कथाकथन: छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळा परिसरात साहित्यिक आणि कवींच्या मैफिली रंगणार आहेत.

आयोजन आणि संयोजनाची नवी रचना

या ऐतिहासिक शंभराव्या संमेलनाच्या (Marathi Sahitya Sammelan) यशस्वी आयोजनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. नवीन निर्णयानुसार, ‘समर्थ युवा फाउंडेशन’ हे संमेलनाचे मुख्य ‘संयोजक’ असेल, तर ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’ (मसाप) ही ‘आयोजक’ संस्था म्हणून काम पाहणार आहे. या दोन संस्थांच्या समन्वयातून हा ऐतिहासिक सोहळा भव्य दिव्य स्वरूपात साकारला जाणार आहे.

‘नांदी शंभराव्या संमेलनाची’ : राज्यभरात ९९ पूर्वतयारी उपक्रम

(Marathi Sahitya Sammelan) शतकमहोत्सवी वर्ष असल्याने या संमेलनाचा उत्साह केवळ पुण्यापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवला जाणार आहे. 

साहित्याचा जागर: महाराष्ट्रातील अशा ४८ तालुक्यांच्या ठिकाणी, जिथे आजवर कधीही मुख्य साहित्य संमेलन (Marathi Sahitya Sammelan) झालेले नाही, तिथे पूर्वतयारीचे उपक्रम राबवले जातील.

कालावधी: १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या दरम्यान राज्यभरात एकूण ९९ साहित्यिक कार्यक्रम आयोजित केले जातील. या मोहिमेला ‘नांदी शंभराव्या साहित्य संमेलनाची’ असे नाव देण्यात आले आहे.

अध्यक्ष निवड आणि इतर वैशिष्ट्ये

अध्यक्ष निवड प्रक्रिया: १०० व्या ऐतिहासिक संमेलनाच्या (Marathi Sahitya Sammelan) अध्यक्ष निवडीची अधिकृत प्रक्रिया ऑगस्ट २०२६ पासून सुरू होईल. 

अद्ययावत संकेतस्थळ: मराठी साहित्याचा इतिहास आणि आजवरच्या सर्व संमेलनांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी एक अद्ययावत संकेतस्थळ (वेबसाइट) देखील विकसित केले जाणार आहे.

मराठी भाषेचा गौरव वाढवणारा हा शतकमहोत्सवी सोहळा साहित्य रसिक आणि वाचकांसाठी एक अविस्मरणीय पर्वणी ठरणार आहे.

हे ही वाचा : Pune OrganDonation काळजाचा तुकडा गमावला, पण चार घरांत पेटवला आशेचा दिवा! पुण्यात ३ वर्षांच्या चिमुरड्याच्या अवयवदानाची हृदयस्पर्शी कहाणी; दुःखाच्या डोंगराखालीही आई-वडिलांनी घेतला अत्यंत धाडसी निर्णय; दोन चिमुरड्यांना मिळाले नवीन जीवनदान, तर दोघांना लाभली दृष्टी

शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.
Exit mobile version