Shaniwar Wada

Shaniwar Wada ऐतिहासिक शनिवारवाडा पुन्हा सात मजली उभारण्याची मागणी; आमदार हेमंत रासने यांचा विधानसभेत पाठपुरावा

पुणे : पेशवाईच्या इतिहासाचे साक्षीदार असलेल्या शनिवारवाडा Shaniwar Wada या ऐतिहासिक वास्तूला पुन्हा मूळ वैभव प्राप्त करून देण्यासाठी ती सात मजली स्वरूपात उभारण्यात यावी, अशी मागणी कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने Hemant Rasane यांनी विधानसभेत केली. १८२८ साली लागलेल्या भीषण आगीत वाड्याचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर या वास्तूचे मूळ रूप आणि वैभव मोठ्या प्रमाणात नष्ट झाले, ही अत्यंत वेदनादायी बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

Shaniwar Wada history शिवकालीन वारसा जपण्यासाठी ज्या पद्धतीने गडकिल्ल्यांचे पुनरुज्जीवन केले जात आहे, त्याच धर्तीवर पुण्याच्या मध्यभागी असलेल्या शनिवारवाड्यालाही मूळ स्वरूपात विकसित केले पाहिजे.

कसबा मतदारसंघातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधताना रासने Hemant Rasane यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे संवर्धन व जतन करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.

रासने Hemant Rasane यांच्या मते, शनिवारवाडा Shaniwar Wada हा केवळ एक ऐतिहासिक वाडा नसून तो मराठी इतिहास, संस्कृती आणि पेशवाईच्या वैभवाचे प्रतीक आहे. त्यामुळे या वास्तूचे ऐतिहासिक स्वरूप जपत त्याची पुनर्बांधणी केल्यास पुण्याच्या पर्यटन क्षेत्रालाही मोठी चालना मिळू शकते.

दरम्यान, पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या दोन भुयारी मार्गांच्या प्रकल्पालाही गती देण्याची मागणी रासने यांनी केली.

त्यामध्ये —

शनिवारवाडा ते स्वारगेट भुयारी मार्ग

सारसबाग ते शनिवारवाडा भुयारी मार्ग

या दोन प्रकल्पांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तातडीने तयार करण्यात यावा. तसेच पुणे शहरातील पहिला भुयारी मार्ग प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी विधानसभेत नमूद केले.

इतिहासातील थोर क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या स्मरणार्थ पुण्यात राष्ट्रीय स्मारक उभारण्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. मामलेदार कचेरी परिसरात हे स्मारक उभारण्यासाठी आवश्यक निधी आणि प्रशासकीय मंजुरी राज्य सरकारने द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. उमाजी नाईक यांच्या शौर्यगाथेची माहिती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी, यासाठी हे स्मारक अत्यंत महत्त्वाचे ठरेल, असेही त्यांनी Hemant Rasane सांगितले.

कसबा मतदारसंघातील जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दाही त्यांनी विधानसभेत मांडला. या परिसरात शेकडो वर्षांपूर्वी बांधलेले अनेक वाडे आजही अस्तित्वात आहेत. मात्र सध्याच्या यूडीसीपीआर (UDCPR) नियमावलीतील काही अटींमुळे या वाड्यांच्या पुनर्विकास प्रक्रियेत अनेक अडचणी निर्माण होत आहेत.

यामुळे नागरिकांना सुरक्षित आणि आधुनिक घरे मिळण्यास विलंब होत असून पुनर्विकास प्रकल्प रखडत आहेत. त्यामुळे या नियमावलीतील अटी शिथिल करून वाड्यांच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही रासने Hemant Rasane यांनी केली.

शनिवारवाड्याच्या Shaniwar Wada पुनर्वैभवापासून ते वाहतूक प्रकल्प, ऐतिहासिक स्मारके आणि जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासापर्यंत अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडत रासने यांनी कसबा मतदारसंघातील प्रश्नांवर विधानसभेचे लक्ष वेधले. त्यामुळे आता राज्य सरकार या मागण्यांवर कोणता निर्णय घेते, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा : Sindhi Premier League 2026 – १० एप्रिलपासून रंगणार ‘सिंधी प्रीमिअर लीग’चे सातवे पर्व; सामाजिक एकोप्याचा उत्सव; १६ पुरुष व ७ महिला संघांचा सहभाग, ३ मेपर्यंत क्रिकेटचा थरार