पुणे: पुण्यातील खडकवासला धरण Khadakwasla Dam Pune परिसरात रात्री एकटी पडलेल्या अल्पवयीन युवतीला सुरक्षारक्षकाच्या सतर्कतेमुळे वेळेवर मदत मिळाल्याची घटना घडली आहे. सुरक्षारक्षक हरिदास कुंडलिकराव वऱ्हाड यांच्या प्रसंगावधानामुळे पुणे पोलिसांच्या मदतीने ही युवती सुरक्षितपणे तिच्या नांदेड सिटी परिसरातील घरी पोहोचली. या घटनेमुळे खडकवासला धरण परिसरात दाखवलेल्या माणुसकीच्या भावनेचे कौतुक होत आहे.
Khadakwasla Dam Pune पोलिसांनी संबंधित युवतीला त्यांच्या ताब्यात घेत सुरक्षितपणे तिच्या नांदेड सिटी परिसरातील घरी पोहोचवले. सुरक्षारक्षकाच्या सतर्कतेमुळे संभाव्य गंभीर घटना टळली आणि युवती सुरक्षितपणे घरी पोहोचू शकली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित १५ ते १६ वर्षांची युवती गुरुवारी (ता.१२) सायंकाळी तिच्या मित्रासोबत खडकवासला धरण Khadakwasla Dam Pune परिसरात फिरण्यासाठी आली होती. रात्री सुमारे नऊच्या सुमारास दोघेही धरण परिसरात थांबले होते. त्यावेळी त्या युवकाने “दोन मिनिटे थांब, मी काहीतरी खाण्यासाठी घेऊन येतो” असे सांगत तेथून निघून गेला. मात्र बराच वेळ उलटूनही तो युवक परत आला नाही. त्यामुळे ती युवती धरणाच्या कडेला असलेल्या झाडाखाली अंधारात एकटीच उभी राहिली होती.
दरम्यान, धरण परिसरात Khadakwasla Dam Pune नियमित गस्त घालत असताना सुरक्षारक्षक हरिदास वऱ्हाड यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी तात्काळ त्या युवतीकडे जाऊन तिची विचारपूस केली. त्यावेळी ती एका मुलासोबत येथे आल्याचे आणि तो खाण्यासाठी काहीतरी घेऊन येतो असे सांगून गेला असल्याचे तिने सांगितले. मात्र बराच वेळ झाला तरी तो परत न आल्यामुळे ती तेथेच थांबून असल्याचेही तिने स्पष्ट केले.
परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन सुरक्षारक्षक वऱ्हाड यांनी त्या युवकाचा मोबाईल क्रमांक घेतला आणि त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित युवकाचा मोबाईल बंद असल्याचे लक्षात आले. त्याचबरोबर संबंधित युवतीकडे स्वतःचा मोबाईल नसल्यामुळे तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधणेही शक्य होत नव्हते. त्यामुळे परिस्थिती अधिकच चिंताजनक बनली होती.
रात्रीच्या वेळी खडकवासला धरण परिसरात Khadakwasla Dam Pune युवती एकटी असल्याने तिच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. हे लक्षात घेऊन सुरक्षारक्षक वऱ्हाड यांनी तिला सुरक्षितपणे घरी जाण्यासाठी ऑटो-रिक्शाची व्यवस्था करून देण्याची तयारी दर्शवली. मात्र त्या युवतीने घरातील काही कौटुंबिक अडचणी असल्याचे सांगत तातडीने घरी जाण्यास नकार दिला.
यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी वऱ्हाड यांनी तातडीने ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच स्थानिक पोलीस कर्मचारी दीपक सपकाळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन युवतीची विचारपूस केली आणि तिच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारली.
यानंतर पोलिसांनी संबंधित युवतीला त्यांच्या ताब्यात घेत सुरक्षितपणे तिच्या नांदेड सिटी परिसरातील घरी पोहोचवले. सुरक्षारक्षकाच्या सतर्कतेमुळे संभाव्य गंभीर घटना टळली आणि युवती सुरक्षितपणे घरी पोहोचू शकली.
दरम्यान, सुरक्षारक्षक हरिदास वऱ्हाड यांनी यापूर्वीही धरण परिसरात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेसह अनेकांचे प्राण वाचवले आहेत. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या कार्याबद्दल विविध स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत रोटरी क्लब ऑफ सिंहगड रस्ता यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला होता. इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले होते. खडकवासला धरण परिसरात घडलेल्या या घटनेमुळे सतर्कता, माणुसकी आणि सामाजिक जबाबदारीचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.




















