पुणे : ( Cancer Survivor Story )अकरा वर्षांपूर्वी स्वादुपिंडाचा (पॅनक्रियाज) प्रगत अवस्थेतील कर्करोगाचे निदान झालेल्या रुग्णाने आयुर्वेदीय रसायन थेरपीच्या साहाय्याने कर्करोगावर मात केली असून, आज हा रुग्ण कर्करोगमुक्त, स्वावलंबी आयुष्य जगत आहे. पुण्यातील रसायू कॅन्सर क्लिनिक येथे उपचार घेतलेल्या सर्वसामान्य रिक्षावाल्याचे उदाहरण कर्करोगग्रस्तांसाठी प्रेरणादायी गोष्ट ठरली आहे.
जागतिक कर्करोग दिवस विशेष : ( Cancer Survivor Story )
( Cancer Survivor Story ) याबाबत बोलताना रसायु कॅन्सर क्लिनिकचे संस्थापक डॉ. योगेश बेंडाळे म्हणाले, “स्वादुपिंडाचा (पॅन्क्रिएटिक) कर्करोग हा वैद्यकीय क्षेत्रात सर्वाधिक गंभीर आणि कमी आयुर्मान असलेल्या कर्करोगांपैकी एक मानला जातो. विशेषतः हा रोग शेवटच्या टप्प्यात आणि यकृतात पसरलेला असल्यास, उपचारानंतरही जगण्याची शक्यता मर्यादित असते. मात्र, आयुर्वेदीय रसायन थेरपीच्या साहाय्याने रोगाचे व्यवस्थापन, जीवनशैली यातून हा आजार बरा होण्यास मदत झाली आहे.”
“२०१४ साली या रुग्णाला सतत पोटाच्या उजव्या बाजूला वेदना, श्वास लागणे आणि पचनसंस्थेचे तीव्र त्रास जाणवू लागले. तपासणीत त्याला अॅडव्हान्स्ड स्टेज पॅन्क्रिएटिक कॅन्सर असल्याचे निदान झाले. हा आजार यकृतातही पसरलेला असल्याचे दिसून आले. तज्ज्ञ डॉक्टरांनी आक्रमक केमोथेरपी व शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. मात्र, केमोथेरपीचे दुष्परिणाम, जवळच्या नातेवाईकांच्या अनुभवातून दिसलेली शारीरिक खंग आणि उपचारांचा मोठा आर्थिक भार पाहता, या रुग्णाने पर्यायी व परवडणाऱ्या उपचारपद्धतीचा विचार करून रसायू कॅन्सर क्लिनिक येथे उपचार घेण्याचे ठरवले.”
“क्लिनिकमध्ये रुग्णाच्या एकूण प्रकृतीचा, रोगाच्या अवस्थेचा आणि जीवनशैलीचा अभ्यास करून वैयक्तिक आयुर्वेदीय रसायन थेरपी सुरू करण्यात आली. उपचार सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत वेदना कमी होणे, श्वसन सुधारणा आणि पचनक्रिया सुरळीत होणे हे बदल दिसून आले. दर दोन महिन्यांनी रक्ततपासण्या आणि दर सहा महिन्यांनी ‘पेटस्कॅन’ करण्यात आले. सुरुवातीच्या तपासण्यांमध्ये ट्यूमरमध्ये आंशिक घट दिसून आली. पुढील वर्षांमध्ये सातत्याने रोगप्रगती थांबलेली असल्याचे अहवालांमध्ये नोंदवले गेले. डिसेंबर २०२४ मध्ये करण्यात आलेल्या स्कॅनमध्ये गाठींच्या आकारात आणखी घट झाल्याचे स्पष्ट झाले,” असे डॉ. योगेश बेंडाळे यांनी नमूद केले.
डॉ. बेंडाळे पुढे म्हणाले, “या दीर्घकालीन उपचारादरम्यान रुग्णाला यकृत किंवा मूत्रपिंडाशी संबंधित कोणतीही गंभीर गुंतागुंत उद्भवली नाही. वजन, ऊर्जा पातळी आणि दैनंदिन कार्यक्षमता टिकून राहिली. कोविड-१९ संसर्गाच्या काळातही रुग्णाने घरच्या घरी उपचार घेतले. या सगळ्यातून आज हा रुग्ण कोणतीही कर्करोगाची लक्षणे नसलेले, पूर्णपणे स्वावलंबी आयुष्य जगत आहे. गंभीर अशा कर्करोगाने पीडित या सामान्य कुटुंबातील रुग्णाला आयुष्मान देऊ शकलो, याचे समाधान आहे.”
“प्रगत अवस्थेतील स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे निदान झाले आणि आयुष्यच बदलून गेले. डॉक्टरांनी कर्करोग शरीरात पसरला असून, केमोथेरपी आणि शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे सांगितले. पदरी दोन मुले असल्याने आजाराइतकीच भीती उपचारांचीही होती. केमोथेरपीमुळे नातेवाईकांना होणारा त्रास जवळून पाहिला होता. त्यातच उपचारांचा खर्च आवाक्याबाहेरचा होता. सुदैवाने मला रसायु कॅन्सर क्लिनिकची माहिती मिळाली आणि उपचार सुरु केले. फरक जाणवू लागल्याने उपचार सुरू ठेवण्याचा आत्मविश्वास मिळाला. गेल्या १० वर्षांपासून नियमित उपचार व डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतले आहेत. त्यामुळे आज मला काम करता येतेय. कुटुंबाची जबाबदारी सांभाळता येत असून, स्वतंत्र आयुष्य जगत आहे, डॉक्टरांच्या या प्रयत्नांचे आणि रसायु कॅन्सर क्लिनिकच्या उपचारांबद्दल आभार मानतो,” असे या रुग्णाने सांगितले.



















Leave a Reply