Suryadutta Education Foundation
Suryadutta Education Foundation

Suryadutta Education Foundation सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीचा निकाल शंभर टक्के, फॅशन डिझाईनच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी; प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्याकडून कौतुक

पुणे:  सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन Suryadutta Education Foundation संचलित ‘सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी’च्या (एसआयएफटी) विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या बी.एस्सी. फॅशन डिझाईन प्रथम सत्र परीक्षेत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षेचा संस्थेचा निकाल तब्बल शंभर टक्के लागला असून, विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया (Dr. Sanjay B. Chordia) यांनी सर्व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले आहे.

(Suryadutta Education Foundation) या परीक्षेत संस्थेच्या विद्यार्थिनींनी अव्वल क्रमांक पटकावत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. यामध्ये वेनेशा रितेश वधान हिने ९.७३ एसजीपीए (SGPA) मिळवून संस्थेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला.

आस्था दीपक पटेल हिने ९.६४ एसजीपीए गुणांसह द्वितीय क्रमांक, तर शावनी धनंजय फडतरे हिने ९.४५ एसजीपीए गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला. या तिन्ही विद्यार्थिनींच्या यशाने संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

संस्थाचालकांकडून कौतुकाचा वर्षाव

विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे (Suryadutta Education Foundation) संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया (Dr. Sanjay B. Chordia) आणि उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांनी सर्व यशस्वी विद्यार्थिनी, त्यांचे पालक आणि मार्गदर्शक प्राध्यापकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. 

या प्रसंगी बोलताना प्रा. डॉ. संजय चोरडिया (Dr. Sanjay B. Chordia) म्हणाले, ‘‘सूर्यदत्त संस्थेमध्ये (Suryadutta Education Foundation) केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेसोबतच त्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासावर विशेष भर दिला जातो. विद्यार्थ्यांची ही उत्कृष्ट कामगिरी म्हणजे त्यांनी घेतलेली मेहनत आणि आमच्या प्राध्यापकांच्या समर्पित मार्गदर्शनाची पावती आहे. भविष्यात हे सर्व विद्यार्थी जागतिक फॅशन इंडस्ट्रीमध्ये यशस्वी व्यावसायिक आणि उद्योजक म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतील, असा मला ठाम विश्वास आहे.’’

(Suryadutta Education Foundation) संस्थेच्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलाखा यांनीही विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ‘एसआयएफटी’च्या प्राचार्या डॉ. सायली पांडे यांनी सांगितले की, “गुणवत्तापूर्ण शिक्षण, नवनवीन उपक्रम आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या ध्येयधोरणांमुळेच संस्थेला सातत्याने असे यश मिळवणे शक्य होत आहे.”

‘एसआयएफटी’चा समृद्ध शैक्षणिक प्रवास

(Suryadutta Education Foundation) २०१० मध्ये स्थापन झालेल्या सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीने (SIFT) गेल्या दीड दशकात फॅशन शिक्षणात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आतापर्यंत १२०० हून अधिक विद्यार्थ्यांनी येथून यशस्वीपणे शिक्षण पूर्ण केले असून ते सध्या फॅशन डिझाईन, रिटेल व्यवस्थापन, फ्रीलान्सिंग, अ‍ॅक्सेसरीज डिझाईन आणि उद्योजकता (Entrepreneurship) या क्षेत्रांत यशस्वी करिअर करत आहेत.

विशेष म्हणजे, नामांकित ‘आयआयआरएफ बेस्ट डिझाईन कॉलेज सर्व्हे २०२४’ मध्ये सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनला देशपातळीवर १५ वा आणि महाराष्ट्र राज्यात तिसरा क्रमांक मिळाला आहे, ज्यामुळे या संस्थेच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

प्रात्यक्षिकांवर आधारित उद्योगपूरक शिक्षण

सूर्यदत्त इन्स्टिट्यूटमध्ये (Suryadutta Education Foundation) विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान न देता अद्ययावत अभ्यासक्रम, नियमित कार्यशाळा (Workshops), संशोधनाधारित प्रकल्प आणि फॅशन जगतातील नामांकित तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी दिली जाते. 

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी संस्थेतर्फे (Suryadutta Education Foundation) ‘ला क्लासे’ (La Classe) या वार्षिक फॅशन शोचे आयोजन केले जाते. या शोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वतःच्या संकल्पना आणि फॅशन डिझाईन्स प्रत्यक्ष रॅम्पवर सादर करण्याची सुवर्णसंधी मिळते. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांना प्रत्यक्ष उद्योग जगताचा (Industry Exposure) अनुभव मिळतो, असेही संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले.

हे ही वाचा : Medha Kulkarni भाजप खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांची संसदेच्या अत्यंत महत्त्वाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती; विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण आणि हवामान बदल विषयक समितीचे करणार नेतृत्व; १८ मे २०२६ पासून नियुक्ती प्रभावी, राजकीय व सामाजिक स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव