पुणे : शहरातील नव्याने तयार झालेले रस्ते काही दिवसांतच पुन्हा खोदले जाण्याच्या प्रकाराला अखेर आळा बसणार आहे. रस्त्यांची कामे करतानाच ड्रेनेज लाईन, पावसाळी गटारे आणि केबल डक्टची कामे एकाच वेळी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय Pune Municipal Corporation पुणे महापालिकेने घेतला आहे. यामुळे रस्ते वारंवार उखडण्याचा प्रकार थांबणार असून, पुणेकरांच्या पैशाची बचत होणार आहे.महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी ही माहिती दिली.
आतापर्यंत Pune Municipal Corporation पथ विभागाकडून रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर ड्रेनेज किंवा इतर सुविधा टाकण्यासाठी संबंधित विभागांकडून त्याच रस्त्यांवर पुन्हा खोदाई केली जात होती. यामुळे नव्याने तयार झालेले रस्ते काही दिवसांतच खराब होत होते.
समन्वयाअभावी वाढला खर्च
शहरात पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे केली जातात. त्याच वेळी ड्रेनेज विभागाकडून नवीन लाईन टाकणे किंवा जुन्या लाईनची क्षमता वाढवण्यासाठी बदल करण्याची कामे वर्षभर सुरू असतात. मात्र, या कामांचे एकत्रित नियोजन न झाल्याने पथ विभाग आणि ड्रेनेज विभागात समन्वयाचा अभाव दिसून येत होता.
परिणामी –
नव्याने तयार रस्त्यांवर पुन्हा खोदाई
मोठ्या प्रमाणात खड्डे
नागरिकांची गैरसोय
महापालिकेच्या निधीचा अपव्यय
ठेकेदारांच्या जबाबदारीवर परिणाम
अशा समस्या सातत्याने समोर येत होत्या.
एकत्रित नियोजनाची अंमलबजावणी
या पार्श्वभूमीवर आता रस्ते तयार करतानाच आवश्यक सर्व सुविधा पुरविण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. रस्त्यांचे डांबरीकरण किंवा काँक्रीटीकरण करताना त्याखालील ड्रेनेज लाईन, पावसाळी गटारे आणि भविष्यातील केबल टाकण्यासाठी आवश्यक डक्ट एकाच वेळी बसवण्यात येणार आहेत.
या कामांसाठी महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कामांची आखणी एकाच आराखड्यानुसार होणार असून, विभागांमधील समन्वय अधिक बळकट केला जाणार आहे.
नागरिकांना मिळणार दिलासा
या निर्णयामुळे वारंवार होणारी खोदाई कमी होईल, रस्ते अधिक काळ चांगल्या स्थितीत राहतील आणि वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास मदत होईल. विशेषतः पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे.
Pune Municipal Corporation अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले की, “रस्ते सर्वसुविधांनी सुसज्ज तयार झाले, तर लवकर खोदाई करण्याची गरज भासणार नाही. यामुळे प्रशासनाचा खर्च वाचेल आणि नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा मिळतील.
महापालिकेच्या Pune Municipal Corporation या निर्णयाकडे पुणेकरांच्या अपेक्षेने पाहिले जात असून, प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत प्रभावी होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा : The Root Spa raid विमाननगरातील ‘द रुट स्पा’वर पोलिसांचा छापा; पाईप तुटून पडल्याने महिलेचा मृत्यू

















1 Comment