(MBBS Admission Scam
(MBBS Admission Scam

MBBS Admission Scam पुण्यात MBBS प्रवेशाच्या नावाखाली ४० विद्यार्थी अन् पालकांना कोट्यवधींचा गंडा; तेलंगणाचा महाठग येरवडा पोलिसांच्या जाळ्यात! शासकीय जागेसाठी ५ लाख तर खाजगीसाठी घेतली ३ लाखांची लाच!

पुणे:  वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या अगतिकतेचा गैरफायदा घेऊन कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या (MBBS Admission Scam) एका आंतरराज्यीय महाठगाला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे . अरविंद प्रकाशकुमार आरोगोंडा (वय ४७, रा. सिकंदराबाद, तेलंगणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे . त्याने पुणे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील तब्बल ४० हून अधिक विद्यार्थी आणि पालकांना वैद्यकीय प्रवेशाचे खोटे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.

(MBBS Admission Scam) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अरविंद आरोगोंडा याने आपल्या एका साथीदारासह हैदराबाद येथे ‘एज्युव्हिओ लर्निंग सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ (Eduvio Learning Solutions Pvt. Ltd.) नावाची एक कंपनी सुरू केली होती आणि या कंपनीच्या शाखा पुणे व मुंबईमध्ये देखील उघडल्या होत्या . सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आकर्षक जाहिराती देऊन ही कंपनी नामांकित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देण्याचा खोटा दावा करत असे . 

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या काळात हवालदिल झालेले पालक या जाहिरातींना (MBBS Admission Scam) बळी पडत असत. आरोपीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये (Government Medical Colleges) प्रवेश मिळवून देण्यासाठी ५ लाख रुपये आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांसाठी (Private Medical Institutions) ३ लाख रुपयांचे दर ठरवले होते . जर प्रवेश मिळाला नाही, तर संपूर्ण रक्कम परत केली जाईल, असे खोटे आश्वासन देऊन पालकांचा विश्वास संपादन केला जात असे .

८.१२ लाखांच्या फसवणुकीनंतर गुन्हा दाखल

या फसवणुकीचा (MBBS Admission Scam) फटका बसलेल्या एका पालकाने १८ मार्च २०२६ रोजी पुण्याच्या येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती . आरोपीने या पालकाकडून त्यांच्या पाल्याला एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन देऊन तब्बल ८.१२ लाख रुपये उकळले होते . पैसे देऊनही प्रवेश न मिळाल्याने आणि वारंवार पाठपुरावा करूनही पैसे परत न मिळाल्यामुळे पालकाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले . यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेऊन गुन्हा दाखल केला .

मुंबईच्या आर्थर रोड जेलमधून घेतला ताबा

गुन्हा दाखल झाल्यानंतर (MBBS Admission Scam) येरवडा पोलिसांनी आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली . तपासादरम्यान पोलिसांना समजले की, आरोगोंडा हा आधीच मुंबई पोलिसांनी केलेल्या एका फसवणुकीच्या गुन्ह्यात मुंबईतील आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत बंद आहे . पुणे पोलिसांनी तात्काळ हालचाली करत न्यायालयाकडून रीतसर परवानगी मिळवली आणि त्याला आर्थर रोड जेलमधून ताब्यात घेऊन पुण्यात आणले .

आंतरराज्यीय गुन्हेगारी पार्श्वभूमी. तपासादरम्यान पोलीसही थक्क झाले .

आरोपी अरविंद आरोगोंडा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध हैदराबाद आणि मुंबई येथे आधीच ६ फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत . त्याने ‘एज्युव्हिओ लर्निंग’च्या माध्यमातून पुणे, मुंबई आणि महाराष्ट्राच्या विविध भागांतील जवळपास ४० पेक्षा जास्त कुटुंबियांची फसवणूक (MBBS Admission Scam) करून कोट्यवधी रुपये लाटल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे .

पोलीस पथकाची धडक कामगिरी

ही कारवाई (MBBS Admission Scam) अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त रजनीकांत चिलुमूला, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय ठाकर आणि त्यांच्या तपास पथकाने अत्यंत चोखपणे पार पाडली .

विद्यार्थी आणि पालकांना पोलिसांचे जाहीर आवाहन

वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू असल्याने पोलिसांनी विद्यार्थी आणि पालकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे . “कोणत्याही अनधिकृत एजंट किंवा कन्सल्टंटच्या भूलथापांना बळी पडू नका. कोणत्याही संस्थेला किंवा व्यक्तीला पैसे देण्यापूर्वी संबंधित शैक्षणिक संस्था, कन्सल्टंटची सत्यता आणि त्यांची कागदपत्रे अधिकृत पातळीवर तपासून घ्या,” असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी केले आहे . जर अशा प्रकारे कोणाची फसवणूक (MBBS Admission Scam) झाली असेल, तर त्यांनी तात्काळ येरवडा पोलिसांशी संपर्क साधावा, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे .

हे ही वाचा : Cardiac Laser Therapy तरुणांमधील हृदयविकाराचे वाढते प्रमाण आणि उपचाऱ्यांची नवी दिशा: पुन्हा ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्यांवर ‘कार्डिअॅक लेझर थेरपी’ वरदान! अँजिओप्लास्टीनंतर पुन्हा उद्भवणाऱ्या अडथळ्यांवर अत्याधुनिक लेझर किरणांचा अचूक मारा; अतिरिक्त स्टेंट आणि बायपास शस्त्रक्रिया टाळणे शक्य