पुणे : देशातील महत्त्वाचे शैक्षणिक, औद्योगिक आणि आयटी केंद्र असलेल्या पुणे शहराला अद्यापही देशाची राजधानी नवी दिल्लीशी थेट, वेगवान आणि प्रीमियम श्रेणीची रेल्वे सेवा ( Pune Delhi premium train ) उपलब्ध नसल्याचा मुद्दा राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे.
राज्यसभेतील शून्य प्रहरात बोलताना खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी पुणे–दिल्ली दरम्यान राजधानी एक्स्प्रेस, वंदे भारत स्लीपर किंवा तेजस एक्स्प्रेस यासारखी ( Pune Delhi premium train ) थेट प्रीमियम रेल्वे सेवा तातडीने सुरू करण्याची ठाम मागणी केंद्र सरकारकडे केली.
प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी सांगितले की, पुणे हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशातील एक अग्रगण्य शिक्षण, संशोधन, आयटी, स्टार्ट-अप आणि औद्योगिक केंद्र म्हणून विकसित झाले आहे. देशाच्या विविध भागांतून हजारो विद्यार्थी, आयटी व्यावसायिक, उद्योजक, संरक्षण व ऑटोमोबाईल उद्योगाशी संबंधित तज्ज्ञ तसेच सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी नियमितपणे पुणे–दिल्लीदरम्यान प्रवास करतात. मात्र या महत्त्वाच्या मार्गावर आजही थेट आणि वेगवान ( Pune Delhi premium train ) प्रीमियम रेल्वे सेवा उपलब्ध नाही, ही बाब चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.
सध्या पुणे–दिल्ली रेल्वे प्रवासासाठी २० ते ३० तासांचा कालावधी लागतो. अनेक गाड्यांमध्ये वेळेची अनिश्चितता, प्रचंड गर्दी आणि मर्यादित सुविधा असल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. दीर्घ प्रवासामुळे वेळेचा अपव्यय होतोच, शिवाय प्रवाशांची ऊर्जा आणि उत्पादकताही कमी होते, असे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
देशातील अनेक प्रमुख शहरांना राजधानी एक्स्प्रेस, वंदे भारत आणि तेजस एक्स्प्रेससारख्या ( Pune Delhi premium train ) आधुनिक व प्रीमियम रेल्वे सेवांनी जोडण्यात आले आहे. राजधानी एक्स्प्रेसमुळे राजधानी आणि मोठी शहरे जलद, सुरक्षित व वेळेत जोडली गेली आहेत. वंदे भारत ट्रेनने रेल्वे प्रवासाची संकल्पनाच बदलली असून, लांब पल्ल्यासाठी वंदे भारत स्लीपर गाड्यांचाही विचार सुरू आहे. अशा परिस्थितीत पुण्यासारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या शहराला या प्रीमियम सेवांपासून वंचित ठेवणे योग्य नसल्याचे मत प्रा. कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
पुणे–दिल्ली मार्ग हा केवळ प्रवासी वाहतुकीपुरता मर्यादित नसून, तो शिक्षण, तंत्रज्ञान, प्रशासन, उद्योग, गुंतवणूक आणि धोरणनिर्मिती यांना जोडणारा राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचा कॉरिडॉर आहे. पुण्यातील आयटी व औद्योगिक क्षेत्रातील अनेक प्रतिनिधी नियमितपणे दिल्लीतील मंत्रालये, धोरणकर्ते आणि राष्ट्रीय संस्थांच्या संपर्कात असतात. तसेच सरकारी कामकाज, वैद्यकीय उपचार, स्पर्धा परीक्षा आणि संसदीय कामकाजासाठीही मोठ्या संख्येने नागरिक दिल्लीला प्रवास करतात.
हवाई प्रवास सर्वसामान्य नागरिकांसाठी नेहमीच परवडणारा नसतो, तर एवढ्या लांब अंतरासाठी रस्ते प्रवासही व्यवहार्य ठरत नाही. त्यामुळे रेल्वे हा सर्वाधिक सुलभ, सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय आहे. मात्र वेगवान आणि आरामदायी ( Pune Delhi premium train ) प्रीमियम रेल्वे सेवेच्या अभावामुळे प्रवाशांना आजही अनेक अडचणी सहन कराव्या लागत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
या पार्श्वभूमीवर पुणे–दिल्लीदरम्यान ( Pune Delhi premium train ) राजधानी एक्स्प्रेस, वंदे भारत स्लीपर किंवा तेजस एक्स्प्रेसपैकी कोणतीही थेट प्रीमियम रेल्वे सेवा सुरू करावी, अशी मागणी प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी राज्यसभेत ठामपणे मांडली. या सेवेमुळे प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होईल, प्रवाशांना आधुनिक सुविधा मिळतील आणि व्यापार, गुंतवणूक, शिक्षण व प्रशासकीय समन्वयाला चालना मिळेल. परिणामी ‘विकसित भारत’ या संकल्पनेला बळ मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा :- Shriguruji Award दादा लाड, भारतभूषणदासजी महाराज यांना जनकल्याण समितीचा ‘पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार

















1 Comment